दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 81, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें४६ श्रीदासबोध. [ दशक
कल्पनेचा ठसा । जन्म लावेचा वे¹ळसा । ममतारूप ॥ ६ ॥ जन्म मायेचें
मै²दावें । जन्म क्रोधाचें वि³रांवें । जन्म मोक्षास आडवें । विघ्न आहे ॥ ७ ॥
जन्म जीवाचें मीपण । जन्म अहंतेचा गुण । जन्म हेंचि विस्मरण । ईश्व-
राचें ॥ ८ ॥ जन्म विषयाची आवडी । जन्म दुराशेची बेडी । जन्म
काळाची कांकडी । भक्षिताहे ॥ ९ ॥ जन्म हाचि विषम काळ । जन्म हेचि
वोखटी वेळ । जन्म हें अति कु⁴श्चळ । नरकपतन ॥ १० ॥ पाहतां शरी-
राचें मूळ । या ऐसें नाहीं अमंगळ । रजस्वलेचा जो विटाळ । त्यामध्यें
जन्म यासी ॥ ११ ॥ अत्यंत दोष ज्या विटाळा । त्या विटाळाचाचि पुतळा ।
तेथें निर्मळपणाचा सोहळा । केवीं घडे ॥ १२ ॥ रजस्वलेचा जो विटाळ ।
त्याचा आळोनि झाला गाळ । त्या गाळाचेंच केवळ । शरीर हें ॥ १३ ॥
वरीवरी दिसे वैभवाचें । अंतरीं पोतडें नरकाचें । जैसें झांकण चर्मकुंडाचें ।
उघडितांचि नये ॥ १४ ॥ कुंड धुतां शुद्ध होतें । यास प्रत्यहीं धुइजेते ।
तरी दुर्गंधि देहातें । शुद्धता न ये ॥ १५ ॥ अस्थिपंजर उभाविला । शिरा-
नाडीं गुंडाळिला । मेदें⁵मांसें सरसाविला । सांदोसांदीं भरोनी ॥ १६ ॥
अ⁶शुद्ध शब्दें शुद्ध नाहीं । तेंही भरलें असे देहीं । नाना व्याधि दुःखें तीं-
ही । अभ्यंतरीं वसती ॥ १७ ॥ नरकाचें कोठार भरलें । आंत बाहेरी
लिडबिडिलें । मूत्रपोतडें जमलें । दुर्गंधि करूनी ॥ १८ ॥ जंत किडे आणि
आंतडीं । नाना दुर्गंधीचीं पोतडीं । अ⁷मूप लथवथती कातडीं । कंटाळ-
वाणीं ॥ १९ ॥ सर्वांगास शिर प्रमाण । तेथें ब⁸ळसे वाहे घ्राण । उठे घाणी
फुटतां श्रवण । ते दुर्गंधि न घेववे ॥ २० ॥ डोळां निघती चिपडें । नाकीं
दाटली मेकडें । प्रातःकाळीं घाणी पडे । मुखीं मळासारिखी ॥ २१ ॥ लाळ
थुंका आणि मळ । पित्त श्लेष्मा⁹ प्रबल । तयास म्हणती मुखकमळ । चंद्रा-
सारिखें ॥ २२ ॥ मुख ऐसें कुश्चिळें दिसे । पोटीं विष्ठा भरली असे । प्रत्य-
क्षास प्रमाण नसे । भूमंडळीं सर्वथा ॥ २३ ॥ पोटीं घालितां दिव्यान्न ।
कांहीं विष्ठा कांहीं वमन । भागीरथीचें घेतां जीवन । त्याची होय लघु-
शंका ॥ २४ ॥ एवं मळ मूत्र आणि वं¹⁰मन । हेंचि देहाचें जीवन । येणेंचि
१. फेरा, झपाटा. २. फसवणूक. ३. शौर्य. ४. घाणेरडें. ५. वसा, चरबी
यांनीं. ६. रक्त. ७. पुष्कळ. ८. शेंबूड. ९. कफ. १०. ओक.