दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 458, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२० वा. ] आत्मगुण. ४२३
खाणी चारी वाणी । चौऱ्यायशीं लक्ष जीवयोनी । शास्त्रीं अवघें नेमूनी ।
बोलिलें असे ॥ ३ ॥ श्लोक ॥ जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणः । कृ-
मयो रुद्रलक्षाश्च विंशल्लक्षा गवादयः ॥ स्थावरास्त्रिंशल्लक्षाश्च चतुर्लक्षाश्च
मानवाः । पापपुण्यं समं कृत्वा नरयोनिपु जायते ॥ १ ॥ टीका ॥
मनुष्यें चारी लक्ष । पशु तीस लक्ष । कृमि अक्रा लक्ष । बोलिले शास्त्रीं
॥ ४ ॥ दहा लक्ष ते खेंचर¹ । नव लक्ष जळचर । वीस लक्ष स्थावरें² ।
बोलिले शास्त्रीं ॥ ५ ॥ ऐसी चौऱ्यांशीं लक्ष जीवयोनी । जितुका
तितुका प्राणी । अनंत देहांची मांडणी । मर्यादा कैंची ॥ ६ ॥ अनंत
प्राणी होती जाती । त्यांचें अधिष्ठान जगती । जगतीवेगळी स्थिती । त्यांसि
कैंची ॥ ७ ॥ पुढें पाहतां पंचभूतें । पावलीं स्पष्ट दशेतें³ । कोणी विद्यमान
कोणी ते । उगींच⁴ असती ॥ ८ ॥ अंतरात्म्याची ओळखण । तेचि जेथ च-
पळपण । जाणीवेचें अधिष्ठान । सावध ऐका ॥ ९ ॥ सुख दुःख जाणता
जीव । तैसाच जाणावा सदाशिव । अंतःकरणपंचक अपूर्व । अंश आत्म-
याचा ॥ १० ॥ स्थूळीं आकाशाचे गुण । अंश आत्म्याचे जान । सत्व रज
तमोगुण । अंश आत्म्याचे ॥ ११ ॥ नाना चाळणा नाना धृती⁵ । नव-
विधा भक्ति चतुर्विधा मुक्ती । अलिप्तपण सहजास्थिती । गुण आत्म्याचे
॥ १२ ॥ द्रष्टा साक्षी ज्ञानघन । सत्ता चैतन्य पुरातन⁶ । श्रवण मनन वि-
वरण । गुण आत्म्याचे ॥ १३ ॥ दृश्य द्रष्टा दर्शन । ध्येय ध्याता ध्यान ।
ज्ञेय ज्ञाता ज्ञान । आत्मरूप ॥ १४ ॥ वेद शास्त्र पुराणार्थ । गुप्त चालिला
परमार्थ । सर्वज्ञपणें समर्थ । गुण आत्म्याचे ॥ १५ ॥ बद्ध मुमुक्षु साधक
सिद्ध । विचार पाहाणें शुद्ध । बोध आणि प्रबोध । गुण आत्म्याचे ॥ १६ ॥
जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या । प्रकृति पुरुष मूळमाया । पिंडब्रह्मांड अष्टकाया⁷ ।
गुण आत्म्याचे ॥ १७ ॥ परमात्मा आणि परमेश्वरी⁸ । जगदात्मा आणि ज-
गदीश्वरी । महेश आणि माहेश्वरी । गुण आत्म्याचे ॥ १८ ॥ सूक्ष्म जितुकें
नाम रूप । तितुकें आत्म्याचें स्वरूप । संकेत नामाभिधानें अमूप । सीमा
१. पक्ष्यादिक. २. वृक्षादिक. ३. दृश्य. ४. गुप्त. ५. धैर्य. ६. अनादि. ७. स्थूल,
सूक्ष्म, कारण, महाकारण, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळप्रकृति
हीं आठ शरीरें. ८. मूळमाया.