सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 224, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 224

८ वा.] सूक्ष्म शंका. १८९
एक म्हणती सर्व ब्रम्ह । हें न कळे ज्यास वर्म । तयाचे अंतरींचा भ्रम ।
गेलाचि नाहीं ॥ ४० ॥ एक म्हणती एकचि देव । तेथें कैंचें आणिले सर्व ।
सर्व ब्रम्ह हें अपूर्व । आश्चर्य वाटे ॥ ४१ ॥ एक म्हणती एकचि खरें । तेथें
नाहीं दुसरें । सर्व ब्रम्ह येणें प्रकारें । सहजचि जाहलें ॥४२॥ सर्व मिथ्या
एकसरें । उरलें तेंचि ब्रम्ह खरें । ऐसीं वाक्यें शस्त्राधारें । बोलती एक
॥ ४३ ॥ अलंकार आणि सुवर्ण । तेथें नाहीं भिन्नपण । आटाआटी व्यर्थ
शिण । म्हणती एक ॥४४॥ ही उपमा एकदेशी । कैसी साहेल वस्तूसी ।
वर्णव्यक्त अव्यक्तासी । साम्यता न घडे ॥ ४५ ॥ सुवर्णीं दृष्टि घालितां ।
मुळींच आहे व्यक्तता । अलंकार सोनें पाहतां । सोनेंचि असे ॥ ४६ ॥
मुळीं सोनेंचि व्यक्त । जड एकदेशी पीतें । पूर्णास अपूर्णाचा दृष्टांत ।
केवीं घडे ॥ ४७ ॥ दृष्टांत तितुका एकदेशी । देणें लागे कळायासी । सिंधु
आणि लहरीसी । भिन्नत्व कैंचें ॥ ४८ ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ । एका दृष्टांतें
कळे स्पष्ट । एका दृष्टांतें नष्ट । संदेह वाटे ॥४९॥ कैंचा सिंधु कैंची लहरी ।
अचळास चंचळाची सरी । साचाऐसी वोडंबरी । मानूंच नये ॥ ५० ॥
वोडंबरी हे कल्पना । नासा भास दाखवी जना । येरव्हीं हें जाणा । ब्रम्हचि
असे ॥ ५१ ॥ ऐसा वाद एकमेकां । लागतां राहिली आशंका । तेचि
आतां पुढें ऐका । सावध होऊनी ॥५२॥ माया मिथ्या कळों आली । परी
ते ब्रम्हीं कैसी झाली । म्हणावी ते निर्गुणे केली । तरी ते मुळींच मिथ्या
॥ ५३ ॥ मिथ्या शब्दां कांहींच नाहीं । तेथें केलें कोणं काई । करणें निर्गु-
णाचा ठायीं । हेंहि अघटित ॥ ५४ ॥ कर्ता ठायांचा अरूप । केलें तेंहि मि-
थ्यारूप । तथापि फेडूं आक्षेप । श्रोतयांचा ॥ ५५ ॥ इति श्रीदासबोधे गुरु-
शिष्यसंवादे अष्टमदशके आशंकानिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. सूक्ष्म शंका.
श्रीगणेशाय नमः ॥ अरे जें झालेंच नाहीं । त्याची वार्ता पुससी
काई । तथापि सांगों जेणें कांहीं । संशय नुरे ॥ १ ॥ दोरीकरितां भुजंग ।
जळाकरितां तरंग । मार्तंडाकरितां चांग । मृगजळ वाहे ॥ २ ॥ कल्पने-
१. पिवळें. २. संशय गेला असें वाटतें. ३. गारुड. ४. शंका. ५. सूर्यामुळे.