दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 123, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें८८ श्रीदासबोध. [ दशक
॥ १३ ॥ ऐशा परमेश्वराच्या मूर्ती । पाहूं जातां उदंड असती । त्यांचें अर्चन
करावें भक्ती । पांचवी ऐसी ॥ १४ ॥ यांहि वेगळे कुळधर्म । सोडूं नये
अनुक्रम । उत्तम अथवा मध्यम । करीत जावे ॥ १५ ॥ जाखमाता माय-
राणी । बाळा बगळा मानवणी । पूजामाचणी जोगिणी । कुळधर्म करावे
॥ १६ ॥ नाना तीर्थीं क्षेत्रीं जावें । तेथें त्या देवाचें पूजन करावें । नाना
उपचारें पूजावें । परमात्मयासी ॥ १७ ॥ पंचामृत गंधाक्षतें । पुष्पे परि-
मळद्रव्यें¹ बहुतें । धूप दीप असंख्यतें । नीरांजनें कर्पूराचीं ॥ १८ ॥ नाना
खाद्य नैवेद्य सुंदर । नाना फळें तांबूल प्रकार । दक्षिणा नाना अलंकार ।
दिव्यांबरें² वनमाळा³ ॥ १९ ॥ शिबिका छत्रें सुखासनें । महा मेघडंबर⁴ सूर्य-
पानें⁵ । दिंड्या पताका निशानें । ताल डोल मृदंग ॥ २० ॥ नाना वाद्यें
नाना उत्सव । नाना भक्तसमुदाय । गाती हरिदास सद्भाव । लागला भग-
वंतीं ॥ २१ ॥ वापी कूप सरोवरें । नाना देवालयें शिखरें । राजांगणें⁶
मनोहरें । वृंदावनें भुयारीं ॥ २२ ॥ मठ मंडप धर्मशाळा । देवद्वारीं पड-
शाळा । नाना उपकरणें नक्षत्रमाळा⁷ । नाना वस्त्रसामुग्री ॥ २३ ॥ नाना
पडदे मंडप चांदवे⁸ । नाना रत्नें घोंस लोंवती बरवे । नाना देवालयीं सम-
र्पावे । हस्ती घोडे शकटें⁹ ॥ २४ ॥ अलंकार आणि अलंकारपात्रें । द्रव्य आणि
द्रव्यपात्रें । अन्नोदक आणि अन्नोदकपात्रें । नाना प्रकारचीं ॥ २५ ॥ वनें
उपवनें पुष्पवाटिका । तापसांच्या पर्णकुटिका¹⁰ । ऐसी पूजा जगन्नायका ।
यथासांग समर्पावी ॥ २६ ॥ शुक सारिका¹¹ मयूरें । बदकें चक्रवाकें चकोरें ।
कोकिळा चितळें¹² सामरें । देवालयीं समर्पावीं ॥ २७ ॥ सुगंधमृगें¹³ आणि
मांजरें¹⁴ । गाई महिषी वृषभ वानरें । नाना पदार्थ आणि लेंकुरें । देवा-
लयीं समर्पावीं ॥ २८ ॥ काया वाचा आणि मनें । चित्तें वित्तें आणि प्राणें । सद्भावें
भगवदर्चनें । या नांव अर्चनभक्ती ॥ २९ ॥ ऐसेंचि सद्गुरूचें भजन । करूनि
असावें अनन्य¹⁵ । या नांव भगवद्भजन । पांचवी भक्ती ॥ ३० ॥ ऐसी
१. सुवासिक पदार्थ. २. उंची वस्त्रें. ३. वन्य पुष्पांची माळ. ४. उंच छत्री.
५. अब्दागिरी ६. चौक. ७. सत्तावीस मोत्यांची कंठी. ८. छतें. ९. गाडे.
१०. झोंपडी. ११. मैना. १२. चित्ते. १३. कस्तुरीमृग. १४. जवादी मांजरें.
१५. एकनिष्ठ.