सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 99, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 99

९८ सार्थ अमृतानुभव
लेणें आणि भांगारें । भांगाराचि एक स्फुरे ॥ कां जेथें दुसरें ।
नाहींच म्हणौनी ॥ २३६॥ जळतरंगीं दोन्हीं । जळावांचूनि
नाहीं ॥ म्हणौनी आन कांहीं । नाहीं ना नोहे ॥ २३७॥ हो
कां घ्राणुनेमेयो । येऊं कां हातीं घेवो ॥ लाहो कां दिठी पाहो ।
भलतैसे ॥ २३८॥ परी कापुराच्या ठाईं । कापुरावांचूनि
नाहीं ॥ तैसा रीति भलतेययाही । हाचि यया ॥ २३९॥ आतां
दृश्यपणें दिसो । कां द्रष्टा होऊनि असो ॥ परी हा वांचूनि
अतिसो । नाहीं येथें ॥ २४० ॥ गंगा गंगापणें वाहो । कीं
सिंधु होऊनि राहो ॥ परी पाणीपण नवलावो । न देखो
कीं ॥ २४१ ॥ थिजावें कीं विघरावें । हें अप्रयोजक आघवें ॥
घृतपण नव्हे । अनारिसें ॥ २४२ ॥ ज्वाला आणि वन्ही ।
न लेखिजति दोन्ही ॥ वन्हीमात्र म्हणौनी । आन नव्हे कीं ॥ २४३ ॥
अलंकार व सोनें यांमध्ये एक सुवर्णच आहे. कारण सुवर्णात दुसरें
कांहींच नाहीं. २३६. जल व तरंग या दोहोंत जलावांचून कांहीं नाहीं
म्हणून जल व तरंग असा भिन्न शब्दप्रयोग झाला तरी जलाव्‍यतिरिक्त
कांहीं नाहीं व होणारहि नाहीं. २३७. नाकानें वास कळो, हाताला मऊ
लागो, डोळ्यानें स्वच्छ दिसो; कोणत्याहि प्रकारें ज्ञान झालें तरी कापुराच्या
ठिकाणीं कापुरावांचून दुसरें कांहींच नाहीं, त्याप्रमाणें कोणत्याहि प्रकारानें
आत्मा दिसला तरी ह्या आत्म्यावांचून दुसरें कांहीं नाहीं. २३८-२३९.
आतां व्यवहारांत आत्मा दृश्य होऊन दिसो किंवा द्रष्टा होऊन असो, पण
या दृश्यद्रष्टा व्यवहारांत आत्मव्यतिरिक्त दुसरें कांहीं नाहींच. २४०.
गंगानदी गंगारूपानें वाहो किंवा समुद्रास मिळून तद्रूपानें असो, पण
पाण्याच्या दृष्टीनें त्यांत कांहींच फरक दिसत नाहीं. २४१. तुपाला घट्ट अगर
पातळ असें म्हणणें निरर्थक होय, कारण दोन्ही स्थितीत तूपपणा निराळा
नाहीं. २४२. ज्वाला व अग्नि हीं दोन्ही निराळीं आहेत असें म्हणता
येणार नाहीं. कारण तीं दोन्ही वन्हिरूपच आहेत. २४३.