अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 98, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ेंप्रकरण सातवें ९७
तरी कां निमित्य पिसें । हा यया दाऊं बैसे ॥ देखते नाहीं
तैं आरिसे । देखावे कोणे ॥ २३० ॥ दीपु दावीतयाते रची ।
कीं तेणेंचि सिद्धी दीपाची । तैशी सत्ता निमित्ताची । येणें
साच ॥ २३१ ॥ वन्हीतें वन्ही शिखा । प्रकाशी कीर देखा ॥
परी वन्हीहूनी लेखा । येईल काई ॥ २३२ ॥ आणि
निमित्त जें बोलावें । तें येणें दिसोनि दावावें ॥ देखिलें तन्ही
स्वभावें । दृश्यही हा ॥ २३३ ॥ म्हणौनी स्वयंप्रकाशा यया ।
आपणपे देखावया ॥ निमित्त हा वांचोनियां । नाहींच मा
॥ २३४ ॥ भलतेन विन्यासें । दिसत तेणेंचि दिसे ॥ हा
वांचूनि नसे । येथें कांहीं ॥ २३५ ॥
अहो ! तर मग आपणास दाखवावें असें वेड काय निमित्तानें घेतलें ?
अरे ! पहाणाराच नाहीं, मग आरशांत पहावें कोणीं ? २३०. दिवा
लावणाराची सिद्धी दिव्यानें केली का लावणाऱ्यामुळेच दिव्याची सिद्धी
झाली ? त्याप्रमाणें पूर्वसिद्ध आत्मसत्ताच व्यवहाराला निमित्त आहे आणि या
आत्मसत्तेनेंच व्यवहारास खरेपणा भासतो. २३१. अग्नीची ज्वाला अग्नीला
प्रकाशित करिते हे निश्चित खरें आहे असें दिसतें, पण ती ज्वाला
अग्नीहून भिन्न आहे असें म्हणतां येईल का ? २३२. आणि हा आत्मा
दृश्य होऊन आपणांस दाखवितो, म्हणून हा निमित्त आहे असा बोलण्याचा
व्यवहार होतो. आतां दृश्य काय आहे असें पाहूं जावें, तो दृश्यहि हाच.
२३३. म्हणून या स्वयंप्रकाश परमात्म्याला स्वतःला पहाण्याला ह्याच्या-
वांचून दुसरें निमित्त नाहीं. २३४. कोणताही विस्तार याच्याच सत्तेनें
दिसतो ! याच्यावांचून दुसरें कांहींच नाहीं. २३५.
सा. अ....७