अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 97, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ें९६ सार्थ अमृतानुभव
आरशानें हो कां दाविलें । तन्ही मुखचि मुखें देखिलें ॥ तो
न दावी तन्ही संचलें । मुखचि मुखीं ॥ २२४ ॥ तैसें दाविते
नाहीं । तरी हाचि ययाच्या ठाईं ॥ ना दावी तन्हीही । हाचि
यया ॥ २२५ ॥ जाग्रति दाविला । कां निदा हारविला ॥ परी
जैसा येकिला । पुरुष पुरुषीं ॥ २२६ ॥ कां रायातें तूं रावो ।
ऐसा दाविजे प्रत्ययो । तन्ही टायेठावो । राजाचि असे ॥२२७॥
नातरी रायपण राया । नाणिजे कीं प्रत्यया ॥ तन्ही कांहीं
उणे तया । माजी असे ॥२२८॥ तैसें दावितां न दावितां । हा
यया परौता ॥ चढेना तुटे आइता । असताचि असे ॥ २२९ ॥
आरशानें दाखविले तरी मुखानेंच मुखाला पाहिले. आरशानें मुखाला
दाखविले नाहीं तरी मुख मुखाचे ठिकाणीं एकवटलेलें आहेच. २२४.
त्याप्रमाणें दृश्य संबंध नसला तरी आपल्या ठिकाणीं हा आहे, तसाच आहे.
किंवा दृश्यानें दाखविला तरी पण हाच आहे. २२५. जागृतीनें दाखविला
किंवा झोपेनें लपविला तरी पुरुष आपले ठिकाणीं एकटा आहे तसाच आहे
२२६. अथवा राजाला 'तूं राजा आहेस' असें त्याच्या प्रत्ययास आणिले
तरी (म्हटले किंवा न म्हटले) राजा आपले ठिकाणीं आहे तसा असतोच.
२२७. अथवा राजाला 'तूं राजा आहेस' असें शब्दानें प्रत्ययास आणले
नाहीं तरी (म्हटले नाहीं तरी) त्याच्या राजेपणास कांहीं कमीपणा येतो
काय ? २२८. त्याप्रमाणें हा ज्ञानानें दाखविला किंवा अज्ञानानें दाखविला
तरी तो या दोन्ही भावातीत असल्यामुळे उत्कर्षास येत नाहीं व कमीहि
होत नाहीं; स्वतःसिद्ध आहे तसाच आहे. २२९.