सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 93, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 93

९२ सार्थ अमृतानुभव
आणि न पाहणें मा कैसें । आपणपें पाहों बैसें ॥ तरी
पाहणें हें ऐसें । हाचि पुढती ॥ १९९ ॥ हें दोन्ही परस्परें ।
नांदती एका हारें । बांधोनि येरयेरें । नाहीं केलें ॥ २०० ॥
पाहणया पाहणें आहे । तरी न पाहणें हेंचि नव्हे ॥ म्हणोनि
याची सोये । नेणती दोन्ही ॥ २०१ ॥ एवं पाहणें न पाहणें ।
चोरोनियां असणें ॥ ना पाहे तरी कोणें । काय पाहिलें
॥ २०२ ॥ दिसत्यानें दृश्य भासे । म्हणावेना देखिलें ऐसें ॥
तरी दृश्यास्तव दिसे । ऐसें नाहीं ॥ २०३ ॥ दृश्य कीर
दृष्टीसी दिसे । परी साच कीं द्रष्टा असे ॥ आतां नाहीं तें कैसें ।
देखिलें होय ॥ २०४ ॥
आणि द्वैताभावामुळे न पाहाणें हेंच त्याचे स्वरूप आहे, तर तो आपणां
स्वतःला कसें पाहतो ? यावर उत्तर असें कीं तो नित्य ज्ञानस्वरूप आहे;
म्हणून स्वतःला पाहात नाहींच. १९९. पाहणें न पाहणें हे दोन्ही भाव
एका पंक्तीलाच बसतात. त्यांनी एकमेकांस बांधून घेऊन आपापला नाश
करून घेतला. २००. अथवा पाहणारा पाहणें स्वरूपच आहे म्हणून तेथें
न पाहणें संभवतच नाहीं, म्हणून दोघांचा शुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणीं
कांहीं संबंध नाहीं. २०१. याप्रमाणें ' पाहणें व न पाहणें ' या दोन्ही
भावांना चोरून स्वरूप स्थिति आहे, अथवा ' पाहिलें ' असें म्हटलें तरी
कोणीं काय पाहिलें ? २०२. दृश्य द्रष्ट्यावर दिसलें तर त्यानें पाहिलें असें
म्हणूं नये काय ? नाहीं. अरे, दृश्याच्या अपेक्षेनें त्याला दिसतें असें
नाहीं. कारण द्रष्ट्याचे पाहाणें अपेक्षित नाहीं. तात्पर्य, दृश्याला द्रष्ट्याहून
भिन्न सत्ताच नाहीं. २०३. दृष्टीला दृश्य दिसतें असें खात्रीनें भासते
मात्र, पण तसें पाहिलें तर जर द्रष्टाच असतो. दृश्य नाहीच, मग तें पाहिले
म्हणतां येईल काय ? २०४.