अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 92, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ेंप्रकरण सातवें ९१
काय आपुलिये भूमिके । आरसा आपुलिये निके ॥ पाहो
न पाहो सके । हें कें आहे ॥ १९३ ॥ समोर पाठीमोरया ।
मुखें होऊं ये आरसिया ॥ वांचूनि तयाप्रति तया । होआवे कां
॥ १९४ ॥ सर्वांगें देखणा रवी । परी ऐसें घडे केवी ॥ जे उदो
अस्तूची चवी । स्वयें घेपे ॥ १९५ ॥ कीं रसु आपणया पिये ।
कीं तोंड लपवूनि ठाये ॥ हें रसपण नव्हे । तया जैसें ॥ १९६॥
तैसें पाहाणें न पाहणें । पाहणेंपणेंचि हो नेणें ॥ आणि दोन्ही हें
येणें । स्वयेंचि असिजे ॥१९७॥ जें पाहणेंचि म्हणूनियां । पाहणें
नव्हे आपणया ॥ तैं पाहणें आपसया । हाचि आहे ॥ १९८ ॥
आपला निर्मळपणा आपल्या ठिकाणीं आरसा पाहूं शकतो किंवा पाहूं
शकत नाहीं या म्हणण्यांत अर्थ काय ? १९३. आरशाच्या योगानें समोर
किंवा पाठमोर ही स्थिति मुखाला येते, तोच आरसा टाकला असतां मुख
पाठमोरें किंवा समोर, ही स्थिति येणें शक्य आहे काय ? मुख, समोरपणा
व पाठमोरेपणा या विरहित स्वरूपानें असतें. १९४. सर्वांगानें सूर्य प्रकाश-
मान असला तरी आपल्या उदयास्ताला तो स्वतः पाहतो असें कसें घडेल ?
१९५. किंवा रस आपल्या स्वतःला पीत नाहीं असें म्हणावें तर रस
आपलें तोंड लपवून काय एकीकडे बसतो ? रस रसपणानेंच असल्यामुळे
त्याच्या ठिकाणीं हे दोन्ही भाव नाहींत. १९६. याप्रमाणें आत्मा ज्ञान-
स्वरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणीं पाहाणेंपणाचा व न पाहणेंपणाचा
व्यवहार नाहीं; पण तो स्वतःच दोन्ही प्रकारांत असतो. १९७. वस्तु रूप
पाहणें असल्यामुळे तेथें तिचा पाहणेंपणा संभवत नाहीं, यावरून हें सहज
सिद्ध होतें कीं, हा स्वतःला पाहत नाहीं १९८.