सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 91, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 91

उठिला तरंगु बैसे । पुढें अनुही नुमसे ॥ ऐसा ठांईं जैसें ।
पाणी होय ॥ १८६ ॥ कां नीद सरोनि गेली । जागृति नाहीं
चेइली ॥ तेव्हां होय आपुली । जैसी स्थिति ॥ १८७ ॥ नाना
एका ठाऊनि उठी । अन्यत्र नव्हे पैठी ॥ हें गमे तैसिया दृष्टी ।
दिठी सूता ॥ १८८ ॥ कां मावळो सरला दीवो । रात्रीचा न
करी प्रस्तावो ॥ तेणें गगनें हा भावो । वाखाणिला ॥ १८९ ॥
घेतला श्वासु बुडाला । घापता नाहीं उठिला ॥ तैसा दोहीं शिव-
तला । नव्हे जो अर्थु ॥ १९० ॥ कीं आघावियांची करणीं ।
विषयांची घेणीं ॥ करितांचि एके क्षणीं । जें कीं आहे ॥ १९१ ॥
तया सारिखा ठावो । हा निकराचा आत्मभावो ॥ येणें कां
पाहे । न पाहों लाभे ॥ १९२ ॥
पाण्यावर उठलेला तरंग मावळला, पुढें दुसरा तरंग उठला नाहीं, ही
पाण्याची अवस्था, १८६. किंवा निद्रा संपली, जागृति उत्पन्न झाली नाहीं
अशी अवस्था, १८७. अथवा दृष्टि एका वस्तूवरून उठली, दुसऱ्या वस्तूवर
गेली नाहीं, अशा मध्य संधींत असणाऱ्या दृष्टीनें जो पाहील, त्यालाच ही
योग भूमिका कळेल. १८८. दिवस मावळला, रात्र पडली नाहीं अशा
वेळच्या गगनाच्या स्थितीनें आम्हीं हा परमात्मभाव वर्णन केला आहे.१८९.
घेतलेला श्वास बुडाला, दुसरा श्वास घेतला नाहीं, या दोन अवस्थांना न
स्पर्शतां जी प्राणाची स्थिति, तशी ती स्थिति आहे, १९०. अथवा सर्व
इंद्रियांकडून विषय उपभोगणें चाललें असतांहि, त्या कालीं मधली क्षणमात्र
जीं अवस्था ती योगभूमिका, म्हणजे प्रमात्याची जी स्थिति असते ती. १९१
त्या स्थितीप्रमाणें आत्म्याचें शुद्ध स्वरूप आहे. अशा स्थितींत शुद्ध
आत्म्याच्या ठिकाणीं ' पाहणें न पाहणें ' प्राप्त होईल का ? १९२