अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 90, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ेंप्रकरण सातवें ८९
किंबहुना आपुलिया । प्रतिबिंबा झोंबिनलिया ॥ झोंबी सकट
आटोनियां । जाइजे जेवीं ॥ १७९ ॥ तैसे रुसतां दृष्टीं । द्रष्टा
दृश्य भेटी ॥ येती तेथें मिठी । दोहींची पडे ॥ १८० ॥ सिंधु
पूर्वापर । न मिळती तंवचि सागर । मग एकवट नीर । जैसें
होये ॥१८१॥ बहु ये हे त्रिपुटी । सहजें हो तया राहटी ॥
प्रतिक्षणीं काय ठो । करोतसे ॥ १८२ ॥ दोन्ही विशेष गिळी ।
ना निर्विशिष्टातें उगळी ॥ उघडी झांपी एकी डोळी । वस्तूची
हे ॥ १८३ ॥ पातया पातें मिळे । कीं द्रष्टत्वें सैंध पघळे ॥
तिये उन्मळितां मावळे । नवलावो हा ॥१८४॥ द्रष्टा दृश्याच्या
ग्रासीं । मध्यें लेख विकाशी ॥ योगभूमिका ऐशी । आंगीं
वाजे ॥ १८५ ॥
फार काय सांगावें ? ज्याप्रमाणें एखादा पुरुष प्रतिबिंबाला आलिंगन
देऊं लागला असतां आलिंगनासकट बिंबप्रतिबिंबभाव आटतो. १७९.
त्याप्रमाणें दर्शन नाहींसें होतांच द्रष्टा दृश्याचे भेटीस येतो व त्या भेटींत
दोघांचें ऐक्य होतें, १८०. पूर्वेचा आणि पश्चिमेचा असे दोन वेगळाले
समुद्र एकमेकांस मिळत नाहींत, तोपर्यंत त्यांस सागर असें नांव असतें.
मिळाले, म्हणजे मग सर्व पाणीच होतें. त्याप्रमाणें आत्मा निर्धर्मक आत्म-
स्वरूपानें असतो १८१. या अनंत त्रिपुट्यांचा सहज व्यवहार होत
असतांना, प्रत्येक क्षणीं त्यांचा काय निश्चय करावा लागतो ? १८२.
दृश्य-द्रष्टा हे दोन्ही भाव, आत्मा गिळीत नाहीं. व निर्विशिष्ट भाव ओकी-
तहि नाहीं; पण उघडझांपीचे भाव वस्तु आपल्याच अंगावर दाखविते. १८३.
डोळ्याच्या पात्याला पातें लागतांच दृश्य सृष्टि विस्ताराला पावते व तीच
पातीं किंचित् उघडतांच सर्व सृष्टि मावळते, हें विशेष आहे. १८४. द्रष्टा
व दृश्य यांचा ग्रास झाला असतां मध्यंतरी जी स्थिति उत्पन्न होते, त्या
स्थितीसच योगभूमिका असें म्हणतात. १८५.