अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 89, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ें८८ सार्थ अमृतानुभव
ऐसें हें देखणें न देखणें । हें आंधारें चांदिणें ॥ मा चंद्रासी
उणें । स्फुरतें कां ॥ १७२ ॥ म्हणोनि हें न व्हावें । ऐसेंही करूं
पावे ॥ तरी तैसाचि स्वभावें । आइता असे ॥ १७३ ॥ द्रष्टा
दृश्य ऐसें । दोनी अळुमाळ दिसे ॥ तेंही परस्परानुप्रवेशे ।
कांहींना कीं ॥ १७४ ॥ तेथें दृश्य द्रष्टा भरे । द्रष्टेपण दृश्यीं
सरे ॥ मा दोन्ही न होऊनि उरे । दोहींचें साच ॥ १७५ ॥
मग भलतेथ भलतेव्हां । माझारिले दृश्य दृष्ट भावा ॥ आटणी
करीत खेवा । येती दोन्ही ॥ १७६ ॥ कापुरीं अग्निप्रवेशु । कीं
अग्नीं घातला पोतासु ॥ ऐसें नव्हे संसरिसु । वेचु झाला ॥१७७॥
एका एकु वेचला । शून्यबिंदु शून्यें पुशिला ॥ द्रष्टा दृश्याचा
निमाला । तैसें होय ॥ १७८ ॥
सारांश देखणें न देखणें आत्म्याच्या ठिकाणीं नाहीं. हा अंधकार व हा
प्रकाश अशा समविषम भावाची स्फूर्ति चंद्राच्या जवळ कुठे आहे ? १७२.
म्हणून ही त्रिपुटी आपण होऊं नये अशी स्फूर्ति झाली तरी स्वभावतः
तो तसा सिद्धच आहे. १७३. द्रष्टा व दृश्य असे दोन भाव जरी थोडेसे
दिसतात तरीं दोघांचा परस्परांत प्रवेश झाला असतां दोन्हीही भाव नाहींसे
होतात. १७४. तेव्हां द्रष्टा दृश्यांत दृश्य द्रष्ट्यांत नाहींसें होतें; मग दोघांचा
अभाव होऊन दोघांचे अधिष्ठान मात्र शिल्लक राहतें. १७५. मग वाटेल तेथें,
वाटेल त्या वेळीं, दृश्य द्रष्टा हे दोन भाव आपलीं आटणी करून मध्य-
दर्शन संबंधांत एकरूप होतात. १७६. अग्नीचा कापुरांत किंवा कापुराचा
अग्नींत प्रवेश झाला असें कशाला म्हणावें ? कारण दोघांचा नाश एक-
दमच होतो. १७७. एकांतून एक वजा केला असतां बाकी शून्य राहते !
व तें शून्य आपला स्वतःचा अभाव दाखवितें; त्याचप्रमाणें द्रष्टा व दृश्य
यांची वाटणी झाली असता होतें. १७८.