अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 5, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ अमृतानुभव
प्रकरण पहिलें
श्लोक
यदक्षरमनाख्येयमानंदमजकेवलम् ॥ श्रीमन्निवृत्तिनाथेति
ख्यातं दैवतमाश्रये ॥ १॥ गुरुरित्याख्यया लोके साक्षाद्विद्या हि
शांकरी ॥ जयत्याज्ञा नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम् ॥ २॥ सार्धं
केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ॥ ज्ञातुं न शक्यते लग्न-
मिति द्वैतच्छलान्मुहुः ॥३॥ अद्वैतत्मनस्तत्त्वं दर्शयन्तौ मिथस्तराम् ॥
तौ वन्दे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये ॥४॥ मूलायाग्राय मध्याय
मूलमध्याग्रमूर्तये ॥ क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे ॥५॥
या प्रकरणाच्या सुरुवातीस श्रीज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना
वंदन करतांना म्हणतात-श्रीमान् महायोगी श्रीनिवृत्तिनाथ हे ( माझे सद्-
गुरु ) दैवत निर्विकार आणि आनंदरूप आहे. त्याला उत्पत्ति नाही, त्याला
नाशहि नाहीं. त्या दैवताचें वर्णन करतां येत नाहीं. त्या दैवताचा मी
आश्रय घेतों. १. या जगांत सर्व विद्यांमध्यें श्रेष्ठ आणि आनंद देणाऱ्या
ज्ञानरूप ब्रह्मविद्येचा जयजयकार असो. दयाळू विद्यामाउलीला मी वंदन
करतों. २. शिवशक्तीच्या रूपांत द्वैताचा एकसारखेपणामुळें आभास होतो.
ह्या दोहोंपैकीं कोणाच्या आश्रयानें दुसरे कोण आहे हें समजणें, तसेंच
यांतील सार्ध कोण हें कळणेंहि दुरुपास्त आहे. ३. ब्रह्म या आपल्या मूळ
स्वरूपाच्या बाबतींत शिव आणि शक्ति दोघेहि अभिन्नता दाखवितात. हीं
दोन्हीं जगताचें मूळ कारण आहेत. या दोघांच्या मूळ स्वरूपाचा म्हणजेच
ब्रह्मस्वरूपाचा लाभ व्हावा यासाठीं मी शिवशक्तीला नमन करतों. ४.
विश्वाच्या आरंभाला, अस्तित्वाला आणि विलयाला श्रीशंभु हाच कारण
आहे. निमित्तोपादानहि तोच आहे म्हणून आदि-मध्य-अंत अभिन्नत्वानें तोंच
आहे. पण हीं सारीं त्याच्या ठिकाणीं नाहींतच. आपल्या रूपानें परिपूर्ण
असणाऱ्या परमात्म्याला मी वंदन करतों. ५.