अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 42, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ेंप्रकरण पांचवें ४१
एवं सच्चिदानन्दु । आत्मा हा ऐसा शब्दु ॥ अन्वयवृत्तिसिद्धु ।
वाचक नव्हे ॥ १३ ॥ सूर्याचेनि प्रकाशें । जें कांहीं जड
आभासे ॥ तया तो गिवसे । सूर्य काई ॥ १४ ॥ तेवि जेणें
तेजें । वाचेसी वाच्य सुजे ॥ ते वाचा प्रकाशिजे । हैं कें आहे
॥ १५ ॥ विषो नाहीं कोणाही । जया प्रमेयत्वचि नाहीं ॥
तया स्वप्रकाशा काई । प्रमाण होये ॥ १६ ॥ प्रमेयपरिच्छेदें ।
प्रमाणत्व नांदे ॥ तीं काई स्वतःसिद्धे । वस्तूच्या ठाईं ॥ १७॥
एवं वस्तूशीं जाणों जातां । जाणणेंचि वस्तू तत्त्वता ॥ मग
जाणणें आणि जाणतां । कैचा उरे ॥ १८ ॥
याप्रमाणें श्रुतीनें ' सच्चिदानंद आत्मा ' असा केलेला शब्दप्रयोग
निराळेपणानें न राहतां मूळ शुद्ध परमात्म स्वरूपांतच लयाला जातो; १३.
यच्चयावत् जड पदार्थ सूर्यप्रकाशानें प्रकाशित होतात, त्या जड पदार्था-
कडून सूर्य प्रकाशित केला जाईल का ? १४. ज्याप्रमाणें ज्या परमात्म्याच्या
ज्ञानानें वाणी सर्व जड-वाच्य घटादिकांचे तेजरूपानें ज्ञान करून देतें तीं
वाणी स्वयंप्रकाशरूप परमात्म्याची ओळख करून देईल काय ? १५.
परमात्म्याला प्रमेयत्व नाहीं म्हणून तो कोणालाही विषय होत नाहीं.
मग या स्वयंप्रकाश आत्म्याची सिद्धि प्रमाणांनीं कशी होणार बरें ? १६.
प्रमाणाला प्रमाणत्व हे प्रमेयाला व्यापून येते; म्हणजे प्रमाण प्रमेयाचे
ज्ञान करून देतें; परंतु स्वतःसिद्ध परमात्मवस्तूच्या ठिकाणीं प्रमाणांचा
कितीसा प्रभाव पडणार ? १७. आत्मवस्तूला विषय करून याप्रमाणें
जाणावयाचे म्हटले तर वस्तू ज्ञानरूपच असल्यामुळे जाणणें व जाणणारा
हा भेद राहीलच कसा ? १८.