अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 43, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ें४२ सार्थ अमृतानुभव
म्हणोनी सच्चित्सुख । हे बोल वस्तुवाचक ॥ नव्हती हें शेष
विचारांचें ॥१९॥ ऐसेन इयें प्रसिद्धें । चाललीं सच्चिदानंदपदें ॥
मग द्रष्ट्या स्वसंवादे । भेटती जेव्हां ॥ २० ॥ ते वेळीं वर्षोनी
मेघु । समुद्र होऊनि वोघु ॥ सरे दाऊनी मागु । राहे जैसा
॥२१॥ फळ विऊनी फूल सुके । फळ नाशे रसपाकें ॥ तोही
रस उपखे । तृप्तिदानीं ॥२२॥ कां आहुति अग्नीआंत । घालूनि
वोसरे हात ॥ सुख चेवऊनि गीत । उगा राहे ॥ २३ ॥ नाना
मुखा मुख दाऊनी । अरिसा जाय निघौनि ॥ कां निदेलें चेव-
उनी । चेवितें जैसें ॥२४॥ तैसें सच्चिदानंदा चोखटा । दाऊनि
द्रष्टया द्रष्टा ॥ तिन्हीं पदें लागती वाटा । मौनाचिया ॥ २५ ॥
म्हणजेच सत्, चित्, सुख हें शब्द वस्तुवाचक नाहीत; हेंच सर्व
विचारमंथनाचें तात्पर्य आहे. १९. सच्चिदानंदादि शब्दाचा उपयोग
इतक्या मर्यादितच आहे. द्रष्ट्याला आपल्या वास्तविक स्वरूपाचा जेव्हां
बोध होतो, २०. त्याप्रमाणें मेघ वर्षून, नदीचा ओघ समुद्राला मिळाल्या-
वर संपतो; चोरीस गेलेल्या पदार्थांचें ठिकाण दाखवून, माग संपतो. २१.
फळाला जन्म देऊन फूल सुकते, रस तयार केल्यावर फळ नाहींसें होते
व तृप्ती देऊन रसहि लुप्त होतो. २२. अग्नींत आहुति घालून हात माघारी
फिरतो, किंवा सुख देऊन गाणें बंद होते. २३. मुखाला मुख दाखविल्यावर
आरशाचे काम संपते, किंवा निजलेल्या पुरुषाला जागें करून, जागा
करणारा निघून जातो; २४. त्याप्रमाणें सच्चिदानंद हीं तीन पदें झाल्याला
आपलें यथार्थ परमात्मरूप दाखवून आपण मौन स्वीकारतात. २५.