सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 41, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 41

४० सार्थ अमृतानुभव
सत्ताचि कीं सुखप्रकाशु । प्रकाशूचि सत्ता उल्हासु ॥ हे
न निवडे मिठांशु । अमृतीं जेवीं ॥ ७ ॥ शुक्लपक्षाच्या सोळा ।
दिवसा वाढती कळा ॥ परी चंद्र मात्र सगळा । चंद्रीं जेवीं
॥८॥ थेंबीं पडतां उदक । थेंबां धरूं ये लेख ॥ परी पडिलाठायीं
उदक । वांचूनि आहे ॥ ९ ॥ तैसें असताचिया व्यावृत्ति । संत
म्हणूं आले श्रुति ॥ जडाचिया समाप्ती । चिद्रूप ऐसें ॥ १० ॥
दुःखाचेनि सर्व नाशे । उरलें तें सुख ऐसें ॥ निगदिले विश्वासें ।
प्रभूचेनी ॥ ११ ॥ ऐशी सदादि प्रतियोगिये । असदादि तिन्हीं
ये ॥ लोटितां झाली त्राये । सत्तादिकां ॥ १२ ॥
अमृतांतील गोडी ही जशी वेगळी काढतां येत नाहीं, त्याप्रमाणें सत्-
रूपी आत्मा चित्‌रूप व आनंद आहे कीं, चित्‌रूप आत्मा सद्रूप व
आनंद आहे, याचा भेद दाखवितां येणार नाहीं. ७. शुद्ध पक्षांत प्रत्येक
दिवशीं एकेका कलेनें पूर्ण होत तो चंद्र शेवटीं पूर्ण होतो; तरी या सर्व
घडामोडींत चंद्र मात्र सर्वस्वीं एकच असतो. ८. पाऊस थेंबाथेंबानें पडतो. जर
हें थेंब मोजून एकत्र करावयाचे ठरवलें तर पाण्याशिवाय दुसरे तेथें काय
दिसेल ? ९. त्याचप्रमाणें असताच्या निरसनासाठीं श्रुति 'सत्' असे म्हणूं
लागल्या. अचेतनाच्या निरसनासाठीं 'चित्' म्हणूं लागल्या, सर्व दुःखांच्या
निवृत्तीनंतर जें असतें त्याचप्रमाणें असताचे निराकरण करण्याकरितां सत्
शब्दाचा प्रयोग केला व जडाच्या निवृत्तीकरितां चित् शब्द योजला.
१०. सुख हे दुःखाचा नाश झाल्यावर उरते. दुःखाच्या सर्वनाशाकरितां
प्रभूचा निश्वास जो वेद त्यानें सुखशब्दाचा प्रयोग केला आहे. ११.
सदादि तीन शब्दांनीं प्रतियोगी असदादि तीन शब्दांचा नाश केला; व
यांच्या नाशाबरोबर 'सदादि' आपोआप नष्ट झालें. १२.