सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 40, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 40

प्रकरण पांचवें
सत्ता प्रकाश सुख । या तिन्हीं तिन्हींउणे लेख ॥ जैसें विष-
पणेंचि विख । विखा नाहीं ॥ १ ॥ कांति काठिण्य कनक ।
तिन्ही मिळोनि कनक एक । द्राव गोडी पियूख । पियूखाचि
जेवि ॥२॥ उजाळ दृति मार्दव । या तिन्हीं तिन्हीं उणीव ॥
हे देखिजे सावेव । कापुरीं येके ॥३॥ आंगे कीर उजाळ ।
कीं उजाळतांचि मवाळ ॥ कीं दोन्ही ना परिमळ । मात्र जे
॥४॥ ऐसे ये कापूरपणीं । तिन्हीं इये तिन्हीं उणी ॥ इयापरी
आटणी । सत्तादिकांचा ॥५॥ येन्हवी सच्चिदानंद भेदें ।
चालिलीं तिन्हीं पदें ॥ परी तिन्हीं उणीं आनंदें । केलीं येणें
॥ ६ ॥
सत्ता, प्रकाश व सुख या तीन शब्दांचा प्रयोग, असत्, जड व दुःख
यांची व्यावृत्ती करण्याकरितां श्रुतीनें केला आहे. म्हणून स्वगतभेद होत
नाहीं. १. जसें विष विषपणानेंच असल्यामुळे ते स्वतःला विष होत नाहीं.
सोनें जसें तेज, कठीणपणा व पिवळेपणा हे तिन्ही मिळून होते, अथव,
पातळपणा, गोडी व पांढरेपणा हें तिन्हीं मिळून दूध; २. पांढरेपणा
सुगंध, मऊपणा हे तीनही धर्म त्या एकमेकांत नसतात, तरी कापुराच्या
ठिकाणीं दिसतात; ३. अंगचा स्वच्छपणा तोच मऊपणा आणि हे दोन्ही
मिळून परिमलमात्र जसा एक कापूरच; ४. आपल्या विरोधी धर्माचा निषेध
करणारे हे तीन धर्म एका कापूरपणांत परिमळपात्रांत जसें एकवटतात,
तसा सत्तादिपदाचा आनंदस्वरूप ब्रह्मांत एकमेळ होतो. ५. इतर वेळी
सत्, चित् आणि आनंद हीं तीन पदें आपल्याला वेगळ्या अर्थांनीं
चालतात, पण या एका परमात्म्यानें त्यांना अभिन्न केलें. ६.