सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 39, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 39

३८ सार्थ अमृतानुभव
निंदेचे नाहीपण । निमालियाही जागेपण ॥ असिजे कां नेण ।
कोणी होऊनि जैसे ॥४१॥ कां भूमि कुंभ ठेविजे । तैं सकुं-
भता आपजे ॥ तो नेलिया म्हणिजे । तेणेंविणें ॥४२॥ परी
वेळीं हें भाग । न शिवती भूमीचें आंग ॥ तें वेळीं भूमि
तैसे चांग । चोख जें असणें ॥४३॥
इति श्रीसिद्धानुवाद श्रीमदनुभवामृते ज्ञानअभेदकथनं
नाम चतुर्थप्रकरणं संपूर्णम् ॥
झोंप संपल्यावर तत्संबंधीं जागृतीचें ज्ञान असतें, पण तेंहि गेल्यानंतर
मग निद्रा व जागेपणा असतो, पण त्याचें भान मात्र नसतें. ४१. घट
जमिनीवर ठेविला असतां तिला ' सकुंभता ' येते. तो घट बाजूला
केल्यावर ' निकुंभता ' येते. ४२. पण या दोन्ही धर्मांचा जमिनीला स्पर्श
न होतां ती मूळ रूपांत कायम असतें. हें जसें, तसें आत्म्याचें रूप चोख
म्हणजे शुद्ध, सर्वधर्मरहित शब्दाच्या पलीकडचें आहे. ४३.
याप्रमाणें श्रीमत् अमृतानुभव ग्रंथांतील ज्ञानाज्ञान-भेदकथननामक
चौथें प्रकरण समाप्त झालें.
प्रकरण चौथें समाप्त
—x—