अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 38, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ेंप्रकरण चौथें ३७
दिठी आपणया मुरडे । तैं दिठीपणही मोडे ॥ परी नाहीं
नव्हे हें फुडे । जाणेंचि ते ॥ ३५ ॥ कां काळ राहे काळवखा ।
तो आपणा ना आणिकां ॥ न चोजवे तन्ही आसिका । हा मी
बाणे ॥ ३६ ॥ तैसें असणें कां नसणें । हें कांहींच मानूसवाणे ॥
असोनि असणे । ठायें ठावो ॥ ३७ ॥ निर्मळपणीं आपुला ।
आकाशाचा संचु विराला ॥ तो स्वयें असे पुढिला । कांहीं
ना कीं ॥ ३८ ॥ कां आंगीं कीं निर्मळपणीं । हारतलिया
पोखरणीं ॥ हें आणिका वांचूनि पाणी ॥ सगळेंच आहे ॥ ३९॥
आपणया भागू तैसें । आपणेंचि जें असे ॥ असेंनाहीं ऐसें ।
सांडूनियां ॥ ४० ॥
दृष्टीचें पाहणेंपण ती मागें वळून आपल्याकडे पाहतें तेव्हां मोडतें;
पण तीं नाहीं असें मात्र नव्हे; कारण पाहाणेंपण हें तिचें रूप आहे. ३५.
किंवा रंगानें काळा माणूस अमावास्येला अंधारांत उभा राहिला तर तो
आपल्यास व दुसऱ्यास दिसत नाहीं. तरीहि ' मी आहे ' हें ज्ञान त्यास
नक्की असतें. ३६. त्याप्रमाणें परमात्म्याचे ठिकाणीं असणें अगर नसणें
हें कांहींच मानण्यासारखें नाहीं; कारण परमात्मा स्वतःच्या ठिकाणीं
आहे तसाच आहे. ३७. स्वभावतः स्वच्छ आकाशाची व्याप्ति इतर
वस्तूंच्या सान्निध्यामुळें विकृत दिसली तरी तें स्वस्वरूपतेंत असतें तसेंच
असतें, फक्त बघणारास तसें दिसत नाहीं. ३८. किंवा झऱ्याचें स्वच्छ
पाणी आटलें असतां तें तेथें पाणीपणानें असतें, पण पाहणारास मात्र तसें
दिसत नाहीं. ३९. त्याप्रमाणें आत्मस्वरूपाच्या बाजूनें पाहिलें असतां,
आत्मा, आहेपण व नाहींपण सोडून, मूळ असणेंपणानेंच असतो. ४०.