सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 34, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 34

प्रकरण चौथें ३३
वात दशाही ते निमालियां । येणें जें ये उत्राया ॥ तें केवळ
नाशावया । दीपाचे परी ॥ ७॥ उठणे कीं पडणें । कुच-
भाराचे कोण जाणे ॥ कां फांकणें कीं सुकणें । जाउळाचें ॥ ८ ॥
तरंगाचें रुषा येणें । तयाचि नांव निमणें ॥ कां विजूचें उदैजणें
तोचि अस्तु ॥ ९ ॥ तैसें पिऊनि अज्ञान । तंववरी वाढे ज्ञान ।
जंव आपुलें निधन । निःशेष साधे ॥ १० ॥ जैसें कल्पांतींचें
भरितें । स्थळां जळां दोहींतें ॥ बुडविलया अरोतें । राहोचि
नेणें ॥ ११ ॥ कीं विश्वाही वेगळ । वाढे जैं सूर्यमंडळ ॥ तैं
तेजतम निखिळ । तेंचि होये ॥ १२ ॥ नाना नीद मारोनी ।
आपणपें हिरोनी ॥ जागणें ठाके होऊनी । जागणेंचि ॥ १३ ॥
तैसें अज्ञान आटोनियां । ज्ञान ये तें उवाया ॥ ज्ञानाज्ञान गिळो-
निया । ज्ञानचि होये ॥ १४ ॥
केवळ आपला नाश करून घेण्याकरितांच वात संपण्याचे वेळीं दिवा
मोठा होतो. ७. स्तनांचे उठणें तेंच पडणें, किंवा जाईच्या फुलाचें तेंच
सुकणें. ८. तरंग उत्पन्न होणें तोच त्याचा नाश किंवा वीज उत्पन्न होणें
म्हणजेच तिचा नाश. ९. त्याप्रमाणें अज्ञानाचा नाश करून ज्ञान किती
वेळ असतें तर आपला निःशेष नाश होईपर्यंत असतें ! १०. प्रलयाच्या
वेळीं पाणी वाढलें कीं, स्थळ व जळ या दोघांचा नाश करून सर्वत्र जलच
असतें. ११. किंवा सूर्यमंडळ विश्वापेक्षांहि वाढलें म्हणजे अंधार व उजेड
दोन्ही नाहींशीं होऊन केवळ सूर्यमंडळ असतें. १२. अगर झोंप गेल्यावर
जागृतीहि जाते व केवळ स्वरूपाची जागृति असते. १३. त्याप्रमाणें
अज्ञानाचा नाश करून ज्ञान उत्कर्षाला येतें व त्याचाहि उत्तरक्षणीं नाश
होतो. १४.
सा. अ. ... ३