सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 33, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 33

प्रकरण चौथे
आतां अज्ञानाचेनि मारें । ज्ञान अभेदें वावरे ॥ नीद साधूनि
जागरें । नांदिजे जेवि ॥ १ ॥ कां दर्पणाचा निघाला । ऐक्य-
बोधू पहिला ॥ मुख भोगी आपुला । आपणचि ॥ २ ॥ ज्ञान
जिया तिया परी । जगीं आत्मैक्य करी ॥ तैं सुरिया खोचे
सुरी । तैसें जाहलें ॥ ३ ॥ लावी आत ठाउनि कोपट । तो
साधी आपणया सकट ॥ कां बांधलेया चोरट । मोटेमाजी ॥४॥
आगी पोतासाचेनि मिसें । आपणपें जाळिलें जैसें । ज्ञाना-
ज्ञाननाशें । तैसें जाहलें ॥ ५ ॥ अज्ञानाचा टेका । नसतांहि
ज्ञान अधिका । फांके जंव उफका । आपुला पडे ॥ ६ ॥
निद्रेच्या नाशानें केवळ जागृतीच नांदते, त्याप्रमाणें अज्ञानाला मारून
ज्ञानच अभेदानें सर्वत्र व्याप्त असतें. १. अथवा आपल्या मुखाहून भिन्न
प्रतिबिंब आरशांत दिसूनहि पाहणारा प्रतिबिंबाशीं असलेली मूळ मुखाची
एकतेची जाणीव अनुभवतोच.२.वेगवेगळ्या प्रकारानें ज्ञान जगाशीं आत्म्याचें
ऐक्य घडवितें असें म्हणणें म्हणजे सुरीनें सुरीला खोचल्याप्रमाणें होईल. ३.
कोशकिडा घरटें तयार करून त्यांत शिरतो व दार बंद करून आपला
आपणच नाश करून घेतो; किंवा चोरी केलेल्या पदार्थांचें गाठोडें बांधून
चोर भीतीनें त्यांतच आपण शिरतो, म्हणजे चोरी केलेल्या पदार्थांसह
धन्याच्या हातीं जाऊन पडतो. ४. किंवा अग्नि कापुराला जाळण्याच्या
मिषानें स्वतःचा नाश करून घेतो, त्याप्रमाणें ज्ञान अज्ञानाचा नाश
करण्याच्या मिषानें स्वतःला नष्ट करते. ५. अज्ञानाचा आधार नसतांनाहि
ज्ञान अधिक वाढून स्वतःचा नाश करून घेतें. ६.