अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 32, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ेंप्रकरण तिसरें ३१
ना वोहळा आंगीं जैसें । पाणी पाणीपणें नसे । तन्हीं
वोल्हासाचेनि मिसें । आधींच ते ॥ २९ ॥ नातरी माध्यान्ह-
काळीं । छाया न दिसे वेगळी ॥ असे पायातळीं । रिगौनियां
॥ ३० ॥ तैसें ग्रासूनि दुसरें । स्वरूपीं स्वरूपाकारें ॥ आपुलेपणें
उरे । बोध जो कां ॥ ३१ ॥ तें ऋणशेष वाचा इया । न फेडवें
मरोनिया ॥ तें पाया पडोनि मियां । सोडविलें ॥ ३२ ॥
म्हणोनि परा पश्यंति । मध्यमा हन भारती ॥ या निस्तारिलिया
लागती । ज्ञानी अज्ञानींची ॥ ३३ ॥
इति श्रीसिद्धानुवादे श्रीमदनुभवामृते वाचाऋणमोचनं
नाम तृतीयप्रकरणं संपूर्णम् ॥ शुभं भवन्तु
ओहळाला पाणी नसलें तरी जागोजागींच्या ओलसरपणावरून ओहोळ
कळतो. २९. बारा वाजण्याच्या वेळीं आपली छाया वेगळी दिसत नाहीं;
पण ती पायांखालीं लपून असते. ३०. त्याप्रमाणें अद्वैती बनून मूळ परमात्मा
स्वरूपाच्या ठिकाणीं स्वबोधाच्या आपलेपणानें उरतोच. ३१. तेंच हें वाचा-
ऋणशेष होय. आपण मरून तें फेडावें म्हटलें तरी तें फिटत नाहीं. म्हणून
मी (श्रीगुरूचें) चरण वंदून, फेडलें. ३२. म्हणून ज्ञानी व अज्ञानी अशा
सर्व पुरुषांनीं या परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी चार वाणींचें ऋण
फेडावें. ३३.
याप्रमाणें श्री अमृतानुभव ग्रंथातील वाचाऋणमोचन नांवाचें तिसरें प्रकरण
संपलें.
प्रकरण तिसरें समाप्त
—x—