अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 31, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ें३० सार्थ अमृतानुभव
परी बहुतां कां दिया । आपणापें आठवलिया ॥ म्हणे मी
यया । कैसा रिझों ॥ २२ ॥ तैसा ज्ञानरूप आत्मा । ज्ञानेंचि
आपुली प्रभा । करितसे सोहमा । ऐसा बंधु ॥ २३ ॥ जें ज्ञान
स्वयें बुडे । म्हणोनी भारी नावडे ॥ ज्ञानें मोक्षु घडे । तें
निमालेनि ॥ २४ ॥ म्हणोनी परादिका वाचा । तो शृंगारु चौ
आंगाचा ॥ एवं अविद्याजीवाचा । जीवत्वत्यागी ॥ २५ ॥
आंगाचेनि ईंधनें उदासु । उठोनि ज्ञानाग्नी प्रवेशु । करी तेथें
भस्मलेशु । बोधाचा उरे ॥ २६ ॥ आंगीं लाविलिया विभूति । ते
परिमाणूही झडती ॥ परी पांडुरत्वें कांति । राहे जैसी ॥ २७ ॥
जळीं जळा वेगळ । कापूर न दिसे अवदळ ॥ परी होऊनि
परिमळु । उरे जेवि ॥ २८ ॥
असा भ्रम कोणाला कदाचित् झाला, आणि कांहीं दिवसांनीं आपलेपण
त्याला आठवलें कीं तो म्हणेल कीं, 'मी हरवलों होतों पण आतां सांपडलों.'
त्याच्या या म्हणण्यानें त्याला आनंद कसा होईल ? कदाचित् मानूं लागला
तर तोही त्याचा भ्रमच होय. २२. आत्मा मूळचा ज्ञानरूप असतांना
सत्त्वगुणासंबंधीं 'मी स्वतः ज्ञानरूप परमात्मा आहें' असें म्हणेल तर तेंच
ज्ञान भ्रम व तोच बंध होय. २३. मूळ स्वरूपज्ञान विसरून गेल्यामुळे
ग्रंथांतून वृत्तिरूप ब्रह्मज्ञानानें पुष्कळ वर्णन केलेलें आहे; आम्हांस त्याचें
महत्त्व वाटत नाहीं. ज्ञानानें मोक्ष घडतो हें खरें. २४. मूळची जी अविद्या,
जिच्यापासून परा आदि चार वाणी भरभराटीस आल्या, त्यांसह या
जीवानें देहत्याग. केल्यावर ती स्वतःहि नाश पावते. २५. शरीररूपीं
लांकडें हीं कंटाळून ज्ञानरूपीं अग्नींत शिरलीं तरी त्यांचा समूळ नाश न
होतां बोधरूपीं भस्माचा अंश उरतोच. २६. भस्म अंगाला लावल्यावर
त्याचें स्थूल परमाणू, कण जरी दिसेनासे होतात, तरी ते अंगावर असतात.
२७. पाण्यांत मिसळल्यावर कापुराचें अस्तित्व झांकत नाहीं, वास पाण्याला
येतोच. २८.