सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 30, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 30

प्रकरण तिसरें २९
म्हणोनि बंधचि तंव वावो । मा मोक्षा के प्रसवो ॥ परी मरोनी
केला ठावो । अविद्या तया ॥१५॥ आणि ज्ञान बंधु ऐसें । शिव
सूत्राचोनि मिसें ॥ म्हणितलें असे । सदाशिवें ॥ १६ ॥ आणि
वैकुंठीचेनिही सुजाणें । ज्ञानपाशीं सत्त्वगुणें ॥ बांधिजे हे निरोपण
बहु केलें ॥ १७ ॥ परी शिवें कां श्रीवल्लभें । बोलिलें येणेंचि
लोभें । मानूं तें हें लाभे । न बोलतांची ॥ १८ ॥ जें आत्मज्ञान
निखिळ । तेंही घे ज्ञानाचें बळ ॥ तैं सूर्य चिंती सबळ । तैसें
नोहें ॥ १९ ॥ ज्ञानें श्लाघतु आहे । तैं ज्ञानपण धाडिलें वाये ।
दीप वांचोनि दिवा लाहे । तैं आंग भुललाचि कीं ॥ २० ॥
आपणपे आपणापाशीं । नेणतां देशोदेशीं ॥ आपणपें गिंवसी ।
हें कीरु होये ॥ २१ ॥
बंधच जर मिथ्या, तर मोक्ष तरी खरा कशावरून. अविद्येनें स्वतः
मरून मोक्षाला जागा करून दिली. १५. आणि शिवसूत्रामध्यें शंकरांनींही
'ज्ञान बंधच आहे' असें स्पष्ट म्हटलें आहे. १६. 'जीव सत्त्वगुणानें
ज्ञानपाशांत बद्ध होतो' असें भगवान विष्णूंनींही सविस्तर सांगितलें आहे.
१७. हें आम्ही प्रमाण मानतों याचें कारण तीं शंकरांनीं किंवा विष्णूंनीं
सांगितलीं असेंच नाहीं तर आमचा स्वतःचा अनुभव तसाच आहे ना ! १८.
वृत्तिज्ञानाचा आधार जर शुद्ध आत्मस्वरूप ज्ञान घेईल, तर सूर्यानें
उगविण्यासाठीं कोणाची मदत घ्यावी, अशी काळजी करण्यासारखें नाहीं
का ? १९. शब्दज्ञानाला वृत्तिज्ञानानें जर मोठेपण येईल, तर तें मूलभूत
ज्ञान व्यर्थच होईल. दिवा जर एकादा पदार्थ पाहण्याकरितां दुसऱ्या
दिव्याची अपेक्षा करील; तर तो स्वरूपाला विसरला म्हणावें ? २०. आपण
आपल्याजवळ नित्य असतांना भ्रमानें 'मी हरवलों' असा निश्चय करून
देशोदेशीं आपला शोध करावा. २१.