सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 26, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 26

प्रकरण दुसरें २५
वांचोनि प्रवृत्तिविरोधें । कां निवृत्तीचेनि बोधें ॥ आणिजे तैसा
वादे । निवृत्ति नव्हे ॥ ७१ ॥ आपणा देऊनि राती । दिवसा आणि
उन्नति ॥ प्रवृत्ति वारी निवृत्ती । नव्हे तैसा ॥७२॥ ओपसरयाचें
बळ । घेऊनि मिरवे कीळ ॥ तैसें रत्न नव्हे निखिळ । चक्रवर्ती
हा ॥ ७३ ॥ गगनही सूनी पोटीं । जैं चंद्राची पघळे पुष्टी ॥
तैं चांदिणें तेणेंसी उठी । आंग जयाचें ॥ ७४ ॥ तैसें
निवृत्तिपणासी कारण । हाचि आपणया आपण ॥ घेयावया
फूलचि झालें घ्राण । आपुली दृति ॥ ७५ ॥ दिठी मुखाचिये
बरवे । पाठीकडूनि जैं पावे ॥ तैं आरसे धांडोळावे । लागती
काई ॥ ७६ ॥ कीं राती हुन गेलिया । दिवस हुन पातलिया ॥
काय सूर्यपण सूर्या । होआवें लागे ॥ ७७ ॥
प्रवृत्तिमार्गाचा विरोध करून, उपदेशाप्रमाणें निवृत्तिमार्ग चोखाळून
आणि वादविवाद-चर्चा करून; सर्वसामान्यजन व परोक्षज्ञानी निवृत्तिमार्गी
होतात; तसें हे नव्हत. ७१. सूर्य मावळल्यावर रात्र देतो आणि पुन्हां
दिवस निर्माण करून आपलें हित पाहतो; तसे हे नव्हत. ७२. रत्नाचें
तेज अधिक दिसावें म्हणून जसें त्याच्या कोंदणांत एक प्रकारचें पूट देतात
आणि मग तेजःपुंज म्हणून तें मिरवतें; तसे निवृत्तिनाथ नाहींत. स्वयंभु
रत्नराज होत. ७३. चंद्राचा धवल प्रकाश आकाशाला सामावून सर्वत्र
पसरतो त्यावेळीं तो चंद्र आपल्या अंगच्या चांदण्यानें उठून दिसतो. ७४.
मूलभूत निवृत्तिपणाला हे स्वतःच कारण आहेत. आपला वास घ्यावयाला
फुलानेंच स्वतः नाक व्हावें तसें. ७५. मुखाच्या पुढील भागांतून दृष्टि
वावरते, त्याऐवजी ती पाठीमागून वावरली असती तर आरसे हुडकावे
लागले असते काय ? ७६. रात्र संपून दिवस निघाल्यावर का सूर्याला
सूर्यपणा आणावयाचा असतो ? ७७.