सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 136, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 136

सार्थ श्रीचांगदेव पासष्टी १३५
इयेचें करुनि व्याज । तुं आपणयातें बूझ । दीप दीपपणे पाहे
निज । आपुलें जैसें ॥ ५६ ॥ तैसी केलिया गोष्टी । तया उघडिजे
दृष्टी । आपणिया आपण भेटी । आपणामाजीं ॥ ५७ ॥ जालिया
प्रळयीं एकार्णव । अपार पाण्याची धांव । गिळी आपुला उगव ।
तैसें करी ॥५८॥ ज्ञानदेव म्हणे नामरूपें । विण तुझे साच आहे
आपणपें । तें स्वानंदजीवनपें । सुखिया होई ॥ ५९ ॥ चांगया
पुढत पुढती । घरा आलिया ज्ञानसंपत्ति । वेद्यवेदकत्वही अतीतीं ।
पदीं बैसें ॥६०॥ चांगदेवा तुझेनि व्याजें । माउलिया श्रीनिवृत्ति-
राजें । स्वानुभव रसाळ खाजें । दिधलें लोभें ॥ ६१ ॥
स्वतःच्या प्रकाशानें दिवा आपलें स्वरूप उघड करतो, त्याप्रमाणें मी
तुझ्या - माझ्यातील एकत्वाची स्थिति लिहिली आहे, तिच्या साहाय्यानें तूं
आपलें यथार्थ आत्मस्वरूप जाणून घ्यावेस म्हणजे ‘मी ब्रह्मस्वरूप आहें’
अशा बोधांत तू राहा. ५६. तुझा आत्मभाव स्पष्ट होईल अशा गोष्टी मी
तुला सांगितल्या. त्यांच्या मदतीनें तूं ज्ञानदृष्टि मिळव. म्हणजे आपणच
आपली भेट घे. चांगदेवा ! तूं योगैश्वर्ययुक्त असलास तरी त्याच्या सन्नि-
ध्यानें उदित होणाऱ्या ‘अहं मम,’ या अध्यासाचा त्याग करून असंग
कूटस्थ आत्मा म्हणजे मीच आहें याची निश्चिती करून घे. यामुळे आपण
आपणांस भेटलों असें होतें. ५७. प्रलयाच्या वेळीं सगळींकडे पाणीच पाणी
होतें, तें सर्व प्रवाहांचें उगम आणि प्रवाहसुद्धां नाहींसें करतें. त्याप्रमाणें
तूं करावेंस, म्हणजे तूं स्वगत्, सजातीय, विजातीय, संबंधशून्य असें ब्रह्म
मीच आहें, या दृढ निश्चयानें देशादिकांतील अनात्मभाव नाहींसा कर.
५८. चांगदेवा ! तुझा यथार्थ सच्चिदानंदात्मभाव हा नामरूपातीत आहे.
त्या स्वानंदाच्या अनुभवानें तूं सुखरूप हो. ५९. हें ब्रह्मैक्यत्वाचें ज्ञान,
वेद्यवेदकत्व इत्यादि भेदांच्या पलीकडे असणारें सच्चिदानंदस्वरूप प्राप्त
करून देतें. त्याची तूं खूणगांठ बांध असें माझें तुला वारंवार सांगणें आहे.
६०. तुझ्या पत्राचें उत्तर लिहिण्याच्या मिषानें माझ्या श्रीगुरुनिवृत्तिराज
चांगदेवा! माउलीने माझ्याकडून तुला उपदेश करविला असे नाहीं, तर मोठ्या
लोभानें रसभरित आत्मानंदाचा मलाच खाऊ दिला.