अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
पृष्ठ 137, कुल 138 में से
संदर्भ में पढ़ें१३६ सार्थ श्रीचांगदेव पासष्टी
एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे । दोन्ही डाळस आरिसे । परस्पर
पाहता कैसे । मुकले भेदा ! ॥ ६२ ॥ तियेपरी जो इया । दर्पण
करील ओंविया । तो आत्माएवढिया । मिळेळ सुखा ॥ ६३ ॥
नाहीं तेंचि काय नेणों असे । दिसे तेंचि तैसें नेणों दिसे ।
असें तेंचि नेणों आपसें । तें कीं होइजे ॥ ६४ ॥ निदेपरौतें
निदैजणें । जागृति गिळोनि जागणें । केलें तैसें गुंफणें ।
ज्ञानदेवो म्हणे ॥ ६५ ॥
॥ श्रीचांगदेवपासष्टी समाप्त ॥
॥ श्रीविठ्ठलार्पणमस्तु ॥
चांगदेव, ज्ञानेश्वर महाराजांच्या या पत्रानें ज्ञानसंपन्न झाले. महाराज
तर ज्ञानरूप होतेच. त्यांची दोघांची ज्ञानदृष्ट्या भेट घडतांच दोघेहि,
शरीरधर्मानें येणारे भेद नाहींसे होऊन अभेद झाले. ६२. ब्रह्मात्मैक्यज्ञान
प्राप्त होण्यासाठीं जो कोणी, आम्हीं चांगदेवास केलेल्या या उपदेशाचा
सतत विचार करील तो आनंदरूपच होईल. ६३. आत्म्यासंबंधी तो असा
आहे तसा आहे, एवढा आहे, असें कांहींच सांगता येत नाहीं. तें सद्रूप
प्रकाशमय, अपरिमित आनंदानें सर्वत्र ओतप्रोत असूनहि अल्पबुद्धीच्या
लोकांना तें कोठेंहि दिसत नाहीं हेंहि एक आश्चर्य नव्हे काय ! ६४.
देहामुळें उत्पन्न होणाऱ्या निद्रेपलीकडचे निर्विकार परमात्मस्वरूप, देह-
विषयक विचारांचा नाश करणारी आत्मजागृति, त्या परमात्म्याचें एकत्व
या ग्रंथांत विशद केलें आहे, असें श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ६५.
॥ ॐ तत्सत् ॥