सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 105, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 105

१०४ सार्थ अमृतानुभव
अखरी तब गोवधु । पुढारा अमृत बाधु ॥ मा कैसा अज्ञान-
वादु । कीजे-ज्ञानीं ॥ २७८ ॥ आणि अज्ञान म्हणणें । स्फुरतसे
अर्थपणें ॥ आतां हेंचि ज्ञान कोणें । मानिजेना ॥ २७९ ॥
असो हें आत्मराजें । आपणापें जेणें तेजें ॥ आपणचि देखिजे ।
बहुयेपरी ॥ २८० ॥ निर्वचिता जें झावळे । तेचि कीं लाहे
डोळे ॥ डोळयापुढें मिळे । तेंचि तया ॥ २८१ ॥ ऐसें जगज्ञान
जें आहे । तें अज्ञान म्हणे मी वियें ॥ येणें अनुमानें हो पाहे ।
आधी ऐसें ॥ २८२ ॥ तंव अज्ञान त्रिशुद्धी नाहीं । हें जगोंचि
ठेविलें ठाईं ॥ जे धर्म धर्मित्व केहीं । ज्ञानाज्ञान असे ॥ २८३ ॥
काजळा मोती विये । राखोंडिया दिपु जिये ॥ तरी ज्ञान धर्म
होये । अज्ञानचा ॥ २८४ ॥
'गोवध' हीं अक्षरें उच्चारण्याचा एक दोष, आणि गोवध न करतां
गाय मारली असें आहे खोटें बोलण्याचा दुसरा दोष येतात, असें आहे.
म्हणून ज्ञानस्वरूपालाच, 'अज्ञान' कसें म्हणावें ? 'अज्ञान' नाहींच,
तें आहे असें म्हणणें हा एक दोष, व आत्मा आहे 'तो आहे' असें
म्हणणें हा दुसरा दोष. २७८. आतां अज्ञान म्हणण्यांतच वस्तुतः ज्ञानाचें
ग्रहण होते. मग आत्म्यालाच ज्ञान म्हणणें योग्य आहे, असें कोणालाहि
कबूल करावें लागणार नाहीं का ? २७९. हा आत्मराजा आपल्याच तेजानें
आपल्यालाच अनंत प्रकारें बघतो. २८०. विचाराच्यापुढें न टिकतां
डोळ्यांना कसें प्राप्त होणार ? जें असतें तेंच डोळ्यांना दिसतें. २८१.
अज्ञान म्हणते कीं 'जग असें जें ज्ञान' तें माझ्यापासून उत्पन्न होतें या
अनुमानावरून अज्ञान आहे हें पटते. २८२. खात्रीपूर्वक सांगतां येईल कीं
अज्ञान नाहींच. कारण सर्व जगांत ज्ञानच भरलेलें आहे, म्हणून ज्ञान व
अज्ञान यांमध्यें धर्मधर्मिस्वभाव कसा येऊं शकेल ? २८३. मोतीं काय
पाण्याला उत्पन्न करितें ? राखेने दीप पेटवितां येईल काय ? या गोष्टी जर
संभवतील, तर ज्ञान अज्ञानाचा धर्म होईल ! २८४.