सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 104, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 104

प्रकरण सातवें १०३
जेणें ज्ञान संज्ञान होये । दृङ्मात्र दृष्टींतें विये । प्रकाशाचा
दिवो पाहे । प्रकाशाची ॥ २७३ ॥ तें कोणें निकृष्टें । दाविलें
अज्ञानाचेनि बोटें । ना तमें सूर्या मोटें । बांधितां निकें ॥२७४॥
अपूर्व अज्ञानाक्षरीं । बसतां अज्ञानाची थोरी ॥ शब्दार्थाची उजरी ।
अपूर्व नव्हे कीं ॥ २७५ ॥ लाखेचें मांदुसें । आगीचें ठेवणें
कायसें ॥ आंतुबाहेरी सरिसें । करूनि घाली ॥ २७६ ॥
म्हणोनी जग ज्ञानें स्फिते । बोलतां अज्ञानवादातें ॥ विखुरली
होती आते । वाचेचिये ॥ २७७ ॥
ज्याच्या योगानें व्यावहारिक ज्ञानाला ज्ञानत्व येतें, सर्वत्र त्रिपुटी
ज्ञानच बनतें, प्रकाशाला प्रकाशपणा ज्यामुळे येतो, २७३. येथपर्यंत
प्रतिपादन केलेल्या ज्ञानरूप आत्म्याला कोणी अविचारी मनुष्य अज्ञानाच्या
बोटानें दाखवील म्हणजे आत्म्याला अज्ञान असें म्हणेल तर, 'सूर्याला
अंधाराच्या मोटेंत बांधलें आहे,' या म्हणण्याप्रमाणें त्याचें बोलणें असंबद्ध
होईल. २७४. ज्ञानाची एवढी मोठी थोरवी असूनहि त्या ज्ञान शब्दाच्या
मागें 'अ' अक्षर लावून त्याला 'अज्ञान' हें नांव ठेवण्यांत शब्दिक
कसरत विशेष नाहीं काय ? २७५. लवकर जळणाऱ्या लाखेच्या पेटींत
अग्नि घालून ती ठेविली तर उपयोग काय ? कारण आंत ठेविलेला अग्नि
लाखेला अंतर्बाह्य अग्निरूप करून टाकील.२७६. म्हणून ज्ञानानें दुमदुमून
भरलेल्या जगाला अज्ञान म्हणणें म्हणजे वाणीला फांटा फुटल्याप्रमाणें
आहे. २७७.