सामग्री पर जाएँ
सर्वकोश
अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)

Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev

सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा

DevanagariHindipublished138 पृष्ठ

पृष्ठ 106, कुल 138 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 106

प्रकरण सातवें १०५
चंद्रमा निगती ज्वाळा । आकाश आते शिळा ॥ तरी अज्ञान
उजळा । ज्ञानातें वमी ॥ २८५ ॥ क्षीराब्धिकालकूट । हें एके
परीचें विकट ॥ काळकूटीं चोखट । सुधा कैची ॥ २८६ ॥ ना
ज्ञानीं अज्ञान जालें । तें होतांचि अज्ञान गेलें ॥ पुढती ज्ञान
एकलें । अज्ञान नाहीं ॥ २८७ ॥ म्हणोनि सूर्य सूर्यांचियेवढा ।
चंद्र चंद्राचि सांगडा ॥ ना दीपाचिया पडिपाडा । ऐसा दीपूं
॥ २८८ ॥ प्रकाशु तो प्रकाशकी । यासी न वंचे घेई चुकीं ॥
म्हणोनि जग असिकी । वस्तुप्रभा ॥ २८९ ॥ विभाति यस्य
भासा । सर्वमिदं हा ऐसा ॥ श्रुति काय वायसा । ढेकर देती
॥ २९० ॥ यालागीं वस्तुप्रभा । वस्तूचि पावे शोभा ॥ जातसे
लाभा । वस्तुसिचि ॥ २९१ ॥
चंद्रापासून ज्वाला निघतात काय ? आकाशांतून कधीं तरी दगडांची
वृष्टि होते काय ? अरे ! असें जर होईल तर शुद्ध ज्ञानाला अज्ञान उत्पन्न
करतें असें आम्ही म्हणूं. २८५. क्षीराब्धींतून काळकूट निघालें, हें सुद्धां
एक विपरीतच आहे, पण काळकूटांतून शुद्ध अमृत कधीं तरी निघेल का ?
२८६. अथवा ज्ञानापासून अज्ञान उत्पन्न झालें, तें उत्पन्न झाल्याबरोबर
त्यानें अज्ञानाचा नाश केला, मग आतां अज्ञान नसून एकटें ज्ञानच
शिल्लक राहिलें. २८७. म्हणून सूर्याला उपमा सूर्याचीच, चंद्र चंद्राच्याच
सारखा, अथवा दिव्याच्या योग्यतेला दिवाच. २८८. प्रकाश तो प्रकाशच,
असें म्हणण्यांत कांहीं चूक नाहीं असें समज. म्हणून सर्व जग वस्तुप्रभाच
आहे. २८९. हें सर्व जग ज्या आत्म्याच्या प्रकाशानें भासतें, असें श्रुति
सांगते. शंका फिटून; खात्रीनें ती तृप्त होऊन असें ती सांगते ती काय
पोकळ बडबड आहे थोडीच ? २९०. म्हणून वस्तूची शोभा वस्तूलाच,
प्रमेची शोभा वस्तूलाच मिळते, व प्रमेचा लाभहि वस्तूलाच होतो. २९१.