सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
.३२० सार्थ तुकारामगाथा
जयाचें जया होईल ठावें । लाहो या साधियेला भावें ॥
ऐसें होतें राखियले जीवें । येथूनि देवें भोवहुनी ॥ ४ ॥
आस निरसली ये खेपे । अवघे पंथ जाले सोपे ।
तुमचे दीनबंधु कृपें । दुसरें कांपे सत्ताधाकें ॥ ५ ॥
अंकिले पणें आनंदरूप । आतळों नये पुण्यपाप ।
सारूनि ठेविले संकल्प । तुका म्हणे आपे आप एकाएकीं ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- धणो-तृप्त होईपर्यंत, थैलरी-वाणी, न वंचे-कुचराई करणार नाही, भोवहुनी-दूर
काढून, आतळों न ये-स्पर्श करीत नाही.
अर्थ :- देवा, मी तुमच्या चरणांशी आलो, यात माझे जीवित कारणी लागल्यासारखे झाले हे फार
चांगले झाले. मी आता तृप्त होईपर्यंत या संतसंगाचा लाभ घेईन व वाणीने तुझे गुण गर्जून सांगेन. १ तुझ्या सेवेत
माझे शरीर कधी कुचराई करणार नाही. काया, वाचा व मन यासहित मी तुझी सेवा करीन. गादण शिल्ल्या दासी-
प्रमाणेच मी या संताचा सेवक झालो आहे. माझा आता याविषयी पक्का निर्धार झालेला आहे २ माझ्या जीवनात
आता तुझ्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाला असून मी देह व देहसंबंध याच्यापासून निराळाच झालो आहे त्यामुळे
पंचमहाभूतांचा हा देह सहज लीलेने आता वर्तणूक करीत आहे. ३ ज्याचे चिंतन आम्ही करीत आहोत त्याला हे
सर्व नीट समजेल, असा विश्वास आमच्या मनात आहे. माझ्या जीवासही असेच वाटत होते या प्रपंचरूप स्थितीतून
देवाने मला दूर काढून मार्ग दाखविला आहे. ४ या खेपेस मात्र माझी सर्व आशा पूर्ण झालेली आहे. सर्व मार्ग
आता सोपे झाले असून देवा, दीनबंधू, तुमच्या कृपेने दुसरा विचारच माझ्या मनात येण्यास थरथरा कापत आहे ५
देवा, तुमचा अंकित होऊन, सेवक होऊन मी आनंद स्वरूपास प्राप्त झालो आहे. आता मला पापपुण्याचा स्पर्श होत
नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी सर्व संकल्पाचा नाश करून मी आपोआप एकटेपणाने राहिलो आहे ६
६४५ अवघ्या दशा येणें साधती । मुख्य उपासना सगुणभक्ती ।
प्रगटे हृदयांची मूर्ती । भावशुद्धि जाणोनियां ॥ १ ॥
बीज आणि फळ हरीचें नाम । सकळ पुण्य सकळ धर्म ।
सफळां फळांचे हे वर्म । निवारी श्रम सकळ ही ॥ २ ॥
जेथें कीर्तन हें नामघोष । करिती निर्लज्ज हरीचे दास ।
सफळ वोथंबले रस । तुटती पाश भवबंधाचे ॥ ३ ॥
येती अंगा वसतो लक्षणें । अंतरीं देवें धरिलें ठाणे ।
आपणचि येती तयाचे गुण । जाणें येणें खुंटे वस्तींचें ॥ ४ ॥
न लगे सांडावा आश्रम । उपजलें कुळींचे धर्म ।
आणीक न करावे श्रम । एक पुरे नाम विठोबाचें ॥ ५ ॥
वेदपुरुष नारायण । योगियांचें ब्रह्म शून्य ।
मुक्ता आत्मा परिपूर्ण । तुका म्हणे सगुण भोळया आम्हां ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- वोथंबले-निर्माण झाले.
अर्थ :- सगुण रूपाची भक्ती हीच मुख्य उपासना असून सर्व सुखांच्या अवस्था याच भक्तीमुळे साध्य होतात.
मनात एक शुद्ध भाव असला की, हृदयातील प्रभूची मूर्ती समोर प्रकट होते १ श्रीहरीचे नाम हेच बीज व हेच फळ
होय. सर्व पुण्ये, सर्व धर्म, सर्व फला यांचे रहस्य म्हणजे श्रीहरीचे नाम हेच होय. याच्यामुळे सर्व श्रमाचे निवारण
सार्थ तुकारामगाथा ३२१
होते २ ज्या ठिकाणी कीर्तनात श्रीहरीच्या नावाचा घोष होतो, श्रीहरीचे दास मुक्त मनाने नामघोष करीत
असतात, तेथे सर्व रसांची प्राप्ती होत असते संसारबंधनाचे पाश तेथे तुटलेले असतात ३ एकदा मनात देवाने
स्थान धारण केले आहे असे झाले की, मग ज्ञानाची सर्व लक्षणे प्रकट होतात सर्व गुण आपण होऊन प्रकट होतात मग
त्याचे जाणेयेणेही थांबते ४ या प्राप्तीसाठी मग स्वतःचा आश्रमधर्म सोडण्याची जरूरी नाही दुसरे काही श्रम
करण्याची आवश्यकता नाही एक विठोबाचे नामस्मरण पुरे आहे ५ हा नारायण साक्षात वेदपुरुषच आहे हेच
योगी लोकांचे शून्य ब्रह्म हाच मुक्त व परिपूर्ण असा आत्मा आहे तुकाराम महाराज म्हणतात, परंतु आमच्या-
सारख्या भोळ्याभाबड्या लोकांना हे सगुण रूपच पुरे आहे ६
विवरण - बुवांचा हा अभंग अनेक दृष्टींनी महत्त्वाचा आहे सर्वसामान्य लोकांना योगादी साधनांपेक्षा
सगुणभक्तीचा व नामसंकीर्तनाचा मार्ग हाच सहजसुलभ व निर्धोक असल्याचा निर्देश अनेक ठिकाणी आहे ईश्वर-
प्राप्तीसाठी संसार मोडायला हवा, रानावनात जायला हवे, आश्रमधर्माचे रीतीरिवाज सांडायला हवेत, कुळधर्म
सांडायला हवेत, असे नाही ह्या सर्व प्रापंचिक कार्यात मग्न असताना अखंड नाम प्रभूचे चित्तात असावे व सगुणाचे
ध्यान मनात ठसावे मग इतर खडतर साधनांची तुकारामबुवांच्या मते जरूरी नाही 'नलगे सायास जाणे वनांतरा ।
सुखें येतो घरां नारायण' अशीच ग्वाही तुकाराम महाराजांनी दिलेली आहे 'आता गृहादिक आपुलें । ते कांहीं न
लगे त्याजावे । जें घेतें झाले स्वभावें । निसंग म्हणूनि' असे ज्ञानेश्वरांनीही म्हटले आहे याचे मुख्य मर्म असे की,
घरी प्रपंचात राहून सुख भोगणारे जे मन व स्वभावत च नि मग होऊन केवळ हरिरूप झालेले असते नामसंकीर्तन व
सगुणभक्ती यांनी ते केवळ ईश्वराशीच निगडित झालेले असल्यामुळे या भक्तास अव्यक्ताची उपासना करण्यासाठी
निर्गुणाकडे, योगमार्गाकडे जाण्याची जरूरी नाही
६४६ श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा ।
जगद्व्यापका जनार्दना । आनंदघना अविनाशा ॥ १ ॥
सकळदेवा¹ आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा ।
महा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥ २ ॥
चक्रधरा विश्वंभरा । गरुडध्वजा करुणाकरा ।
सहस्रपादा सहस्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ॥ ३ ॥
कमलनयना कमलापती । कामिनीमोहना मदनमूर्ती ।
भवतारका धरित्या क्षिती । वामनमूर्ती त्रिविक्रमा ॥ ४ ॥
अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना ।
वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥ ५ ॥
तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणीं ।
हेचि करीतसे विनवणी । भयबंधनीं सोडवावे ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - जगद्व्यापका-जग व्यापून राहिलेल्या, करुणाकरा-करुणेच्या सागरा, क्षिती-पृथ्वी,
ठाव-आश्रय
अर्थ - श्रीअनंत स्वरूपाच्या देवा, मधू नावाच्या दैत्याचा नाश करणाऱ्या देवा, ज्याच्या नाभीतून कमळ
उगवले आहे अशा पद्मनाभा, नारायणा, जगात व्यापून राहिलेल्या जनार्दना, तू अविनाशी आहेस, तू आनंदाचा व
कृपेचा मेघ आहेस १ सगळ्या देवांचा देव तू आहेस तू कृपाळू असा केशव आहेस महान आनंद देणारा तू असून
तुझ्या संगतीचा श्रेष्ठ अनुभव देणारा तू आहेस सदाशिवा, तू नेहमीच कल्याण करणारा असून तुझे हे रूप सहज
१ सकळ देवाधिदेवा
तु गाथा ४१
३२२ सार्थ तुकारामगाथा
असे आहे. २ सर्व विश्वास भरून राहणाऱ्या विश्वंभरा, तुझ्या हातात दुष्टाचा नाश करणारे सुदर्शनचक्र असल्या-
मुळे तू चक्रधर आहेस. हे करुणेच्या सागरा, तुझ्या ध्वजावर गरुडाचे स्थान असून तुला हजारो पाय व हजारो हात
आहेत देवा, तू क्षीरसागरात शेषावर शयन करणारा आहेस ३ देवा, तुझे डोळे कमळाच्या पानांप्रमाणे असून तू
कमलापती म्हणून शोभतोस प्रत्यक्ष लक्ष्मीच तुझी पत्नी आहे. सर्व स्त्रियांना तुझी मोहिनी पडते. तू केवळ मदनाचा
पुतळा आहेस. तू मस्तकावर अवतारप्रसंगी पृथ्वी धारण करून आपल्या भक्ताचे रक्षण केले आहेस तीन पावलाचा
विक्रम वामनावतारात तू करून भक्ताचा उद्धार केला आहेस. ४ अरे परमेश्वरा, तूच सगुण व तूच निर्गुण आहेस.
या जगाची आई व बाप देवा, तूच आहेस सर्व जगाचे जीवन तू आहेस. तूच वसुदेवदेवकी याचा लाडका मुलगा
आहेस या रूपाने त्यांच्या अंगणात तू सगुण होऊन रांगत आहेस ५ देवा, हा तुकाराम तुला अनंत लोटांगणे
घालीत आहे मला तुमच्या चरणावर विश्रांती द्यावी हीच माझी विनयंती आहे या भवबंधनातून देवा, मला
सोडवावे. ६
विवरण :- या पुरा गोड अभंगात तुकारामबुवांनी देवाच्या सगुण रूपाचे अतिशय मनोहर असे वर्णन केले
आहे यातील देवाच्या गुणाचे व कर्तृत्वाचे वर्णन करणारे प्रत्येक विशेषण व संबोधन सार्थ व अभिप्राययुक्त आहे
या आधीच्या अभंगात ज्या सगुणरूपाची महती बुवांनी वर्णन केली, त्याचे फार बहारीचे वर्णन त्यांनी या अभंगात
परमेश्वराच्या गुणविशेषाचे दर्शन घडवून केले आहे नुसता अभंग मोठ्याने म्हणत राहावा, मग प्रत्यक्ष विठुलाचे
सगुण रूप डोळ्यापुढे उभे राहते की नाही ते पाहावे या देवास भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे अनेक बाहू, अनेक पाय
असले तरी (गीता ११, १६) तो वसुदेव-देवकीच्या घरी अंगणात लहान होऊन खेळत आहे, हेही ध्यानात ठेवावयास
हवे श्रीअनंता ! अशी पहिल्यानेच हाक मारून बुवांनी या देवाने अंत नसणारे रूप प्रथम वर्णन केले व अभंगाच्या
शेवटी तुकाराम महाराज त्याच्या वाळवंटावर येऊन विसावले आहेत हाच त्यांच्या सगुणप्रीतीचा आदर्श होय याच्या
पायावर तुकारामबुवा प्रवृत्त लोटांगणे घालतात.
६४७ आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत ।
पाहाता न कळे जयाचा अंत । तोचि हृदयात घालूं आतां ॥ १ ॥
विसरोनि आपुला देहपणभाव । नामेंचि भुलविला पंढरीराव ।
न विचारी याती¹ कुळ नांव । लागावया पाय संतांचे ॥ २ ॥
बरे वर्म आले आमुचिया हातां । हिंडावे धुंडावे न लगतां ।
होय अविनाश सहाकारी दाता । चतुर्भुज रता परि धाके ॥ ३ ॥
होय आवडी साने थोर । रूप सुंदर मनोहर ।
भक्तिप्रिय लोभापर । करी आदर याचकपणे ॥ ४ ॥
ते वर्म आले आमुच्या हाता । म्हणोनि शरण निघालों संतां ।
तुका म्हणे पंढरीनाथा । न सोडीं आतां जीवे भावे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - पाय-शय
अर्थ -- आता या माझ्या भक्तीच्या बलामुळे हा पंढरीनाथ माझ्याजवळच तिष्ठत उभा राहिला आहे.
याचा वरवर पाहून नीट थांग लागत नाही तो आता हृदयात घालून त्याची जपणूक करू १ आपण देव आहोत,
हा भावच तो विसरून गेला आहे किंवा आपला देहपणाचा भाव विसरून त्याची आळवणी करा, म्हणजे केवळ
नामस्मरणानेच हा पंढरीराव भुलविला जातो हा मग आपल्या भक्ताची जात व त्याचे कुळ याची चौकशी करीत
नाही संताच्या पायाशी लागले की याची भेट होते २ हे एक चांगले रहस्य आमच्या हातात सापडले आहे.
याच्यासाठी फार हिंडावे, धुंडावे लागणार नाही आता. हा अविनाशी असणारा दाता पांडुरंग सहकारी झाला आहे.
१ यातु कुळ ठाव.
सार्थ तुकारामगाथा ३२३
हा चतुर्भुज असला तरी संतांचा धाक याला फार मोठाच असतो. ३ भक्तांच्या आवडीप्रमाणे हा लहान, थोर होतो.
हा त्यांच्यासाठी सुंदर व सगुण रूप धारण करतो. याला भक्तो अतिशय प्रिय असून भक्ताचा लोभ यास अपार
असतो. कारण स्वतः याचक होऊन हा आपल्या भक्तांचा आदरसत्कार करीत असतो. ४ या श्रीहरीचे हे रहस्य
आता आमच्या हातात आले आहे. म्हणून तर मी संतांना शरण जाण्यास निघालो आहे. तुकाराम महाराज
म्हणतात, पंढरीनाथा, आता या संतांना मी सोडणार नाही. जीवाभावाने त्यांना संतुष्ट करीन ५
६४८ माझा तंव खुंटला उपाव । जेणें तुझे आतुडती पाव ॥
करूं भक्ति तरि नाहीं भाव । नाहीं हातीं जीव कवणोविशीं ॥ १ ॥
धर्म करूं तरि नाहीं चित्त । दान देऊं तरि नाहीं वित्त ।
नेणें पुजों ब्राह्मण अतीत । नाहीं भूतदया पोटा हार्ती ॥ २ ॥
नेणें गुरुदास्य संतसेवन । जप तप अनुष्ठान ।
नव्हे वैराग्य वनसेवन । नव्हे दमन इंद्रियाेंसी ॥ ३ ॥
तीर्थे करूं तरि मन नये सवें । व्रत करूं तरि विधि नेणें स्वभावें ।
देव जरि आहे म्हणों मजसवें । तरि आपपरावें न वंचे ॥ ४ ॥
म्हणोनि जालों शरणागत । तुझा दास मी अंकित ।
यास कांहीं न लगे संचित । जालों निश्चित१ तुका म्हणे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - उपाव-उपाय, आतुडती-प्राप्त होतात, दमन-स्वामित्व, सर्व्हे-पवय, न वंचे-जात नाही.
अर्थ. - देवा, जेणेकरून तुझ्या पायांची प्राप्ती होईल, याविषयीचा माझा तर उपाय सारा संपून गेला आहे.
तुझी भक्ती नीट करावी, तर एवढा मोठा भावही मजजवळ नाही. कुठल्याही बाबतीत हा माझा जीव माझ्या
स्वाधीन नाही. १ धर्माचे आचरण करावे, तर त्यात माझे चित्त नाही. कुठे दान द्यावे तर, त्यासाठी माझ्याजवळ
पैसा नाही. त्यामुळे ब्राह्मण अथवा अतिथी यांचे पूजन मी काही करू शकत नाही. आणि पोटात भूतमात्रांविषयी
अपार अशी दयाही नाही. २ श्रीगुरुंची सेवा कशी करावी हेही मला समजत नाही. संतांची सेवा मला समजत
नाही. जप, तप, अनुष्ठान, वैराग्य, वनवासातील चिंतन, इंद्रियांवर स्वामित्व ठेवणे यांपैकी काहीही मला नीट जमत
नाही. ३ तीर्थयात्रा करावी तर, मनास तशी सवय नाही व्रते वगैरे करावीत तर, मला त्यांचा विधी माहीत नाही.
देव माझ्याजरोवरच असतो असे मानले तरी माझ्यातील आपपर भाव जात नाही. ४ म्हणून देवा, मी तुला शरण
आलो आहे. तुझा मी दास तुझ्याच स्वाधीन असल्यासारखा आहे तुकाराम महाराज म्हणतात, असल्या या स्थिती-
साठी काही संचित कर्माची जरूरी लागत नाही; म्हणूनच तर मी निश्चित झालो आहे. ५
६४९ तरि म्यां आळवावें कोणा । कोण हे पुरवील वासना ।
तुझयांचूनि नारायणा । लावीं स्तना कृपायंते ॥ १ ॥
आपुला न विचारिँ शिण । न धरौं अंगसंगें भिन्न ।
अंगीकारिलें राखें दीन । देई जीवदान आवडीचें ॥ २ ॥
माझिया मनासिहे आस । नित्य सेवावा ग्रंथरास ।
अखंड चरणींचा वास । पुरवी आस याचकाची ॥ ३ ॥
माझिया संचिताचा ठेवा । तेणें हे वाट दायिली देवा ।
एवढ्या आदराचा हेया । मागें सेवादान आवडीनें२ ॥ ४ ॥
१ निश्चित, २ आवडीचे
३२४ सार्थ तुकारामगाथा
आळवीन करुणावचनीं । आणीक गोड न लगे मनीं ।
निद्रा जागृती आणि स्वप्नीं । धरिले ध्यानीं मनीं रूप ॥ ५ ॥
आतां भेट न भेटता आहे । किंवा नाहीं ऐसे विचारूनि पाहे ।
लागला झरा अखंड आहे । तुका म्हणे साहे' केले अतरीं ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - शिण-त्रास, वास-इच्छा, साहे-साह्य
अर्थ - नारायणा, तू जर मला दूर सारलेस, तर मग मी आळवावे तरी कुणास ? माझी इच्छा कोण
पुरवील हो ? देवा, तुझ्यावाचून मला स्तनपान कोण देईल ? १ माझ्यासाठी देवा, तुला जर काही त्रास झाला
तर, तू त्याचा विचार करू नकोस. तू मला तुझ्या अगसंगापासून दूर नको करूस माझ्यासारख्या दीनाचा तू अंगीकार
केला आहेस, तर माझे रक्षण करून मोठ्या आवडीचे असे जीवदान मला दे ना. २ माझ्या मनाची ही एकच इच्छा
आहे की, बहुरसाचे सेवन नित्य करीत असावे तुझ्या घराजवळ माझा निवास अखंड असावा या याचकाची
एवढी एक इच्छा तू पुरवावीस. ३ माझ्या पूर्वकर्माचा जो ठेवा होता, त्यानेच मला हा मार्ग दाखविला आहे हे या
वाटण्याजोगा हा आदर त्यामुळेच निर्माण झालेला आहे मी तुझ्याजवळ मोठ्या प्रीतीने सेवेचे दान मागीत आहे ४
मी तुझी करुण वाणीने स्तुती करीत जाईन देवा याशिवाय माझ्या मनास दुसरे काहीही गोड लागत नाही झोपेत,
जागेपणी आणि स्वप्नामध्ये, ध्यानात, मनात देवा, तुझेच रूप मी धारण केले आहे ५ देवा, आता अशी अवस्था
झाली आहे की, भेट न होताही भेटल्याचे सुख आहे हे आहे की नाही याचा तूच विचार करून पाहा तुकाराम
महाराज म्हणतात, देवा, अशा प्रकारच्या अनुसधानान्चा झरा अखंडपणे मनात आहे हे साह्य माझ्या मनास तू
केले आहेस ६
६५० हेचि भवरोगाचे औषध । जन्म जरा तुटे व्याध ।
आणीक कांहीं नव्हे बाध । करील थद्य पड्वर्गा ॥ १ ॥
सावळें रूप ध्यावे डोळां । सा चौ अठराचा गोळा ।
पदर लागो नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्त्र ॥ २ ॥
भोजना न द्यावे अन्न । जेणे चुके अनुपान ।
तरीच घेतल्याचा गुण । होईल जाण सत्य भाव ॥ ३ ॥
नये निघो आपुलिया घरा । बाहेर लागो नये वारा ।
बहु बोलणे ते सारा । संग दुसरा वर्जावा ॥ ४ ॥
पास ते एक द्यावें वरी । नवनीताची होईल परी ।
होईल गुसळिले ते निवारी । सार भीतरी नाहीं तया ॥ ५ ॥
न्हायें अनुतापीं पाघरे दिशा । स्वेद निघो दे अवघी आशा ।
सार्थ तुकारामगाथा ३२५
वेद, अठरा पुराणे यांचे सारच होय. या रूपाच्या प्राप्तीमुळे दुष्टाचा स्पर्शसुद्धा आपणांस कधी होत नाही. विष्णू-
सहस्रनाम व रामकृष्ण हरी हा मंत्र वारंवार जपत जा तू. २ अनुपानात दिल्याने जर चूक होत असेल, तरी मग
त्यास भोजनही देऊ नये. असे केले तरच औषध घेतल्याचा गुण येईल हे सत्यच मानावे. ३ आत्मस्वरूपाच्या आपल्या
घरातून कधीही बाहेर पडूच नये. बाहेरच्या विचारांचा जरा वारा लागेल असे कधी करू नये. वायफळ बडबड
करण्यांचेही दूर सारावे. भलत्याची संगत करू नये. ४ आपल्यापाशी जे एक शुद्ध चित्त आहे तेच श्रीहरीस द्यावे.
ते दिल्याने नवनीतच दिल्याचे श्रेय लाभेल व घुसळल्यानंतर असार असे ताक राहील. ते तू दूर सारून टाक. कारण
त्याच्या आत काहीच तथ्य नसते. ५ पश्चात्तापाच्या किंवा वैराग्याच्या पाण्याने तू न्हाऊन नीघ. डोक्यावरून सर्व
दिशा तू पांघरून घे. तुझ्या अंगातील आशारूपी घाम सारा निघू दे. मग तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे तू
यापूर्वी जसा ब्रह्मस्थिती भावात होतास, तसाच परत होशील. त्यामुळे तुला वैराग्य चांगले प्राप्त होईल. ६
६५१ मागुता हाचि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी ।
हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥ १ ॥
लक्ष चौऱ्याशीं न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा ।
येउनि पडसी संदेहुपुरा । वोळसा थोरा मायाजाळीं ॥ २ ॥
पशु काय पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती ।
कांहीं एक उपजतां मरती । बहिरों अंध होती पांगुळ मुकीं ॥ ३ ॥
नरदेह निधान लागलें हातीं । उत्तम सार उत्तम गती ।
होइन देवचि म्हणती ते होती । तरि कां चित्तीं न धरायें ॥ ४ ॥
क्षण एक मन स्थिर करुनी । सावध होई डोळे उघडोनी ।
पाहें वेद बोलिले पुराणीं । तुका विनवणी करीतसे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- मागुता-मानंतर, निधान-चांगले साधन
अर्थ :- या जन्मात जी सुखदुःखे तू भोगली आहेस ती ध्यानात घेता, यानंतरही तुला माणसाचा जन्म
येईल असे काही निश्चयाने घडेल असे नाही हे सर्व समजत असूनही तू याविषयी आंधळा का होतोस रे ? १
चौऱ्याऐंशी लक्ष योनींच्या फेऱ्या काही तुझ्या चुकायच्या नाहीत त्यावेळी गर्भवासातील थोर यातना तुला भोगा-
वयास लागतील आणि चुकून माणसाच्या जन्मास आलास तर संदेहाच्या अवस्थेत सापडशील. या प्रपंचात देहादी
वृत्तीचे संकट फार थोर आहे. २ तुझी अवस्था पशूसारखी होऊ देऊ नकोस पशू कधी पापपुण्याचा विचार तरी
करतात का ? भोग भोगताना ते कधी उत्तम, मध्यम असा तरी विचार करतात का ? काही जन्म होताच मरतात,
काही आंधळे होतात, काही पांगळे होतात, काही मुके होतात ३ तेव्हा नीट विचार कर. चांगले नरदेहासारखे
साधन हाताशी आले आहे. हेच सर्व उत्तमाचे सार आहे उत्तमातील गती हीच आहे. याच मानवी देहाने मी देवच
होणार असे म्हटले तर होण्यासारखे आहे तर मग या श्रीहरीस तू चित्तामध्ये का धारण करीत नाहीस ? ४
क्षणभर मन स्थिर करून मग सावध हो व डोळे उघडून पाहा. तुकाराम महाराज म्हणतात, वेद, पुराणे काय काय
बोलतात, हे तू नीट पाहा, अशी माझी तुला विनंती आहे. ५
६५२ दास्य करी दासांचें । उणें न साहे तयांचें ।
वाढिलें ठायींचें । भाणें¹ टाकोनियां धांवे ॥ १ ॥
ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटीं कर ।
सर्वस्यें उदार । भक्तांलागीं प्रगटे ॥ २ ॥
१ भाने.
हृदयीं श्रीवत्सलाछन । मिरवी भक्तांचें भूषण ।
नाहीं तयाचा सीण । सुख धरिले लातेचें ॥ ३ ॥
सत्यभामा दान करी । उजूर नाहीं अगोकारी ।
सेवकाच्या शिरीं । धरूनि चाले पादुका ॥ ४ ॥
राखे दारवटा बळीचा । सारथी¹ जाला अर्जुनाचा ।
दास सेवकाचा । होय साचा अंकित ॥ ५ ॥
भिडा नो बोलवे पुंडलिकाशीं । उभा मर्यादा पाठीशीं ।
तुका म्हणे ऐसी । का रे न भजा माउली ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - आणि-वाढलेले ताट उजूर-सबब, दारवटा-दरवाजा
अर्थ - हा विठ्ठल किती दयाळू आहे आपल्या भक्ताची व सेवकांचीही सेवा हा नेहमी करीत असतो
त्याचे काही कमी पडलेले त्याला सहन होत नाही त्यांना मदत करण्यासाठी हा देव वाढलेले ताटही बाजूस सारून
धावत असतो १ असा हा कृपेचा मोठा सागर आहे हा विटेवर उभा असून याचे हात याच्या कमरेवर आहेत
हा अतिशय उदार असून आपल्या भक्तांसाठी प्रकट झालेला आहे २ भृगूने दिलेली लाथ हा प्रेमाने आपल्या
हृदयावर श्रीवत्सलाछन म्हणून मिरवीत असतो त्याचा काही त्याला त्रास वाटत नाही त्या लत्ताप्रहाराचेही त्याने
सुखच धारण केले आहे ३ एकदा सत्यभामेने श्रीकृष्णाचे दान नारदास दिले, तरी कुठलीही सबब न सांगता
नारदाच्याच पादुका डोक्यावर धारण करून या देवाने त्याचा सत्कार केला ४ हा बळीचा दरवाजा रक्षण कर-
णारा झाला अर्जुनाचा सारथी हाच होता हा देव खरोखर आपल्या सेवकाचा सेवकच होऊन राहतो ५ मोठ्या
संकोचाने हा देव पुंडलिकापाशी बोलला नाही त्याने सुचविल्याप्रमाणे तो पाठीमागे निमूटपणे उभा राहिला
तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही प्रेमळ माउली का रे भजत नाहीत ? ६
विवरण - ईश्वर हा आपला मायबाप असून त्यालाच सर्व चिंता असते तो किती कनवाळू आहे व आपल्या
भक्तांवर तो कसा प्रसन्न असतो, त्यांना संकटात कशी मदत करतो, त्याचे दास्य तो स्वतः कसे करतो, याची अनेक
उदाहरणे साधुसंत आपल्या वाङ्मयात देत असतात या अभंगात दिलेला नारदाची भृगूची अर्जुनाची, बळीची उदा-
हरणे सर्वप्रसिद्ध अशीच आहेत ब्रह्मा, विष्णू व महेश यात श्रेष्ठ कोण याचा निवाडा करण्याचे काम भृगू ऋषीवर
आले असताना तो श्रीविष्णूकडे आला त्यावेळी विष्णू झोपलेले होते भृगून एकदम आत जाऊन श्रीविष्णूच्या छाती
वर लाथ मारली तरी विष्णू काही रागावले नाहीत उलट त्यांनी भृगूस वंदन करुन त्याचा लत्ताप्रहार भूषण
म्हणून मिरविला नंतर भृगूने प्रसन्न होऊन सर्व देवात विष्णूच श्रेष्ठ असे म्हटल भृगूची ही लाथच श्रीविष्णूस
श्रीवत्सलांछन म्हणून गौरवाची वाटते, अशी कथा पद्मपुराण भागवतपुराण यात आहे
६५३ हरि तैसे हरीचे दास । नाहीं तया भय मोह चिंता आस ।
होऊनि राहाती उदास । बळकट फास भवतीची ॥ १ ॥
धरूनि पाय त्यजिले जन । न लगे मान मृत्तिकाधन ।
कंठीं नाम अमृताचें पान । न लगे आन ऐसे जाले ॥ २ ॥
वाव तरी उवडच पोटीं । धीर सिंधु ऐसे जगजेठी ।
कामक्रोधा न सुटे मिठी । गिहे तरी वेठीं राबविती ॥ ३ ॥
बळें तरि नागवती फाळा । लोन तरि सकळांच्या तळा ।
उदार देहासी सकळा । जाणोनि कळा सर्व नेणते ॥ ४ ॥
१ रथी
सार्थ तुकारामगाथा ३२७
संसार तो तयांचा दास । मोक्ष तें' पाहातसे वास ।
Riddhisiddhi deshavata tras. Na shivati yas vaishnavajan ॥ ५ ॥
जन्ममृत्युस्वप्नांसारिखें । आप त्यां न दिसे पारखें ।
तुका म्हणे अखंडित सुखें । वाणी येदे मुखें प्रेमामृताची ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- वाव-अवकाश, जागा, वेठीं-विगारीने, गिन्हे-ग्रह, देशवटा-देशाच्या हद्दीबाहेर
अर्थ :- हा श्रीहरी जसा आहे, तसेच त्याचे दासही भय, मोह, चिंता व आशा यांच्या विरहित आहेत. ते
सर्वस्वी उदास झाले आहेत. त्यांनी भवतीची कास बळकटपणे घातली आहे. १ या श्रीहरीचे पाय ज्यांनी लोकांचा
त्याग करून धरिले आहेत, त्यांना कुठल्याही मानसन्मानाची जरूरी नसते. त्यांना धनही मातीच्या किंमतीचे वाटते.
त्यांच्या मुखांत नेहमी नामामृताचेच पान असते. त्यांना दुसऱ्या कशाचीच जरूरी नसते. २ त्यांच्या पोटांत दयेस
फार मोठी जागा असते. समुद्राप्रमाणे ते धीरगंभीर असतात. त्यांची ईश्वराच्या पायांवरील मिठी कामक्रोधादि-
कांनाही सुटत नाही. हे ग्रहांसारखे तापदायक असले तरी ते त्यांना विगारीने वेठीला धरतात. ३ हे श्रीहरीचे
भक्त इतके बलवान आहेत की, ते प्रत्यक्ष काळासही पराजित करतात आणि नम्र तर इतके आहेत की, सर्वांच्या
खाली क्रमाने उभे राहतील. देहाविषयी हे सर्वस्वी उदार आहेत सर्व कला यांनी जाणलेल्या असूनही न जाणल्या-
सारखे ते वागतात ४ इतरांना कष्टदायक वाटणारा संसार हा त्यांचा दास बनतो. मोक्ष तर यांचीच वाट पाहात
असतो. रिद्धीसिद्धींना यांनी आपल्या देहरूपी देशाच्या सीमेपलीकडे हद्दपार केले असल्याने त्याचाही त्रास यांना
कधी होत नाही. अशा रिद्धीसिद्धींना वैष्णव लोक चुकूनही स्पर्श करीत नाहीत. ५ हे हरीचे दास जन्ममृत्यूंनाही
स्वप्नासारखेच मानतात. त्यांना आपले अथवा परक्याचे असा भेद मुळीच दिसत नाही. तुकाराम महाराज म्हणतात.
ते निरंतरपणे सुखी असतात. त्यांच्या वाणीतून अखंडपणे प्रेमामृतच बाहेर स्रवत असते. ६
६५४ बहुत जाचलों संसारीं । वसें गर्भी मातेच्या उदरीं ।
लक्ष चौऱ्याशी योनिद्वारीं । जालों भिकारी याचक ॥ १ ॥
जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशीं बांधलों संचितीं ।
प्रारब्ध क्रियमाण सांगाती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥ २ ॥
न सरे पोट नाहीं विसांवा । नाहीं नेम एक ठाव गांवा ।
नाहीं सत्ता न फिरे ऐसी देवा । लाही' जीवा खापरीं तडफडी ॥ ३ ॥
काळ बहुत गेले ऐसिया रीती । आणीक पुढें नेणों किती ।
खंडणा नाहीं पुनरावृत्ती । मज कल्पांतीं तरी वेगळें ॥ ४ ॥
ऐसें दुःख कोण हरील माझें । कोणा भार घालूं आपुलें ओझें ।
भवसिंधुतारक नाम तुझें । धांवसि काजें आडलिया ॥ ५ ॥
आतां धांव घालीं नारायणा । मजकारणें रंका दीना ।
गुण न विचारों अवगुणा । तुका करुणा भाकीतसे ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा:- भोवंडिती-गरगर फिरवितात.
अर्थ:-देवा, मी या संसारात फार गांजून गेलो आहे. चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून मी मातेच्या उदरात
वास केला असून मी सुखासाठी दोन याचक व भिकारी बनलेलो आहे. १ माझे हे जगणेही दुसऱ्याच्या स्वाधीन
आहे. कर्मबंधनाच्या फासात मी बांधून पडलो आहे. माझयाबरोबर माझे प्रारब्ध व क्रियमाण असून त्याच्या सत्तेने
ते मला गरगर निरनिराळया जन्मांतून फिरवीत आहेत. २ इतके भ्रमण करूनही माझे पोट भरत नाही; की
१ तो, २ लाहे.
विसावा मला मिळत नाही कुठल्याही एका गावात राहण्याचा माझा नेम नाही कुठे न फिरता एका जागी खिळून
असावे हे माझ्या सत्तेत नाही देवा, खापरीत जशी लाही भाजत असताना तडफडते, तशी अवस्था माझ्या जीवाची
झाली आहे ३ अशाच प्रकारचा काळ पुष्कळ गेला आणखी असा किती जाणार आहे, कुणास माहीत ?
मरपाताची वेळ आली तरी, पुन पुन जन्मास मण्यास खट पडत नाही ४ असे माझे हे दुख देवा, कोण दूर
करील ? कुणावर मी या ओझ्याचा भार घालू ? भवसिंधू तरून नेणारी नौका म्हणजे तुझे नाम आह कुणाचे काही
काम अडवून राहिले शी तू धावून येतोस ५ नारायणा मग आता माझ्यासाठी एवढा धावून य ना मी दीन आहे
गरीब आहे तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यासारख्या अवगुणी माणसांस गुणही विचारू नका अशी करुणा मी
देवा तुमच्याजवळ भाकीत आहे ६
६५५ जव हे सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाये ।
तव तू आपले स्वहित पाहें । तीर्थयात्रे जायें चुको नको ॥ १ ॥
जव काळ असे दुरी ठेला । तब तू हरिगुण गायें आइक वहिला ।
मनीं भाव धरुनि भला । न वचे त्याला चुको नको ॥ २ ॥
जोडोनि धन न घलीं१ माती । ब्रह्मवृंद पूजन यती ।
सत्य आचरण दया भूतीं । करीं सांगाती चुको नको ॥ ३ ॥
दशा यौवन वाणली अंगीं । पांगिला नव्हे विषयसंगी ।
काम क्रोध लोभ मोह त्यागीं । राहे सत्संगीं चुको नको ॥ ४ ॥
मग तेथें न चले कांहीं । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं ।
पुढें सचित जाईल ग्वाही । तुका म्हणे ते ही यमआज्ञा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीका - पांगिला-पंगू
अप - जोपर्यंत हातपाय नीट धडधाकटपणे चालत आहेत, तोपर्यंत तू आपले स्वहित नीट पाहून राहा
तीर्थयात्रांना जाण्यास चुकू नकोस १ जोपर्यंत यमाची पावले दूरच आहेत तोपर्यंत तू आपले स्वहित नीट साधून
ठेव, नेहमी श्रीहरीचे गुण तू एश्वत जा मनात शुद्ध भाव धारण करून श्रीहरीच्या सेवेत कधी चुकू नकोम २
सारखा पैसाच पैसा जमवून मातीस घालयू नकोस ब्राह्मण यती सन्यासी यांची पूजा करण्यात त्या द्रव्याचा खर्च
करावा नेहमी सत्याचे आचरण करावे सर्व भूतावर दयेची दृष्टी असावी या सर्वांचा ठेवा जवळ असावा यात तू
कधी चुकू नकोस ३ जोपर्यंत अंगात तारुण्य आहे व विषयभोगांनी पंगुत्व आलेले नाही तोपर्यंतच काम, क्रोध,
लोभ, मोह याथा त्याग करावा सतांच्या संगतीत राहण्यास कधी चुकू नका ४ आयुष्याची अरार एकदा आली
की, मग काही उपाय चालणार नाही सत्ता, संपत्ती या गोष्टी जागच्या जागी राहतील व ज कर्म तुम्ही साठविले
असेल ते साक्ष देत पुढ जाईल तुकाराम महाराज म्हणतात मग त्यावरून तुम्हास यमाची आज्ञा होईल ५
६५६ ऐक पाडुरंगा एक मात । कांहीं बोलणे आहे एकांत ।
आम्हा जरी तारील सचित । तरी उचित काय तुझें ॥ १ ॥
उसने फेडिता धर्म तो कोण । काय तया मानवेल जन ।
काय गा मिरवूनि भूषण । वाया थोरपण जनामध्ये ॥ २ ॥
अन्न जरी न मिळे तयासी देणें । आगंतुक पात्र उचित दान ।
उपकार तरी धनमश्रीपणें । जरी देणेंघेणें नाहीं आशा ॥ ३ ॥
१ घाली
शूर तों तयासी बोलिजे जाणा । पाठोशीं घालुनि राखे दीना ।
पार पुण्य नाहीं त्या भूषणा । ऐक नारायणा वचन हें ॥ ४ ॥
आतां पुढें बोलणें तें काई । मज तारोसी तरीच सही ।
वचन आपुलें सिद्धी नेईं । तुका म्हणे तईं मज कळसी ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- मात-गोष्ट, मंधीपणें-चांगल्या पंथानें, तईं-तेव्हांच.
अर्थ :- देवा, पांडुरंगा, तुमच्याशी काही एक गोष्ट एकान्तात करायची आहे. ती अशी की, आमचे कर्म जर
आम्हांस तारणारे आहे, तर मग तू उचित असे काय करणार आहेस ? १ उसने घ्यायचे व मग ते फेडायचे, हा
कुठला धर्म ? आम्ही चांगले कर्म करायचे व मग तुम्ही ते परतफेडीसाठी कृपा करुन मोजायचे, हा कसा धर्म होईल?
लोकांना तरी हे पटेल का ? याचे भूषण मिरविण्यात काय अर्थ ? उगाच जगात मोठेपण कशासाठी मिरविता ? २
ज्यास खायला मिळत नाही त्यास ते द्यावे. न बोलाविता जो येईल त्यास दान दिल्यास तेच उचित होईल जरी
काही देणेघेणे नसले तरी, धनाची आशा नसली तरी, चांगल्या पंथाने औपधोपचार करून उपकार करावेत. ३ जो
दीन लोकांना पाठोशी घालून रक्षितो, तोच शूर मानावा. नारायणा, याच माणसाच्या पुण्याईस काही सीमा नाही,
त्याच्या भूषणाला अंत नाही. हे माझं बोलणे देवा, सत्यच माना तुम्ही. ४ आता यापुढे बोलायचे तरी काय ? तू
मला योग्य प्रकाराने तारशील तरच खरे. तुकाराम महाराज म्हणतात, आता तू आपले पतितपावन हे नाव सिद्धीस
ने. त्याच वेळेस तू पतितपावन आहेस असे मी जाणीन. ५
६५७ चांगलें नाम गोमटें रूप । निवतो डोळे हरती ताप ।
विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प अत्ति सार ॥ १ ॥
शस्त्र हे निर्याणीचा वाण । निकट समय अवसान ।
कोठें योजेल दश दान । संडी नारायण दुःख चिंतनैं ॥ २ ॥
सकळ श्रेष्ठांचें मत । पाये सिद्धी पावती अनंत ।
म्हणोनि व्हावें शरणागत । आहे उचित एवढेंच ॥ ३ ॥
म्हणोनि रुसलों संसारा । सर्प विखार हा पांढरा ।
तुजशीं अंतर रे दातारा । याचे दावेदारांनिमित्त ॥ ४ ॥
येणें मज भोगविल्या' खाणीं । नसतां छंद लाविला मनीं ।
माजलों मी माझें श्रमणीं । जाली वोडणी विटंबना ॥ ५ ॥
पावलों केल्याचा दंड । प्राणी भोगविल्या उदंड ।
आतां केला पाहिजे षंड । तुका दंडवत घाली देवा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- गोमटे-गोरे, सुरेख, निर्याणींचा-शेवटच्या प्रसंगाचा, अवसान-देहाचा शेवट, दशदानें-
गाय, भूमी, तीळ, सुवर्ण, तूप, वस्त्र, गूळ, लवण व गृह ही दहा दाने आपल्या धर्मग्रंथात सांगितली आहेत,
संडी-दूर करितो, वोडणी-नालस्ती.
अर्थ :- या श्रीहरीचे नाम व रूप चांगले देखणे व सुरेख आहे. हे पाहताच डोळे निवून जातात. पाप संपते.
विठ्ठल विठ्ठल हा जप उघड असून अतिशय लहान व सारभूत असा आहे. १ आयुष्याच्या अखेरी अखेरीस तर हे
नाम म्हणजे शरीराचा अंत जवळ आला असताना योजावयाचे शस्त्रच होय या श्रीहरीच्या नामापुढे दशदानांचीही
१ भोगिल्या.
तु. गाथा....४२
३३० सार्थ तुकारामगाथा
किंमत फारशी नाही या नारायणाच्या चिंतनाने संसाराचे दुःख दूर होते २ सर्व श्रेष्ठ साधुसंतांचे हे असेच मत
आहे या नामामुळे सर्व सिद्धी व अनंतरूप हरी याची प्राप्ती होते म्हणून या श्रीहरीस त्याच्या नामरूपाच्या साह्याने
शरण जावे एवढेच उचित असे करण्यासारखे आहे ३ हा संसार म्हणजे एक पांढरा विषारी सर्प असून देवा
दातारा, याच्यामुळे तुझमध्ये व आमच्यात फार अंतर पडते असा हा रूपरूपी संसार मोठा दावेदार असल्याने मी
त्याच्यावरच रुसलो आहे ४ याच संसाराच्या मोहामुळे मला नाना जन्म भोगावे लागले नाना नतरपा छंदांस याने
मला लाविले, आणि याच्याच भ्रमात मी भ्रमण करीत राहिलो या कामी माझी फार नालस्ती व विटंबना झाली
देवा ५ मी या संसाराच्या नादाने जे जे केले त्याचा पुरेपूर दंड मला मिळाला यामुळे पुष्कळ जन्माच्या खाणी
मला भोगाव्या लागल्या तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता मात्र याचा शेवट व्हावयास हवा देवा तुमच्या
पायावर माझे अनेक दंडवत आहेत ६
६५८ चांगला तरी पूर्णकाम । गोड तरी याचेचि नाम ।
दयाळु तरी अवघा धर्म । मला तरी दासा श्रम होऊ नेदी ॥ १ ॥
उदार तरी लक्ष्मीपेसी । जुझार तरी कळीकाळासी ।
चतुर तरी गुणाचीच रासी । जाणता तपासी तो एक ॥ २ ॥
जुनाट तरी बहु काळा । न कळे जयाची लीळा ।
नेणता गोवळीं गोवळा । लाघवी अबळाभुलयणा ॥ ३ ॥
गाढचा तरी भावाचा अंकित । बराडो तरी उच्छिष्टाची प्रीत ।
ओगळ तरी कुब्जेंशीं रत । भ्याड अनंत बहु पापा ॥ ४ ॥
खेळतो येणेंचि खेळावा । नट तो येणेंचि अवगावा ।
लपोनि जीवीं न कळे जीवा । धरिता देवा नातुडेसी ॥ ५ ॥
उच तरी बहुतचि उच । नीच तरी बहुतचि नीच ।
तुका म्हणे बोलिलों साच । नाहीं अहाच पूजा केली ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - गाढचा-गावडळ बराडो-जागाळभूत आवगावा-अंगी आणावा, नातुडेसी-सापडत
नाहीस आहाच-उगीच व्यथ
अर्थ - हा देव फार चांगला म्हणून याचे वर्णन करावे, तर तो प्रत्यक्ष पूर्णकामच आहे याचे नावही गोड
असल्याने त्या गोडीचे वर्णन काय करावे ? हा दयाळू आहे म्हणावे तर, सर्व धर्माचे सार जे दयाळुत्व हे तोच आहे
यास भला तरी किती म्हणावे ? हा आपल्या दासांना काहीही श्रम होऊ देत नाही १ हा मोठा उदार आहे याचे
घणन करावे तर प्रत्यक्ष लक्ष्मीच याची दासी आहे याच्या शौर्याचे वर्णन करावे तर, हा कळीकाळास म्हणजे प्रत्यक्ष
यमासही अतिशय आहे याला चतुर म्हणावे तर, हा एक गुणांचीच रास आहे त्याला जाणणारा तो एक स्वतःच
आहे २ हा देव जुनाट म्हणून याचे वर्णन करावे तर त्याच्या लीलेचे वर्णन पुष्कळ काळातही करता येण्यासारखे
नाही हा नेणता असून गवळ्यारूपात गवळी होऊन राहिला आहे आणि लाघवीपणात तो एवढा चतुर आहे की,
त्याने सर्व गोपीना भुलविले आहे ३ हा देव गावडळ म्हणावा तर तो भक्तिभावामुळे वश होणारा असला हा
अतिशय आशाळभूत असून भक्त लोकाच्या उच्छिष्टाचे यास मोठच प्रेम असते हा देव इतका ओगळ की आठ
ठिकाणी वक्र असणाऱ्या कुब्जेशी हा रममाण झाला असून, अनंत पापे करणाऱ्याना हा अतिशय भयदायक आहे ४
नाना प्रकारचे खेळ ते याच देवाने खेळावेत नाना प्रकारची अभिनयाची सोंगे यानेच अंगी आणावीत हा जीवाच्या
मध्ये लपून राहिलेला असल्याने कुणास कळून येत नाही याला धरायला जावे तर, हा कुणाच्याच हातात सापडत
सार्थ तुकारामगाथा ३३१
नाही ५ हा देव उच्च म्हणावा तर फार उच्च आकाशाएवढा आहे लहान म्हणावा तर अणुरेणुपेक्षाही लहान
आहे तुकाराम महाराज म्हणतात, हे जे मी सागितले आहे, ते सर्व खरेपणाचे असून उगीच व्यर्थ स्तुती केली
असे नाही ६
६५९ काय आम्ही भक्ति करणे कैसी । काय एक वाहावे तुम्हासी ।
अवघा भरोनि उरलासी । वाणीं खाणीं रसीं रूपीं गंधीं ॥ १ ॥
कसे करु इंद्रिया बंधन । पुण्यपापाचे खंडण ।
काय व्रत करु आचरण । काय तुजविण उरले तें ॥ २ ॥
काय डोळे झाकुनिया पाहू । मंत्रजप काय ध्याऊ ।
कवणे ठायी धरुनि भाव । काय ते याव तुजविण ॥ ३ ॥
काय हिंडो कवण दिशा । कवणे ठायीं पाय ठेवू कैसा ।
काय तू नन्हेसि न कळे तैसा¹ । काय मी कैसा पाहो आता ॥ ४ ॥
तुझिया नामाची सरुळ । पूजा अर्चन मन माळ ।
धूप दीप नैवेद्य फळ तांबूल । घेऊ पुष्पांजुळ तुका म्हणे ॥ ५ ॥
शरीर उत्तम चांगले । शरीर सुखाचें घोसुलें ।
शरीरें साध्य होय केलें । शरीरें साघलें परब्रह्म ॥ २ ॥
शरीर विटाळाचें आलें । मायामोहपाशजाळें ।
पतन शरीराच्या मुळें । शरीर काळें व्यापिलें ॥ ३ ॥
शरीर सकळ हे शुद्ध । शरीर निधींचा ही निघ ।
शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यें भोगो देह शरीरा ॥ ४ ॥
शरीर अविद्येचा वाधा । शरीर अवगुणाचा राधा ।
शरीरीं वसे बहुत बाधा । नाहीं गुण सुदा १ एक शरीरीं ॥ ५ ॥
शरीरा सुख नेदावा भोग । न द्यावे दु:ख २ न करी त्याग ।
नव्हे चोखटें ना चाग । तुका म्हणे येग करी हरिभजनीं ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा — धार-ठिकाण, स्थान, घोसुलें-घट, सुदा-चांगला, येग-जलदीने
अर्थ - हे शरीर म्हणजे दुःखाचे कोठारच होय शरीर हे अनेक रोगाच्या निवासाचे भांडारच होय शरीर
हे अनेक धार्णीचे आधारस्थानच होय या शरीराएवढे अपवित्र काय आहे ? १ पण शरीर हे अतिशय उत्तमही
आहे. शरीर म्हणजे अनेक सुखाचा घडच्या घड मानावा याच शरीरामुळे जे मनात धरावे ते साध्य होते परब्रह्माची
साधनाही याच शरीराच्या साह्याने करावची असते २ हे शरीर म्हणजे विटाळाचे गोठलेले आळेच समजावे माया,
मोह, पाश याचे जाळे म्हणजे हे शरीर समजावे या शरीराच्याचमुळे पतनाचा, स्खलनाचा प्रसंग येतो या शरीरावर
काळाची नजर एकसारखी असते ३ हे मानवी शरीर अतिशय शुद्ध आहे शरीर हे सर्व धनाध्या साठ्याचा साठा
आहे याच शरीरामुळे संसाराची बंधने तुटतात याच शरीराच्या मध्यभागी देवाची वस्ती असते ४ हे अविद्येचा
वाघा म्हणजे साठाच होय साऱ्या दोषाचे रसायन या शरीरात असते या शरीरात फारच बाधा निर्माण झालेल्या
असतात या शरीरात एकसुद्धा चांगला गुण नाही ५ म्हणून या शरीराला नाना प्रकारचे भोग देऊन सुख देऊ नये
त्याचा त्याग करून दुखही देऊ नये तर तुकाराम म्हणतात, स्वतः शरीर आपण होऊन चांगलेही नाही व वाईटही
नाही त्यास त्वरेने हरिमजनाकडे लावावे, म्हणजेच त्याचे रूप चांगले निर्माण होईल ६
विवरण — पंचमहाभूतांचा बनलेला हा गोळा म्हणजे शरीर मानवाच्या उदरात नऊ मास अत्यंत हाल सोडून
याचा जन्म झाला याच्यात वाह्य त्याचा मग थाट सुरु झाला याच चोचले सुरू झाले याचीच किमत वाढली देहात्म-
भावच वाढून बसला या देहामध्ये निवास करणारा दुसरा कुणी धनी आहे, हे विसरून हा देहधारी मनुष्य पंचविष-
यातच रममाण झाला म्हणून साधुसंतांनी या देहाची भरपूर विटंबना केली दिसेल हा देह म्हणजे मलमूत्राचे
कोठार, दुर्गंधीचा नाठा, असे वर्णन वाचून गत ह गरीग्गोईयांचे, देहाच्या लावण्याचे हप्ते होते, अशा गैरसमज
होण्याचा संभव असतो संतांना देहान मागाहून मान्य होक, त देह हा एक परमार्थसाधनाचा, ईश्वरप्राप्तीचा सर्वोत्तम
उपाय म्हणून याच मानवी देहाच्या साह्याने आपणास आपण वितू ती वस्तू गाधून करून घेता येते ईश्वरप्राप्तीचे
एव पार महत्त्वाचे अस साधन म्हणून या शरीराकडे पाहिल्यास या शरीराइतके उत्तम दुसरे काय आहे ? अशाच
प्रवृत्त सर्व मत विचारीत असताना दिसतील निवृत्तीनाथांनी 'देहीं देव आहे हैं बोलती वेद', 'निवृत्ती पहातु देहामाजी
झातु देहोचि विसत्रु सर्वांठायीं' अशा शब्दात देहाच महत्त्व वर्णन वेडे आहे या देहामध्ये देव पाहण्यास शिकणे हे खरे
सार आहे 'नरदेह परमपावन । तरी साधी ब्रह्मज्ञान', 'देह सांडाया ना मांडावा । येने परमायुंधि साधावा' असाच
निर्वाळा एकनाथांनी दिलेला आहे 'देहिं देव्हिली पडरी' हे नामदेवाना लाभलेले सुख देहामुळेच ना ? 'धन्य धन्य
तें शारीर । जेथ कथा निरंतर,' 'नरदेह उत्तम चांग । घरा वाग कीर्तनाची' या शब्दान्नी एकनाथांनी या नरदेहाचे
माहात्म्य वर्णन केले आहे
१ सुघा, २ सुड
सार्थ तुकारामगाथा ३३३
समर्थ रामदासांनी संसारदुःखाचे व नरदेहाचे अत्यंत किळसवाणे असे वर्णन केले असले तरी, सिद्धान्त
सांगताना त्यांनी देहाची प्रतिष्ठा मान्य करून या दुर्लभ देहाचा यथायोग्य उपयोग कसा करावा तेच मागितले आहे.
'धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहो । जो जो कीजे परमार्थ लाहो । तो तो पावे सिद्धीते' या भाषेत नर-
देहाचे महत्त्व वर्णन करून समर्थांनी म्हटले आहे, 'नरदेह पांगुळ असतां । तरी तो कार्यास न येतां । अथवा थोटा जरी
असतां । तरी परोपकारास न ये' या शब्दावरून शरीराचे ध्येय काय असावे हेही ध्यानात येणारे आहे. हे शरीर
अस्थिमांसाचा पुतळा असले तरी, याच्याच साहाय्याने आपण सर्व कलांत निपुण होऊन ईश्वरनिष्ठ व्हायचे असते.
'अस्थिमांसांचा पुतळा । जेणे ज्ञानें सकळा फळा । शरीर भेद वेगळा ठाईं ठाईं ।' असा समर्थांचा या शरीराविषयी
विवेक आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, हे शरीर स्वतः होऊन काही चांगले अथवा वाईट नाही. ते
ईश्वराच्या भजनास लावावे, परमार्थप्रवण करावे, म्हणजे ते 'सुखाचे घोसुलें' कसे आहे याची प्रतीती येईल
६६१ इतुलें करीं भलत्या परी । परद्रव्य परनारी ।
सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्तें वेव्हारीं सुखरूप ॥ १ ॥
न करीं दंभाचा सायास । शांती राहें बहुतस ।
जिव्हे सेवीं सुगंधरस । न करीं आळस रामनामीं ॥ २ ॥
जनमित्र होईं सफळांचा । अशुभ न बोलावी वाचा ।
संग न धरावा दुर्जनाचा । करीं संतांचा सायास ॥ ३ ॥
कर्रिसी देवाविण आस । अवघी होईल निरास ।
तृष्णा वाढविसी बहुतस । कधीं सुखास न पवसी ॥ ४ ॥
धरूनि विश्वास करीं धीर । करितां देव हाचि निर्धार ।
तयाचा वाहे योगक्षेमभार । नाहीं अंतर¹ तुका म्हणे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- भलत्या परी-कोणत्याही प्रकाराने, बहुतस-पुष्कळ.
अर्थ - कोणत्याही प्रकाराने का होईना, पण तू इतके तरी कर. दुसऱ्याचे द्रव्य व दुसऱ्याची स्त्री यांची
इच्छा सोडून दे आणि मग खुशाल सांसारिक व्यवहार कर. १ दांभिकपणे कुठलेही प्रयत्न करू नकोस. पुष्कळ
शांतता धारण कर. जिव्हेने हरिनामाच्या सुगंधाचे सेवन कर. रामनामाच्या उच्चारात आळस करू नकोस २
सगळ्यांचा जिवलग मित्र हो. वाणीने अशुभ उच्चार कधी करू नकोस. वाईट लोकांची संगत कधी धरू नये.
संतानी सांगितलेल्या भक्तिमार्गाने जाण्याचा तू प्रयत्न कर. ३ देवावाचून, जर काही इतर इच्छा करशील, तर
मात्र मग तुझी निराशा होईल फार. फार तृष्णा वाढविलास तर मग कधीच सुख तुला होणार नाही ४ श्रीहरीवर
विश्वास ठेवून मोठ्या धीराने वर्तन कर. सर्व काही करणारा हा देवच आहे, असा विश्वास मनात धारण कर.
तुकाराम महाराज म्हणतात, हा देव आपल्या योगक्षेमाचा भार वाहतो, काही कमी पडू देत नाही. ५
६६२ संसारसिंधु हा दुस्तर । नुलंघवे उल्लंघितां पार ।
बहुत वाहाविलें दूर । न लगेचि तीर पैल थडी ॥ १ ॥
किती जन्म जाला फेरा । गणित नाहीं जी दातारा ।
पडिलों आवर्ती भोवरा । बहुता थोरा धोळसिपा² ॥ २ ॥
वाढलों परी नेणती बुद्धी । नाहीं परतली घरिली शुद्धि ।
मग म्यां विचारावें कधीं । ऐसी संधी सांडुनियां ॥ ३ ॥
१ अंतपार, २ धोळंडिया.
३३४ सार्थ तुकारामगाथा
अनेक खाणीं आहार निद्रा । भयमैथुनाचाचि थारा ।
बालत्व तारुण्य जरा । प्रधान पुरा भोग तेथें ॥ ४ ॥
ऐसो उलघूनि आलों स्थळें । बहु भोवंडिलो काळें ।
आतां हे उगवावें जाळें । उजेडा बळें दिवसाच्या ॥ ५ ॥
सांडीन या संसाराची वाट । बहु येणे सोसविले कष्ट ।
दावी सत्या ऐसे नष्ट । तुका म्हणे भ्रष्ट जालो देवद्रोही ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- दुस्तर-तरून जाण्यास कठिण, गणित-हिशेब, आवर्ती-चक्रात, खाणी-योनी, जन्म,
भोवंडिले-दमविले, उगवावे-मुक्त व्हावे
अर्थ - हा संसाररूपी सागर तरून जाण्यास फार कठिण असा आहे हा ओलांडून जाण्याचा प्रयत्न
केला तरी तो ओलांडिता येत नाही आजवर पुष्कळच या संसारसागराच्या पुरातून वाहून गेले त्यांना पैलतीर
हाती लागलाच नाही १ देवा, कित्येक जन्माचा फेरा चालू आहे हातांरा, याचा काही हिशेबच नाही मजजवळ,
या जन्माच्या चक्रात मी अवचितपणे सापडलो आहे फार मोठ्या संकटांतून फिरतो आहे २ माझे वय वाढले,
पण त्या मानाने बुद्धी काही वाढली नाही. मी अज्ञानीच राहिलो माझ्या बुद्धीने परमार्थाविषयी काही आस्था
धारण केली नाही अशा अवस्थेत मी परमार्थाविषयी विचार तरी कधी करावा ? ३ अनेक जन्मांतून आहार,
झोप, भय, मैथुन याचीच वस्ती झाली बाल्य, तारुण्य, वृद्धत्व, यातून भोगनाच प्राधान्य म्हणत मिळाले ४
अशा प्रकारच्या अनेक जन्माची स्थळे उल्लघून मी आलो पण या काळाने मला फार दमविले आता या प्रपंचाच्या
जाळयातून मुक्त व्हावे व दिवसाच्या साहाय्याने सुटका करून घ्यावी असे वाटते ५ आता या संसाराचा मार्ग मी
सोडूनच देणार आहे या प्रपंचमोहाने फार कष्ट झाले मला तुकाराम महाराज म्हणतात, हा नष्ट, दुष्ट संसार
खोटा असून खऱ्यासारखा भासतो, आणि त्यामुळेच देवाचा द्रोह करून आपण भ्रष्ट झाल्यासारखे होतो ६
६६३ विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी ।
विठ्ठल पुंडलिकापासीं । कृपादानाविसीं उदार ॥ १ ॥
विठ्ठल स्मरणा कोवळा । विठ्ठल गौरवी आगळा ।
आधार ब्रह्मांडा सकळा । विठ्ठल लीलाविग्रही ॥ २ ॥
उभाचि परी न मनी सीण । नाही उद्धरिता भिन्न ।
समर्थांचे घरीं एक अन्न । आर्तभूता क्षणोक्षणा सांभाळी ॥ ३ ॥
रुचीचे प्रकार । आणिताती आदरें ।
फोटें ही न पडे अंतर । थोरा थोर धाकुट्या धाकुटा ॥ ४ ॥
करिता बळ धरिता नये । शोभता डोळे मनेच होय ।
आपुल्या उद्देशाची सोय । जाणे हृदयनिवासी ॥ ५ ॥
पान्हा तरी आल्या अंतर तेथें । तो नाहीं भरिले रिते ।
करितो सेयन आइतें । तुका म्हणे चितें चित्त मेळवूनी ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- दानाविसीं-दानाविषयी, आर्तभूता-दुःखी झालेल्या प्राण्यांना
अर्थ - हा आमचा विठ्ठल देव भीमातीरावर निवास करून पंढरपुरात उभा आहे पुंडलिकापाशी हा तिष्ठत
उभा आहे. भक्तांच्यावर कृपा करण्यासाठी हा फार उदार आहे १ हा विठ्ठल स्मरण करणारांना अतिशय कोवळा
असून, त्याचा आणखी गौरव करणे कठिण आहे या गौरवाच्या पलीकडे तो आहे साऱ्या ब्रह्मांडास त्याचा आधार
असतो त्याच्या लीला सर्वत्र असतात. २ हा देव उभा असला तरी, त्याबद्दलचे दुःख कधी मानीत नाही. भक्तांचा
उद्धार करिताना हा भेदभाव मानीत नाही. समर्थांच्या घरी, श्रीमंताच्या घरी जसे सर्वांना एकाच प्रकारचे अन्न
मिळते, त्याप्रमाणे भुकेने दुःखीकष्टी झालेल्यांना हा देव क्षणोक्षणी सांभाळीत असतो. ३ मोठ्याच्या घरी
नाना रुचींचे, नाना प्रकार अन्नाचे केलेले असतात, मोठ्या आदराने वाढायला आणतात. त्यावेळी थोरांना थोर पदार्थ,
लहानांना किरकोळ पदार्थ, असा भेदभाव कुणी करीत नसतात. ४ हा देव नुसत्या बळाने कधी हातात सापडत नाही.
डोळ्यांनी त्याच्याकडे निरखून पाहताच सारे मनच तदाकार होऊन जाते. आपल्या भक्तांच्या मनांतील उद्देश हा
हृदयनिवासी विठ्ठल जाणून असतो ५ कुणी प्रेमी भक्त आल्यास प्रेमपान्हाास कधी अंतर पडत नाही. तो पान्हा
कधी संपतो असे घडतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या आयत्या प्रेमपान्ह्याचे सेवन मी त्याच्या
चित्तात माझे चित्त मिळवून करीत आहे. ६
६६४ ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख ।
अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥ १ ॥
न पुरे डोळियांची धणी । सखोल कृपेचीच खाणी ।
स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥ २ ॥
रामकृष्णध्यान वामननरसिंहों । उग्र आणि सौम्य कांहींच नाहीं ।
सांपडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाहीं याचें भातुकें ॥ ३ ॥
गुणगंभीर चतुर सुजाण । शूर धीर उदार नारायण ।
व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहन लावण्य हें ॥ ४ ॥
ठाण हें साजिरे सुंदर । अविनाश अविकार ।
अनंत आणि अपार । तो हा कटीं कर धरिताहे ॥ ५ ॥
जयाची वाणी सुमनमाळा । परमामृतजिव्हाळा ।
अनंता अंगीं अनंत कळा । तुका जवळ चरणसेवक¹ ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- उपजे-निर्माण होणे, धणी-तृप्ती.
अर्थ :-या श्रीहरीचे मुख इतके सुंदर आहे की, याकडे पाहताच सर्व ताप दूर होतात. भवरोगासारख कठीण
दुःखही दूर होते. याला पाहताच मोठे सुख निर्माण होते. माझ्या दृष्टीपुढेच हे सुख उभे आहे १ याला कितीही
पाहिले तरी, डोळ्याची तृप्ती होत नाही. याच्या कृपेची खाण मोठी आहे याचे स्तवन करिताना वेदवाणीही पुरी पडत
नाही. असा हा सारख्या पावलाचा श्रीहरी, कृपेचा साठा श्रीविठ्ठल उभा आहे. २ रामकृष्ण हे रूप वामनासारखे
या नरसिंहासारखे प्रथम उग्र, मग सौम्य, अथवा प्रथम सौम्य मग उग्र असे काहीच नाही. याच्याकडे भक्तीच्या
प्रवाहाने येणाऱ्या व भक्तिभावाने पाहणाऱ्या सेवकांनाच हा प्राप्त होतो. शुद्ध भाव हाच याचा प्रेमाचा खाऊ आहे ३
हा श्रीहरी गुणांनी गंभीर, चतुर, सुजाण, शूर, धीर, उदार असून त्रिभुवनांत भरून राहिलेला आहे. याचे सौंदर्य
मन मोहून टाकणारे आहे. ४ या नारायणाचे हे स्थान अतिशय सुंदर व शोभिवंत असे असून ते अविनाशी व
अविकारी आहे. त्याचे स्वरूप अनंत व अपार असूनही हा देव कमरेवर हात धरून उभा आहे. ५ याची वाणी
म्हणजे फुलांची माळच आहे. त्याची कृपा म्हणजे जिव्हाळ्याचे व प्रेमाचे अमृतच होय. तुकाराम महाराज म्हणतात,
या अनंताच्या अंगी अनंत कला असून याच्याजवळ हा सेवक उभा आहे. ६
१ चरण सेवे.
३३६ सार्थ तुकारामगाथा
कान्होबा० नाट अभंग ८
६६५ अगा ये वैकुंठनायका । अगा ये त्रैलोक्यतारका ।
अगा जनार्दना जगव्यापका । अगा पाळका भक्तांचिया ॥ १ ॥
अगा ये वसुदेवदेवकीनंदना । अगा ये गोपिकारमणा ।
अगा बळिवध वामना । अगा निधाना गुणनिधी ॥ २ ॥
अगा ये द्रौपदीबांधवा । अगा ये सखया पांडवा ।
अगा जीवाचिये जीवा । अगा माधवा मधुसूदना ॥ ३ ॥
अगा महेश्वरा महाराजा । अगा श्रीहरी गरुडध्वजा ।
अगा सुदरा सहस्रभुजा । पार मी तुझा काय वर्णू ॥ ४ ॥
अगा अवतारांपरंपरा । निरालबा' निर्विकारा ।
अगा गोवर्धन धरणीधरा । अगा माहेरा दीनांचिया ॥ ५ ॥
अगा धर्मराया धर्मशीळा । कृपासिंधु कृपाळा ।
अगा प्रेमाचिया कल्लोळा । सकळकळाप्रवीणा ॥ ६ ॥
अगा चतुरा सुजाणा । मधुरांगिरा सुलक्षणा ।
अगा उदारा असुरमर्दना । राखें शरणा तुकयाबंधू ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा - निधाना-साठा, पार-अंत मधुरांगिरा-मधुरवाणी असलेला असुरमर्दना-असुरांचा
नाश करणारा
अर्थ - अरे वैकुंठनायका, माझे रक्षण करण्यास तू ये अरे त्रैलोक्याचे रक्षण करणाऱ्या देवा, अरे जनार्दना,
सर्व जगास व्यापून राहणाऱ्या देवा भक्तांचे पालन करणाऱ्या देवा, मी तुला शरण आहे १ अरे वसुदेवदेवकीच्या
मुला, अरे गोपिकांच्या रमणा अरे बळिराजास बांधून नेणाऱ्या वामना, अरे अनेक गुणांच्या साठ्या, मी तुला
शरण आलो आहे २ अरे द्रौपदीच्या सख्या अरे मित्रा पांडवा, अरे माझ्या जीवाच्या जीवा अरे माधवा, अरे मधु
नावाच्या दैत्याचा नाश करणाऱ्या मधुसूदना, मी तुला शरण आलो आहे ३ अरे महेश्वरा, अरे महाराजा, अरे
श्रीहरी, ज्याच्या ध्वजावर गरुडाचा निवास आहे, अशा गरुडध्वजा, अरे सुंदरा, अरे हजार हाताच्या सहस्रभुजा,
तुझ्या स्वरूपवर्णनास अंत नाही त्याचे मी काय वर्णन करू ? ४ अरे देवा, अवतारांची परंपरा तुझ्यापासूनच आहे
तुला कुठलाही आधार नसल्याकारणाने तू निरालंब आहेस, तू निर्विकार आहेस अरे हातावर गोवर्धन धारण कर-
णाऱ्या धरणीधरा अरे दीनांच्या माहेरा मी तुला शरण आलो आहे ५ अरे धर्मराया अरे धर्मशीला, तू कृपेचा
सागर आहेस अरे प्रेमाच्या कल्लोळा तू सर्व कलांत प्रवीण आहेस ६ अरे चतुरा, सुजाणा, अत्यंत गोड वाणी
असणाऱ्या मधुरांगिरा, सुलक्षणा, अरे उदारा, अरे असुरांचा नाश करणाऱ्या असुरमर्दना, हा तुकयाबंधू तुला शरण
आला आहे त्याचे रक्षण तू कर ७
विवरण - नाटाच्या या प्रसिद्ध अभंगातील या पुढचे महालात अभंग तुकयाबंधू या मुद्रेन अंकित झालेले
आहेत तुकयाबंधू याचे दोन अर्थ होऊ शकतात एक तुकारामबुवांचे धाकटे बंधू कान्होबा यांचे तरी हे अभंग
असावेत, किंवा तुकयाबंधू म्हणजे भक्तजनांचा बंधू तुकोबा असाही अर्थ असणे संभवनीय आहे तुकारामांच्याच
विचारांची छाप याही अभंगावर दिसते मागे अभंग क्र० ६४६ मध्ये ज्याप्रमाणे तुकारामबुवांनी अतिशय अव्यंग,
मनोहर आणि साभिप्राय विशेषणे या संवाद्यन वापरून भाव व्यक्त केला आहे, त्याचप्रमाणे याही अभंगात तुकयाबंधू
कान्होबा यांनी ईश्वराशी आपलं नाते वर्णन केले आहे
१ निरालंब
सार्थ तुकारामगाथा ३३७
६६६ उभा देखिला भीमातीरीं । कर मिरवले कटावरी ।
पाउलें तरी समचि साजिरीं । नाम तरी अनंत अतिगोड ॥ १ ॥
शंखचक्रांकित भूषणें । जडितमेखळा चिद्रत्नें ।
पीतांबर उटी शोभे गोरेपणे । लोपली तेणें रवितेजें ॥ २ ॥
श्रवणीं कुंडलें देती ढाळ । दशांगुळीं मुद्रिका माळ ।
दंतओळी हिरे झळाळ । मुख निर्मळ सुखरासी ॥ ३ ॥
कर्डी फडदोरा वांकी वेळा । बाहीं बाहुवटे पदक गळां¹ ।
मृगनाभी रेखिला टिळा । लवती डोळां विद्युल्लता ॥ ४ ॥
सुंदरपणाची साम्यता । काय वर्णू ते पावे आतां ।
तुक्याबंधु म्हणे रे अच्युता । धन्य ते मातापिता प्रसवली ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- जडितमेखळा-रत्नजडित कंबरपट्टा, चिद्रत्नें-चैतन्यरूपी रत्ने, ढाळ-तेज, दशांगुळी-
दहा बोटात, मुद्रिका-मुद्रांकित अंगठ्या, कर्डी-करदोरा, बाहीं-दंडावर, बाहुवटे-बाहुभूषणे, मृगनाभी-कस्तुरी
अर्थ :- हा श्रीविठ्ठल मी आज भीमेच्या तीरावर उभा राहिलेला पाहिला. याने आपले हात कमरेवर ठेवून
मिरविले आहेत. याची पावले समान असून अत्यंत शोभिवंत अशी आहेत. याचे नाव अनंत रूपात असून अतिशय
गोड असे आहे. १ शंख, चक्र इत्यादींनी अंकित झालेली भूषणे याने घातली आहेत. चैतन्याच्या रत्नानी याचा
कंबरपट्टा जडविलेला आहे. याच्या गोरेपणामुळे याचा पीतांबर व याच्या अंगाची उटी या गोष्टी शोभून दिसतात.
याच्या तेजाने सूर्याचेही तेज लोपून गेलेले दिसते २ याच्या कानात कुंडले शोभत असून त्याचा प्रकाश पडत आहे.
याच्या दहाही बोटात रत्नजडित अंगठ्या असून याच्या गळ्यात माळ आहे. याच्या मुखातील दातांची ओळ हिऱ्या-
प्रमाणे चमकत आहे. याचे मुख निर्मळ असून ते एक अथांग अशा सुखाच्या राशीप्रमाणे आहे. ३ याच्या कमरेस
करगोटा आहे. याच्या दंडांवर वाक्या व इतर बाहुभूषणे शोभून दिसतात. याच्या गळ्यात पदक शोभत असते.
मृगाच्या नाभीतून मिळालेल्या कस्तुरीचा टिळा याच्या कपाळावर आहे. याचे डोळे विद्युल्लतेप्रमाणे चमकणारे
आहेत. ४ या श्रीहरीच्या सुंदरपणाची साम्यता काय वर्णन करावी ? तुक्याबंधू म्हणत आहे की, अरे अच्युता,
जी माता तुला प्रसविला ती धन्य होय. ५
६६७ एक मागणें हृषीकेशी । चित्त द्यावें सांगतों वचनासी ।
मज अंतर तुझ्या चरणासी । न पडे ऐसी कृपा करीं ॥ १ ॥
नको दुजी बुद्धि आणीक । रिद्धिसिद्धी परलोक ।
तूं स्वामी मी सेवक । खंडणा नको करूं ऐसी ॥ २ ॥
मना येईल तो जन्म देईं । भलते कुळीं भलते ठायीं ।
तें मी सांकडें घालीत नाही । हृदयींहुनी तूं न वजें ॥ ३ ॥
इतुले करीं भलत्या परी । भलत्या भावे तुझे द्वारीं ।
राहेन दास होऊनि कामारी । वदो वेखरी नित्य नाम ॥ ४ ॥
नको विचारूं दुसरें आतां । शरण आलो जी पंढरीनाथा ।
तुक्याबंधु म्हणे रे अच्युता । आहेसि तूं दाता दानशूर ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :-खंडणा-विरोध, सांकडे-संकट, न वजे-दूर होत नाहीस, कामारी-सेवक, वेखरी-वाणी.
१ माळा.
तु. गाथा...४३
३३८ सार्थ तुकारामगाथा
अर्थ - अरे हृषीकेशी, तुझ्याजवळ एकच मागणे आहे मी नीट सांगतो, ते तू चित्त लावून ऐक तुझ्या
चरणांशी माझें अंतर पडू देऊ नकोस, येवढी कृपा कर १ याशिवाय मजविषयी दुसरी बुद्धी तू धरू नकोस मला
रिद्धीसिद्धी नकोत, मला परलोक नको केवळ तू स्वामी व मी सेवक असे एकच नाते राहू दे यामध्ये मात्र विरोध
होऊ नये २ तुझ्या मनास येईल तो जन्म मला तू दे कोणत्याही कुळात, कोणत्याही ठिकाणी तू मला जन्मास
घाल हे सकट काही मी तुझ्यावर घालत नाही पण माझ्या हृदयातून तू दूर होत नाहीस हे मात्र पाहा ३
तू एवढेच करावेस, मग मी कोणत्याही प्रकारे, कोणत्याही भावाने तुझ्या दारात येईन व तुझे काम करणारा सेवक
होऊन राहीन माझी वाणी तुझेच नाम नेहमी गात राहील ४ आता या खेरीज दुसरे काही विचारू नकोस
पंढरीनाथा, मी तुला आता शरण आलो आहे तुकयाबंधू म्हणत आहे की, अरे अच्युता, तू दाता व दानशूर
असा आहेस ५
..
६६८ कईं देखतां होईन डोळीं । सकळा भूतीं मूर्ति सावळी ।
जींवा नाव भूमंडळीं । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं ॥ १ ॥
ऐसा कृपा करील नारायण । जीव जगाचा होईन ।
प्रेमसागरीं बुडीन । होईल स्नान अनुतापीं ॥ २ ॥
ऐसा कईं येईन दैवास । दृश्य नासोनि जाईल आस ।
सदा सतचरणीं देहाचा वास । सेवीन शेष धणीवरी ॥ ३ ॥
कईं नवसा येतील अंकुर । सुखा नाहींसा होईल पार ।
अमृत ते पृथ्वीजळ सागर । वाहाती पूर आनंदाचे ॥ ४ ॥
प्रसन्न दया क्षमा शांति । कईं नवविधा होईल भक्ति ।
भोगीन वैराग्यसपत्ति । मनोरथ कळती तईं पुरले ॥ ५ ॥
तुकयाबंधु म्हणे साग । नव्हे तुजविण निरसेना पाग ।
म्हणोनि घातले साष्टांग । पांडुरंगा वरी चरणा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - अनुतापीं-वैराग्यान, पश्चात्तापाने धणीबरी-आनंदाने, पाग-इच्छा
अर्थ - देवा, या माझ्या डोळ्यांनी सर्वभूतमात्रांमध्ये तुझी सावळी मूर्ती कधी, बरे पाहीन ? या भूमंडळात,
जळात, स्थळात, काष्ठात, पाषाणात जीवांना तुझच नाव आहे १ नारायणा, माझ्यावर अशी कृपा कर की, या
जगाचाच मी जीव होईन प्रेमसागरात बुडी देईन वैराग्याच्या किंवा पश्चात्तापाच्या पाण्यात स्नान करीन २
असे माझे दैव कधी होईल की, दृश्य असणारे जग नाहीसे होऊन माझी आशाही नष्ट होईल नेहमी सतचरणी वास
करीन व त्याचे उच्छिष्ट मोठ्या आनंदाने सेवन करीन ३ या माझ्या नवसाला कधी अंकुर फुटतील ? अपार असे
सुख मला कधी प्राप्त होईल ? या पृथ्वीवर आनंदामृताच्या सागराचे पूर कधी वाहू लागतील ? ४ प्रसन्नता, दया,
क्षमा, शांती इत्यादींची व नवविधा भक्तीची प्राप्ती मला कधी होईल ? वैराग्यसंपत्ती मी कधी भोगीन ? माझे
सर्व मनोरथ पूर्ण कधी होतील ? ५ तुकयावधू म्हणत आहे की देवा, तुझ्याशिवाय माझी ही इच्छा कुणीही पूर्ण
करणार नाही म्हणूनच देवा, पांडुरंगा तुमच्या चरणावर साष्टांग नमस्कार मी घातले आहेत ६
६६९ तू वळिया शिरोमणी । आहेसि माजी ये त्रिभुवनीं ।
रिघालो पाठी तुझी म्हणउनी । आता करीन मी असेल ते ॥ १ ॥
तूं देवा प्रतापदिनकर । सुरा असुराचा सुर ।
महावीरा वीर धनुर्धर । मी तो पामर काय तेथें ॥ २ ॥
सार्थ तुकारामगाथा ३३९
कृपासिंधु दीनवत्सल । फोडिली देवाची बंदशाळ ।
संहारूनि राक्षसदाळ । शरणागत राजीं स्थापिला ॥ ३ ॥
उपक्रम करावा बहुत । तरी तूं जाणसी धर्मनीत ।
उचित काय तें अनुचित । राखें शरणागत आलों आतां ॥ ४ ॥
किती म्यां काय विनवावें । शरण आलों जीवें भावें ।
तुकयाबंधु म्हणे करावे । क्षेम अवघें येणें काळें ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- प्रतापदिनकर-पराक्रमरूपी सूर्य, बंदशाळ-बंदिशाळा, तुरुंग.
'अर्थ :- देवा, या त्रिभुवनांत तू सर्व बलवानांचा बलवान आहेस, म्हणूनच मी तुझ्या पाठीमागे निघालो
आहे. आता माझ्या मनात जे असेल ते मी करीन. १ देवा, तू पराक्रमरूपी सूर्य आहेस, देवासुरांचा वेध आहेस,
महावीरांचा धनुर्धर वीर आहेस. अशा तुझ्यापुढे मी पामर काय ? २ तू कृपासिंधू आहेस, दीनवत्सल आहेस,
तू देवांची बंदीशाळा फोडलीस, राक्षसांचा संहार केलास आणि जे शरण आले त्यांना राज्यावर बसविलेस. ३ मला
खूप नये नये उपक्रम करावेसे वाटतात. परंतु तू धर्मनीती जाणणारा आहेस, उचित काय, अनुचित काय, हेही तू
जाणतोस. मी तुला शरण आलो आहे. तू आता माझे रक्षण कर. ४ मी आता तुला किती विनंती करावी ?
मी जीवाभावाने तुला शरण आलो आहे. तुकयाबंधू म्हणत आहे की, या वेळेस माझे सर्व कल्याणाचे असेल
ते करावे ५.
६७० देवा मी चांडाळ चांडाळ । म्हणतां लागताहे वेळ ।
नसे पाहातां भूमंडळ । ऐसा अमंगळ खळ दुसरा ॥ १ ॥
जन्मा उपजल्यापासुनी । असत्य कर्म तें अझुनी ।
सत्य आचरण नेणें स्वप्नीं । निखळ खाणी अवगुणांची ॥ २ ॥
भक्ति दया अथवा कथा । कानीं न साहवे वार्ता ।
अखंड विषयांची वेथा । अधम पुरता अधमाहुनी ॥ ३ ॥
काम क्रोध दंभ अहंकार । गर्व ताठा मद मत्सर ।
यांचे तरी माहेरघर । परउपकार वैरी तैसा ॥ ४ ॥
निंदा द्वेष घात विश्वास । करितां नाहीं केला आळस ।
करूं नये ते केले संतउपहास । अभक्ष तें ही भक्षिलें ॥ ५ ॥
पाळिलें नाहीं पितृवचन । सदा परद्वारीं परधनीं ध्यान ।
बोलों नये घडलें ऐसें अन्योन्यविण । दासीगमन आदिकरूनी ॥ ६ ॥
कायामनें वाचाइंद्रीयांशीं । सकळ पापांचीच राशी ।
तुकयाबंधु म्हणे ऐसियासी । आलों हृषीकेशी तुज शरण ॥ ७ ॥