सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 98, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें७० सार्थ तुकारामगाथा
१४२ नुगवे तें उगवून सांगितलें भाई । घालुनियां ताळा आतां शुद्ध राखा घाई ॥ १ ॥
आतां कांहीं नाहीं राहिलें । म्यां आपणा आपण पाहिलें ॥ २ ॥
कमाईस मोल येथें नका रीस मानू । निवडूं नये मज कोणा येथें वानूं ॥ ३ ॥
तुका म्हणे पदोपदीं कान्हो वनमाळी । जयजयंत मग सेवटाला एक वेळीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-नुगवें-उलगडत नाहीं, उगवून-समजावून, ताळा-मेळ, रीस-राग.
अर्थ - भाई, तुझ्या बुद्धीने जे तुला समजणार नाही ते मी आता उलगडून दाखविले आहे. आता त्याचा
स्वतःशी मेळ बसवून तुम्ही लवकर शुद्ध भाव मनात निर्माण करा. १ स्वरूपाला एकदा जाणल्यावर आता काही
शोधाायचे, जाणून घ्यायचे काही उरत नाही. २ स्वतःच्या कमाईलाच येथे मोल आहे; याचा राग मानू नका, मला
इथे कुणाची निवड करता येत नाही की कुणाचे वर्णनही मी करु शकत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
एकसारखे कान्होवाचे नाव घ्या, म्हणजे शेवटी एकाद्या वेळी तुमचा जय गजरिने होईल. ४
१४३ हरुष आनंदाचा । घोष करा हरिनामाचा ।
कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥ १ ॥
पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचें संचित ।
होईल करीत । आला अधिकारी तो ॥ २ ॥
काय पाहातां हे भाई । हरुषें नाचा धरा घाई ।
पोटभरी कांहीं । घेतां उरी न ठेवा ॥ ३ ॥
जें सुख दृष्टी आहे । तेंच अंतरीं जो लाहे ।
तुका म्हणे काय । कळीकाळ तें बापुडें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा-हरूप-हर्ष, आनंद, उरी-शिल्लक
अर्थ :- ईश्वराच्या नावाचा घोष सतत करणे हाच मोठ्या आनंदाचा प्रसंग आहे. कोणत्या दैववानास हा
वाटा मिळणार आहे ? १ या प्राप्तीसाठी अनेक जन्मांच्या पुण्याचा साठा जवळ असेल तरच तो अधिकारी होईल. २
अरे भाईनो, पाहता काय ? आनंदाने नाचा ना. हात धरा, गर्दीगर्दीने ओळ धरा. या भक्तिरसाचे पोटभर सेवन
असे करा की काही उरू देऊ नका ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या दृष्टीपुढे जे परमेश्वराचे सुख उभे आहे
तेच तुमच्या अंतःकरणात स्थिर, होऊ द्या. मग त्याच्यापुढे प्रत्यक्ष यमही बापुडा पराजित होऊन जाईल. ४
१४४ अवघे गोपाळ म्हणतो या रे करूं काला ।
काय कोणाची शिदोरी ते पाहों द्या मला ॥
नका कांहीं मागें पुढें रे ठेवूं खरेंच बोला ।
ग्रंथी ग्रंथला तोचि रे येथें भोयंडा त्याला ॥ १ ॥
घेतल्या वांचून झाडा रे नेदी आपुले कांही ।
एकां एक ग्याही बहुत देती मोकळें नाहीं ॥
ताक सांडी येर येर रे काला भात भाकरी दहीं ।
आलें घेतो मध्यें बैसला नाहीं आणवीन तेंही ॥ २ ॥
एका नाहीं धीर तांतडी दिल्या सोडोनि मोटा ।
एक सोडितील गाठी रे एक चालती वाटा ॥
एक उभा भार वाहोनि पाहे उगाचि खोटा ।