सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 95, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 95

सार्थ तुकारामगाथा ६७
राहतो, शिजत नाही की मऊ होत नाही, त्याचा काही शिजून रस होत नाही, त्याप्रमाणे अंतरंग कठिण असेल तर
काही उपयोग नाही २ वरवर लावलेले कपाळावरचे टिळे व गळ्यातील माळा याचा काय उपयोग ? अशा दुष्ट
माणसाच्या हृदयात भावभक्तीचा लवलेशही नसतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, एका प्रेमभावाशिवाय जो
बोलतो ते त्याचे निरर्थक भुंकणेच असते विनाकारण शीण मात्र त्याला होतो, कारण भावाविना बोलण्याचा काही
उपयोग नाही ४
१३८ शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । वाईंल तो त्यास न विसंबे ॥ १ ॥
दुष्ट बुद्धि चोरी करी निरंतर । तो म्हणे इतर लोक तैसे ॥ २ ॥
तुका म्हणे जया चित्तीं जे वासना । तयाची भावना तयापरी ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - शिंदळ-वाईट चालीचा, व्यभिचार करणारा पुरुष, साला-मेहुणा, बायकोचा भाऊ
अर्थ - जो वाईट चालीचा मनुष्य असतो त्यास कुणावरच विश्वास ठेवावासा वाटत नाही त्याच्या
बायकोचा प्रत्यक्ष भाऊ जरी बहिणीस माहेरो न्यायला आला असेल तरी तो त्याच्याबरोबर तिला पाठवीत नाही
कारण त्याला सर्वजण स्वतःसारखेच वाटतात १ तो नेहमीच चोरी करण्यात गुंतलेला असतो त्याची बुद्धी सदैव
त्याच कर्मात रमलेली असते व इतर सर्व लोक आपल्यासारखेच चोर आहेत असेच तो मानतो २ तुकाराम महाराज
म्हणतात, ज्याच्या मनात जसा भाव, जशी वासना असेल तशी त्याची भावना होत राहते ३
काला चेंडूफळी-अभंग १००
१३९ झेला रे झेला वरचेवर झेला । हातिचे गमावी तो पाठी साहे टोला ॥ १ ॥
त्रिगुणाचा चेंडू हातें झुगारी निराळा । वरिलिया मुखें मन लावी तेथें डोळा ॥ २ ॥
आगळा होऊनि घरी वरचिया वरी । चपळ तो जिंके गाढचा ठके येरझारीं ॥ ३ ॥
हातीं सापडले उभें बैसो नेदी कोणी । सोरीमागें सोरी घेती ओणवे करूनि ॥ ४ ॥
डाईं पडिलिया सोसी दुःखाचे डोंगर । पाठीवरी भार भोवता ही उभा फेर ॥ ५ ॥
तुका म्हणे सुख पाहे तयाचे आगळें । जिंकी तो¹ हरवी कोणी एका तरी काळें ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - साहे-सहन करतो टोला-मार गाढया-दुबळा, अव्यक्त सोरी-दाव डाई-दावात
अर्थ - हा सत्त्व, रज, तम अशा त्रिगुणाचा चेंडू तुम्ही वरचेवर झेला हो जर तुमच्या हातातून हा चेंडू
निसटला तर मात्र जन्ममृत्यृचा डोला किंवा मार तुमच्या पाठीवर बसेल असेच समजा १ हा त्रिगुणाचा चेंडू
वरचेवर झेलून अलगद हाताने निराळा टाकून द्या त्याचा म्हणजे देहबुद्धीत असलेल्या त्रिगुणात्मकतेचा सबंध सोडून
तुम्ही आपली वरवर असणारी दृष्टी मनाशी एकाग्र कराथी, स्वतःच्या अंतर्यामी पाहावे २ स्वात्मसुखाने वेगळेच
गुप्त होऊन हा त्रिगुणात्मक चेंडू वरचेवर धरून निराळाच ठेवा या कार्यात जो चपळ आहे तो डाव जिंकेल, जो
दुबळा आहे तो डाव हरेल आणि मग जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडेल ३ जर एकदा का या त्रिगुणात्मक बंधनात व
देहबुद्धीच्या तावडीत सापडलात की मग कुणी दमू देणार नाही, विश्रांति मग कुणी घेऊ देणार नाही डावामागून
डाव एकसारखे वाकवून घेतील ४ मग या त्रिगुणाच्या डावात सापडल्यावर मात्र दुःखाचे डोंगरच्या डोंगर उभे
राहतील, पाठीवरचा भार वाढत राहील व भोवतीचे खेळातील सोंगडी त्रास देतील ५ तुकाराम महाराज म्हणतात,
जो कुणी एखाद्या वेळेस त्या हरीला जिंकेल त्यापेक्षाचे त्याचे सुख अलौकिक म्हणावे लागेल ६
विवरण - येथून पुढचे शंभर अभंग काल्यावरच आहेत 'काला' या शब्दाचा अर्थ मिश्रित खिचडी असा
असून श्रीकृष्णाच्या बालजीवनात यास फार महत्त्व अस लहानपणी श्रीकृष्ण आपल्या बालमित्रांना बरोबर घेऊन
१ जिवीतो हरिसा