सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 92, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें६४ सार्थ तुकारामगाथा
१३२ माकडें मुठी धरिले फुटाणे। गुंतले ते नेणे हात तेथें ॥ १ ॥
काय तो तयांचा लेखावा अन्याय। हित नेणे काय आपुले ते ॥ २ ॥
शुकें नळिकेशीं गोवियेले पाय। विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥ ३ ॥
तुका म्हणे एक ऐसे पशुजीव। न चले उपाव काहीं तेथें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - लेखावा-मानावा शुकें-पोपटान, एकू-कित्येक उपाव-उपाय
अर्थ - माकडाने मडक्यातील फुटाणे घेण्यासाठी हात आत घालून मुठीत फुटाणे धरून ठेविले, पारधी
धरायला आला तेव्हा त्याचा हात काही त्या मडक्यातून निघेना फुटाण्याचाही लोभ सोडवेना त्याला १ पण
यामुळे असे झाले की ते मात्र अडकून पडले, तो काय त्याचा अन्याय समजावा ? त्याला आपले हित समजले नाही २
अशीच बाब पोपेटाची आहे नळीवर पाय ठेवून बसतो तो बसल्याबरोबर नळी गरकन फिरून तो खाली येतो,
आणि अडकला जातो त्याला आधाराची नळीही सोडता येत नाही, की आपल्या पक्षाचा उपयोगही त्यास सुचत
नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात असे कित्येक पशूचे जीवन फसून गेले आहे अशा जीवाच्या उद्धारासाठी,
संसारात आसक्त राहणाऱ्यासाठी काही उपाय सुचत नाही ४
१३३ हरि तू निष्ठुर निर्गुण। नाही माया बहु कठिण।
नव्हे ते करिसी आन। कवणे नाही केले ते ॥ १ ॥
घेऊनि हरिश्चंद्राचे वैभव। राज्य घोडे भाग्य सर्व।
पुत्र पत्नी जीव। डोबाघरीं वोपविलीं ॥ २ ॥
नळा दमयंतीचा योग। विघडिला त्याचा संग।
ऐसे जाणे जग। पुराणे ही बोलती ॥ ३ ॥
राजा शिबी चक्रवर्ती। कृपाळु दया भूतीं।
तुळविले अंतीं। तुळें मास तयाचे ॥ ४ ॥
कर्ण भिडता समरगणीं। बाणी व्यापियेला रणीं।
मागसी पाडोनी। तेथें दात तयाचे ॥ ५ ॥
बळी सर्वस्वे उदार। जेणे उभारिला कर।
करूनि काहार। तो पाताळी घातला ॥ ६ ॥
श्रियाळाच्या घरीं। धरणे माडिले मुरारी।
मारविले करीं। त्याचे बाळ त्याहातीं ॥ ७ ॥
तुज भावे जे भजती। त्याच्या ससारा हे गति।
ठाव नाही पुढती। तुका म्हणे करिसी ते ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा - आन-भलत बाहा तरी डोब-स्मशानातील राखणदार वोपाविलीं-विकली, तुळविले-
वजन केले
अर्थ - परमेश्वरा तू मोठा निष्ठुर, निर्विकार आहेस तुला काही दयामाया दिसत नाही, जे कधी कुणी
केले नाही असे तू करतोस १ तू हरिश्चंद्र राजाचे वैभव घेतलेस, त्याचे राज्य घोडे हे सब वैभव हरण केलेस, इतकेच
नव्हे तर त्याचा मुलगा, त्याची पत्नी व तो स्वत' याना डोबाघरी विकून घ्यायची पाळी तू आणलीस २ नळदमयंती