सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 90, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें६२ सार्थ तुकारामगाथा
, मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार । बहु भुकेला जाहलों । तुमच्या उष्टघासाठीं आलों' असा चोखोबाचा
एक उत्कृष्ट अभंग जोहाराचा आहे चोखोबाना तो शोभून दिसलाच, पण जणु या भगवद्भक्तास वंदन करण्या-
साठी ही वाट पुढील अनेक संतानी 'जोहार मायबाप' म्हणून अनेकदा अभगांची रचना करून चोखाबद्दल आपला
आदर व्यक्त केला जोहार करताना असणारी लीन वृत्ती, दास्यत्वाची भूमिका, स्वत कमी असल्याची जाणीव,
सेवेची भावना, काकुळतीचे शब्द या सर्वांचा उपयोग भक्तीच्या क्षेत्रात अधिक झाल्यास नवल नाही स्वतः
ज्ञानेश्वरांचीही 'जोहार मायबाप जोहार । मी कृष्णाजी घरचा रांडेवार' म्हणून अभंग प्रसिद्ध आहे पुढे एकनाथानी
जोहारावर अतिशय उत्कृष्ट रचना करून हे दालन समृद्ध केले 'जोहार मायबाप जोहार । मी तो एकनाथ महार'
या भूमिकेवरून एकनाथांचे सर्वच अभंग हृदयस्पर्शी व उद्बोधक आहेत
१२८ येऊं द्या जो काहीं वेसकरास । आतून बाहेर योजेचा घास ॥ १ ॥
जो पावे तो हातचि रिता नाहीं । कधीं तरी कांहीं द्यावे घ्यावे ॥ २ ॥
तुका म्हणे उद्या लावीन म्हनेरा । जे हे दारोदारामोवतीं फिरा ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा :- योजेचा-चांगल्या स्वच्छतेचा, निर्मळ, म्हनेरा-तगादा
अर्थ - अहो महाराज, हा वेसकर आला आहे आतून काही निर्मळ व सुग्रास अन्नाचा घास बाहेर येऊ
द्या ना मजकडे तुमच्या कृपेचा ओघ मजकडे वळू द्या ना १ मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा हात रिकामा नाही, सवड
नाही असे म्हणता, पण असे म्हणून कसे चालेल ? केव्हा तरी काही तरी मला द्यावे लागेल, मजकडून दुआ घ्यावा
लागेल २ तुकाराम महाराज म्हणतात, उद्या मी सारखा तगादा लावीन तुमच्या दारात, मग मात्र जन्मभर
जन्ममृत्यूच्या चक्रात तुम्ही फिरत राहाल ३
१२९ देतो घेती परज गेली । घर खालीं करुनिया ॥ १ ॥
धावण्याचा न पडे हाती । खादली राती काळोखी ॥ २ ॥
अवघियाचे अवघें नेलें । याहीं ठेविले नाहीं मागें ॥ ३ ॥
सोंग सपादुनि दाविला भाव । गेला आधीं भाव घरि होती ॥ ४ ॥
घराकडे पाहू नयेसेचि जाले । अमानत केले दिवाणात ॥ ५ ॥
आतां तुका कोणा न लगेचि हातीं । जाली ते निश्चिती बोलो नये ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - परज-धार, चमक, भाव-मोह, सांग, अमानत-ठेव, दिवाणात-सरकाराच्या
दरबारात
अर्थ - देण्याघेण्याच्या क्रिया करणारी बुद्धीची धार किंवा चमक आता घर सोडून निघून गेली आहे,
काळोख्या रात्रीच्या अंधाराची जी अवस्था होती ती खाऊन टाकली, म्हणजे संपविली, आता धावत येणाऱ्या
काळाच्या हातात मी लागणार नाही २ मी सर्व धर्माचे, सर्व तत्त्वाचे सार पाहिले, आता काही पाहावयास
मागे ठेविलेच नाही ३ या दृश्य जगाच्या मायारुप वस्तूने सोंग धारण करून वेगळाच भाव मला दाखविला होता,
पण तो घरवर असणारा मोह आता नाहीसा झाला ४ आता शरीररुप्याकडे व घरप्रपंचाकडे पाहू नये असेच
वाटू लागले, कारण देहात्मबुद्धीची ठेव आता मी प्रभूच्या दरबारातच ठेविली आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात
आता मी कुणाच्याही हाती लागणारा नसून माझा जो आता निश्चय झाला आहे त्याचे वर्णनही करून सांगता
येणार नाही ६