सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 88, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 88

६० सार्थक तुकारामगाथा
१२५ वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन ।
श्रोता यति जाला जाण । तरी त्या नाहीं उचित' ॥ १ ॥
शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण ।
धर्मचि पाळण । सकळीं सत्य करावे ॥ २ ॥
पट्ट पुत्र सांभाळी । पिता त्याची आज्ञा पाळी ।
प्रमाण सकळीं । ते मर्यादा करावी ॥ ३ ॥
घरांतनी पाषाण । तो न मानावा सामान्य ।
येर उपकरणें । सोनियाचीं परी तीं नीच ॥ ४ ॥
सोनियाचा पैंजण । मुगुटमणि केला हीण ।
जयाचे कारण । तया ठायीं अळंकार ॥ ५ ॥
सेवका स्वामीसाठीं मान । त्याचे नाम त्याचे धन ।
तुका म्हणे जाण । तुम्ही संत तदर्थी ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - प्रमाण-मुख्य, पट्ट-गादी, येर-दुसरी
अर्थ - धर्मप्रवचनाच्या वेळीं गंध, अक्षदा, पूजन इत्यादींचा मान श्रोत्याच्या आधी वक्त्याचाच म्हणजे
प्रवचन सांगणाराचाच असतो मग श्रोत्यांत एखादा संन्यासी यती असला तरी त्याला मान देणे उचित नाही १ सर्व
अंगात डोके हे महत्त्वाचे असल्याने त्याचे स्थान मुख्य आणि मग यथा क्रमाने हातापायांचे याच धर्माचे पालन सर्वानी
करावे २ मुलगा मोठा होऊन तो गादीवर बसून राज्यकारभार सांभाळू लागला की मग त्याचा बापही त्याची
आज्ञा पाळतो ह्याप्रमाणे मान्य झालेली मर्यादा सर्वांनीच पाळावी ३ देव्हाऱ्यामधील देव दगडाचा असला तरी तो
सामान्य किंवा कमी प्रतीचा मुळींच होत नाही आणि या देवाच्या पूजेची उपकरणे जरी सोन्याची असली तरी ती
देवापेक्षा नेहमीच कमी प्रतीची मानावीत हे स्पष्टच आहे ४ राजाच्या मुकुटावरील मणी कमी किमतीच्या काचेचा
असला व त्याच्या पायातील तोडा सोन्याचा असला तरी मुकुटमणी हीन ठरत नाही, किंवा तोडघास महत्त्व येत
नाही तो अलंकार त्या ठिकाणीच शोभून दिसतो ५ सेवकाचा मान केवळ स्वामीमुळे वाढलेला असतो, त्याच्या
धन्याचे नाव हेच खरे म्हणजे त्याचे धन होय तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संतानी हे नीट समजून असावे
तुमचा मान देवामुळे आहे ६
१२६ घरों रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकापासीं थोरपण ॥ १ ॥
नेऊनियां घरा दाखवावे काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥ २ ॥
तुका म्हणे आम्ही जाणो त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नहो ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - काळतोंडा-लाजेने तोंड चुकविणारा, ठकावे-फसतात
अर्थ - एखादा मनुष्य आपले मोठेपण गावातील लोकांपाशी नेहमी वर्णन करून सांगत असतो, पण त्याची
घरची बायकामुले मात्र उपाशी मरत असतात १ आपल्या घरातील वैभवाचे वर्णन करणाऱ्या माणसाच्या घरी
अचानक आपण जाऊन पाहिले तर काय दिसेल ? खरी परिस्थिती लक्षात येईलच तो लाजेने तोंड चुकवून बसतो २
मग तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अशा माणसास चांगले ओळखून आहोत त्याच्या बोलण्यावर लोक फसले
तसे आम्ही फसणार नाही ३
१ अधिकार