सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 596, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ५४९
झालेले दिसतात. देव चांगला क्षीरसागरात सुखासनावर होता, परंतु पृथ्वीवर पातकांची दाटी झाली, दैत्य फार मत्त
झाले, म्हणून या भगवंतास गोकुळात गवळ्याच्या घरी अवतार घ्यावा लागला. आणि देवास त्या पुंडलीक महामुनीने
गुंतवून ठेविले, पंढरपूर येथे बांधून ठेवले, इत्यादी भावतुषार सगुण प्रीतीच्या पोटीं तुकांनी येथे व्यक्त केले आहेत.
ईश्वर आपल्या भक्तासाठी ऋणी होतो, हीही भक्तीच्याच अनेक छटांपैकी एक नाजूकसा आविष्कार आहे कारण हा
भक्तीच्या भीतीनेच साकार सगुण झालेला असतो 'तुका म्हणे माये । घेणें देणें आकारायें' असे त्यांनीच दुसऱ्या एका
अभंगात म्हटले आहे
१२४९ गोड जाले पोट धालें । अवचित वाचे आले ।
म्हणतां पाप गेले । विठ्ठलसें वाचेसी ॥ १ ॥
सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ ।
पातकी चांडाळ । नामासाठीं आपुलिया ॥ २ ॥
चित्त पावलें आनंद । सुखसमाधीतें सदा ।
म्हणतां गोविंदा । वेळोवेळां वाचेसी ॥ ३ ॥
हे जाणती अनुभवी । जया चाड तो चोजवी ।
तुका म्हणे दावी । रूप तेंचि अरूपा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - धालें-संतुष्ट झालो, चाड-आवड, चोजवी-शोध घेतील
अर्थ :- अवचितपणे या विठ्ठलाचे नाम माझ्या वाणीतून निघाले, म्हणून सर्वत्र गोड होऊन गेले. मनातील
सर्व पापच नाहीसे झाले. पोट तृप्तीने भरून गेले. १ लोकहो, तुम्ही हे सर्व खरे मानावे. कारण अजामेळासारख्या
पाप्याचाही या भगवंताच्या नामामुळे उद्धार झालेला आहे. तो कितीही पातकी व चांडाळ असला तरी त्याने
भगवंताचे नाम घेतल्यामुळेच त्याचा उद्धार परमेश्वराने केला २ श्रीहरीचे नाव वाणीतून निघाल्यामुळे माझे चित्त
अतिशय आनंदित झाले आहे या गोविंदाच्या नावाने सदा सर्व काळ समाधी सुखाचाच आनंद प्राप्त झाला आहे. ३
जे कुणी अनुभवी आहेत, त्यांनाच या सुखाची किंमत समजून येईल. ज्यांना याची आवड आहे ते याचा शोध घेतील.
तुकाराम महाराज म्हणतात, त्यालाच हा देव आपले अरूप असले तरी सगुण स्वरूप दाखवील. ४
१२५० आंत हरि बाहेर हरि । हरिनें घरीं कोंडिलें ॥ १ ॥
हरिने कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविले ॥ २ ॥
हरिनें जीवे केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥ ३ ॥
तुका म्हणे वेगळा नव्हे । हरि भोवे भोयताला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- कामा-वासनेस, घातला चिरा-दगड घालून बंदी केले, वित्तवरा-धनसंपत्ती.
अर्थ :- आता हा श्रीहरी सर्वत्र आतून व बाहेरून भरून राहिलेला आहे घरोदारी याच हरीच्या रूपाने
आकार धारण केला आहे. १ या श्रीहरीने माझ्या सर्व वासनावरच दगड घालून त्यांना बंदी केली आहे. वासना
त्याने नष्ट केल्या आहेत. याच्यामुळे माझी धनसंपत्तीवरीलही वासना संपलेली आहे. २ या हरीने माझ्या जीवा-
वरचाही लोभ घालवून सर्व व्यावहारिक प्रपंचाची वृत्तींचा भंग केला आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी
आता या श्रीहरीशिवाय वेगळा नाहीच. हाच श्रीहरी माझ्या भोवती सर्वत्र भरून राहिलेला आहे. ४
१२५१ हरिने माझें हरिलें चित्त । भार वित्त विसरलें ॥ १ ॥
आतां कैंसी जाऊं घरा । नव्हे बरा लौकिक ॥ २ ॥