सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 595, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें५४८ सार्थ तुकारामगाथा
माझिया मनाचा हाचि विश्वास । न करीं सायास साधनाचे ॥ ४ ॥
तुका म्हणे मज होईल भरवसा । तरलो मी ऐसा साच भाव ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - कई-केव्हा, मात-गोष्ट, अग्रीकार-स्वीकार, सायास-परिश्रम, साच-खरोखर.
अर्थ - सत्मुखातून असे बोलणे माझे कान कधी बरे ऐकतील ? कसे बोलणे ? तर या पांडुरंगाने
माझा स्वीकार मोठ्या प्रेमाने केला असून तो मला भेटला आहे. असे ऐकल्यानंतर माझ्या जीवास मोठाच धीर
येणार आहे २ म्हणून तर देवा, मी तुमच्या मुखाकडे व चरणांकडे पाहात आहे याच स्थानाची मला फार मोठी
आशा लागून राहिलेली आहे ३ माझ्या मनात हेच एक स्थान विश्वासाचे असल्यामुळे मी इतर कोणत्याही
साधनाचे परिश्रम करणार नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, मला असे सताच्या मुखातून ऐकल्यावर विश्वास
वाटेल व मी हा संसारसागर तरून गेलो आहे, असा भाव मला पटेल ५
१२४८ दोन्ही हात ठेवुनि कटी । उभा भीवरेच्या तटीं ।
कष्टलासी साटीं । भक्तिकाजें¹ विठ्ठला ॥ १ ॥
भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा ।
आम्हालागीं सोपा । दैत्या काळ कृतांत ॥ २ ॥
होतासी क्षीरसागरीं । मही दाटली असुरीं ।
म्हणोनियां घरीं । गोळियाचे² अवतार ॥ ३ ॥
केला पुंडलिके गोवा । तुज पंढरीसि देवा । :
तुका म्हणे भावा । साटीं हातीं सांपडसी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - साटीं-साठी, भक्तिकाजें-भक्ताच्या भक्तीसाठी, मही-पृथ्वी, गोवा-गुंतवणूक
अर्थ - देवा, आपल्या भक्ताचे काम करता करता तू फार थकलास व म्हणून या भिवरा नदीच्या काठावर
कमरेवर हात ठेवून विश्रांती घेत तू उभा राहिलास १ मायबापा, देवा, तू आमच्यासाठी फार कष्ट घेतलेत रे.
आमच्यासाठी, नाना अवतारासाठी फार तुला खेपा घालाव्या लागल्या तू आम्हा भक्तांना अतिशय सोपा आहेस
पण दुष्ट दैत्यांना मात्र काळासारखा, कृतान्तासारखा तू भयानक आहेस २ तू सुखाने आपल्या क्षीरसागरात
निवास करून होतास. त्याचवेळी या पृथ्वीवर असुरांची फार दाटी झाली व त्यांनी फार त्रास सज्जनांना दिला.
म्हणून देवा, तुम्हाला गवळघराच्या घरी अवतार धारण करावा लागला ३ देवा, या पुंडलिकाने तुला गुंतवून
ठेवून तुला या पंढरपुरात स्थिर केले तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू त्याच्या भावामुळेच आमच्या हातीं
सापडला आहेस ४
विवरण - वरील पाच अभंगात तुकाराम महाराजांनी सगुण ईश्वराचे मोठे लोभस व हळुवार असे वर्णन
केले आहे आपल्या भक्तासाठी हा विठ्ठल मुळचा निर्गुण निराकार असला तरी कसा लहान व सगुण होतो, याचे
थोडक्यात वर्णन या अभंगातून आहे अशा या लहान व सावयव ईश्वरास नीट डोळे भरून पाहता येते त्याच्याशी
नीट गोष्टी बोलता येतात 'आलिंगूनि मिठी देईन पायीं' अशी भाषा याच सगुण रूपासाठी बोलता येते प्रेमसुखाची
सर्वोच्च प्रचीती याच सगुण, सुंदर रूपामुळे फार भक्तांना प्राप्त होत असते त्याच्या चरणाशी उभे राहावे, डोळे
भरून त्याचे रूप मनात साठवावे व 'हरेल या भूक डोळियाची' म्हणून तृप्त व्हावे, यातच या सगुणाची
सार्थकता आहे
क्रमांक १२४७ च्या अभंगात तर या सगुणाच्या लोभाची ओढ भक्तास कशी असते, याचे मोठे सुंदर व
भावपूर्ण आढळन पांडुरंगाने आपला स्वीकार कव्हा ही गोष्ट संत आपणास केव्हा ऐकवितात, याविषयी
तुकोबांचे चित्त कासावीस झालेले आहे या एका अभंगात भक्तावर कृपा करुन थकलेल्या भागलेल्या देवाचा कळवळा
तुकाराम महाराजांना आलेला दिसतो 'भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा' म्हणून तुकारामबुवा दृष्टी
१ तू जगजेठी भक्तिकाजा, २ म्हणोनिया हरी । गोळियाघरी अवतार ॥