सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 585, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ५३९
मान्य करून एकदा सर्व चुकते करा ना. म्हणजे लोकांत होणारी फजिती तरी वाचेल तुमची. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, यासाठी मला काही तूट सहन करण्याचा प्रसंग येऊ नये असे तू करावेंस. ४
१२२९ नाहीं मागितला । तुम्हां मान म्यां विठ्ठला ॥ १ ॥
जे हे करविली फजिती । माझी एवढी जना हातीं ॥ २ ॥
नाहीं केला पोट । पुढे घालूनि बोभाट ॥ ३ ॥
तुका म्हणे धरूनि हात । नाही नेलें दिवाणांत ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- पोट-पोट भरण्याचा धंदा.
अर्थ :- देवा, विठ्ठला, कोणताही मानसन्मान मी तुमच्याजवळ कधी मागितलेला नाही. १ असे असूनही
माझी तुम्ही या सर्व लोकांत एवढी फजिती का आरंभिली आहे? २ मी पोट भरण्यासाठी काही धंदा म्हणून हा
मार्ग पत्करल्याचा बोभाटा केलेला नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, किंवा देवा, मी कधी तुम्हांला तुमचा
हात धरून कधी भांडणासाठी दिवाणातही नेलेले नाही. ४
१२३० तूं पांढरा स्फटिक मणी । करिसी आणिकां त्याहुनि ॥ १ ॥
म्हणोनि तुझ्या दारा । न येत ठकतो दातारा ॥ २ ॥
तुझी ठावी नांदणूक । अवघा बुडविला लोक १ ॥ ३ ॥
तुका म्हणे ज्याचें घेसी । त्यास हेचि दाखविसी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- आणिकां-दुसऱ्यास, नांदणूक-वागणूक, रीत.
अर्थ :- देवा, तू खरे म्हणजे पांढऱ्या स्वच्छ स्फटिक मण्याप्रमाणे आहेस व तू जे कुणी दुसरे तुझ्याकडे
येतात त्यांनाही तसेच बनवून टाकतोस. १ म्हणून देवा, तुझ्या दारांत कुणीही येत नाही कारण येथे लोक फसले
जातात. २ तू सर्व लोकांना बुडविले आहेस, हे आम्हास चांगलेच माहीत आहे ही तुझी रीत सर्वत्र प्रसिद्ध आहे ३
तुकाराम महाराज म्हणतात, तू कसा आहेस ? तर ज्याचे सेवारूपी कर्ज तू घेतोस, त्यालाच फसविण्याची रीत तू
चांगलीच दाखवितोस. ४
१२३१ बोलतों निकुरें । नव्होत सलगीचीं उत्तरें ॥ १ ॥
माझें संतापलें मन । परपीडा ऐकोन ॥ २ ॥
अंगावरि आलें । तोंवरि जाईल सोसिलें ॥ ३ ॥
तुज भक्तांची आण देवा । जरि २ तुका येथें ठेवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- निकुरें-निकराला येऊन.
अर्थ :- देवा, मी फार निकराला येऊन, एकेरीवर येऊन बोलत आहे, हे ध्यानात ठेवा. हे काही प्रेमाच्या
सलगीचे बोलणे नाही १ माझे मन आता संतापून गेले असून तुझ्या सेवकांना तू जी पीडा दिली आहेस, ती मला
आता ऐकवतही नाही. २ जोपर्यंत केवळ माझ्यावरच घाताचे ओझे होते, तोपर्यंत ते सहन केले; पण आता
सर्वांचीच पीडा पाहून मी दुःखी झालो आहे. ३ देवा, या तुकारामास तू जर आहे तिथेच ठेवशील, तर तुला तुझ्या
भक्तांची शपथ आहे. ४
विवरण - तुकाराम महाराज देवाशी कधी कधी विशेष सलगी दाखवून, काही मुद्दे काढून, प्रेमाचे भांडण
करितात. वरील महत्त्वाच्या अभंगांतून तुकारामबुवांनी भांडणाचा असाच एक मुद्दा उपस्थित केलेला आहे. देव हा आप-
ल्याच सेवकांना ठकविणारा, फसविणारा आहे, तो त्यांच्याकडून सेवेचे भांडवल घेतो, पण त्याच्यावर कृपा मात्र करीत
नाही देव अशा प्रकारे सर्वांनाच त्रास देतो, मुद्दलही बुडवितो व व्याज देण्यासही हा खळखळ करितो, असे तुकोबांनी
१ लौकिक, २ तरी.