सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 584, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 584

शब्दार्थ व टीपा - परता-दूर ठकावें-फसावे, लेखिता-करीत असताना
अर्थ - देवा, तू सरोसरीच फारच खोटा दिसतोस तुझा सवंगच खोटा आहे असे वाटते तू आमच्या
पासून दूर होतास तेच बरे होते १ देवा तुझ्या भेटीत मी तुझ्यापासून काय घ्यावे रे ? काही घेता येत नाही
उलट आम्ही फसले मात्र जातो २ या तुझ्या व माझ्या व्यवहारात मुद्दल काहीच हाताशी आलेले नाही, उलट
घ्यायचा मात्र हिशेब करिता करिता मान भरण्याचा प्रसंग येत आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशी
भक्तजनाना फसविण्याची तुझी रीत फारच प्रसिद्ध आहे ४
१२२६ याचि हाका तुझे द्वारीं । सदा देखो ऋणकरी ॥ १ ॥
सदा करिती खड दड । देवा बहुगा तू लड ॥ २ ॥
सुखें गोविसी भोजना । लपवूनिया आपणा ॥ ३ ॥
एके एक बुझविसी । तुका म्हणे ठक होसी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - लड-दांडगा, ठक
अर्थ - देवा, तू आपल्या भक्ताना, सेवकाना फसवितोस, अशीच ओरड नेहमी तुझ्या दाराशी असते १
तू नेहमी कुणाला तरी दड करीत असतोस, कुणाशी तर खडाचे व्यवहार करीत असतोस असा तू मोठा बलदंड
ठक दिसतोस २ आपल्या भक्ताना त्याचा हेतू जाणून कुठल्या तरी फळाच्या आशेचे वा तिच्या तृप्तीचे भोजन
देतोस व आपण मात्र स्वतः लपून राहतोस ३ त्याना ज हवे ते न देता देवा, तू त्याची कशी तरी समजूत काढतोस
असा तू चांगलाच फसविणारा ठक आहेस, असे तुकाराम महाराज म्हणतात ४
१२२७ आम्ही जाणो तुझा भाव । दृढ धरियेले पाव ॥ १ ॥
फांकू नेदू चुकायिता । नेघो थोडे बहु देता ॥ २ ॥
बहुता दिसांचे लिगाड । आले होत होत जड ॥ ३ ॥
तुका म्हणे आता । नेघो सर्वस्व ही देता ॥ ४ ॥