सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 518, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४७४ सार्थ तुकारामगाथा
संता ब्रह्मरूप जालें अवघें जन । ते माझे अवगुण न देखती ॥ ३ ॥
तुका म्हणे मी तो आपणासी ठावा । आहे बरा देवा जैसा तैसा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - मानविले-मानसन्मान केला
अर्थ - देवा, बाहेरच्या दृष्टीने या लोकांनी माझा मानसन्मान केला असला तरी, मी अंत:करणाने मात्र
तेवढा मोठा झालेलो नाही १ म्हणूनच पंढरीराया, माझ्या मनात फारच चिंता वाटत आहे, आणि मनाची खरी
अवस्था प्रकट करताना भारी लाज वाटते २ साधुसंतांना सारे जगच ब्रह्मरूप दिसत असल्याने ते कुणाचेच दोष
पाहात नाहीत माझेही अवगुण त्यामुळे त्यांना दिसले नाहीत ३ परंतु देवा मी कसा आहे हे तुम्हास माहीत आहे
तुकाराम महाराज म्हणतात, मी जसा आहे तसाच आहे हे तुम्ही जाणता ४
१०५९ काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसे ॥ १ ॥
कैसा सरता जालो तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हे ॥ २ ॥
पुराणांची ग्वाही वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध जालें ॥ ३ ॥
तुका म्हणे मज आणूनि अनुभवा । दाखवी हे देवा साच खरें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जीताती-जिवंतपणे वावरतात, सरता जालो-मान्य झालो, साच-खरे
अर्थ - खरे पाहिले असताना माझ्या शरीरात कामक्रोधादी विकार जिवंतपणे वावरत असूनही मी वरच्या
बाजूने मात्र अतिशय मृदू शब्द बोलीत आहे १ तरी सुद्धा पांडुरंगा मी तुमच्या पायाशी कसा मान्य झालो, हे
काही माझ्या ध्यानात येत नाही २ पुराणातील संतांचे चित्त कशा प्रकारे शुद्ध असायला पाहिजे, याची ग्वाही
दिलेली आहे तशा प्रकारचे काही माझ चित्त शुद्ध झालेले नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून देवा, जी
काही खरी गोष्ट असेल ती माझ्या अनुभवास आणून द्या ना ४
१०६० स्तुति करों जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥ १ ॥
तुमचे मी दास संताचे दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ २ ॥
रामकृष्णहरि मन उच्चारणा । आवडी चरणा विठोबाच्या ॥ ३ ॥
तुका म्हणे तुमचे सेवितो उच्छिष्ट । क्षमा करीं धीट होऊनिया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आवडी-प्रेम, सेवितों-खातो
अर्थ - संत लोकांनो, मी तुमची स्तुती करावी, असा अधिकार मजजवळ नाही कारण तुमच्या योग्यतेचा
विचारच मला समजत नाही १ तुम्हा संतांचा मी एक दुर्बल असा दास असल्याने तुम्ही तुमच्या पायावरच माझे
रक्षण करावे २ रामकृष्ण हरि या मंत्राचाच मी उच्चार करीत असतो व माझे प्रेम विठ्ठलाच्या चरणावर दृढ असे
आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, संतहो, मी तुमचे उच्छिष्ट खात असतो, मोठ्या धिटाईने सेवन करीत असतो
मला तुम्ही क्षमा करावी ४
१०६१ बहु दूरवरी । वेठीं ओझें होते शिरों ॥ १ ॥
आता उतरला भार । तुम्ही केला अंगीकार ॥ २ ॥
बहु काकुलती । आलो मागें किती ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा । आजि सफळ जाली सेवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वेठी-बिगारीच्या पद्धतीत, अंगीकार-स्वीकार
अर्थ - कित्येक जन्मपर्यंत मी या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात बिगारीस धरलेल्या नोकराप्रमाणे सापडलो
होतो फार मोठे ओझे माझ्या डोक्यावर होते १ पण आता ते सर्व ओझे कमी झाले आहे देवा, तुम्ही माझा स्वीकार