सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 516, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४७२ सार्थ तुकारामगाथा
१०५१ मुनि मुक्त जाले भेणे गर्भवासा । आम्हा विष्णुदासा सुलभ तो ॥ १ ॥
अवघाचि संसार केला ब्रह्मरूप । विठ्ठलस्वरूप म्हणोनिया ॥ २ ॥
पुराणीं उपदेश साधन उद्भट । आम्हा सोपी वाट वैकुंठाची ॥ ३ ॥
तुका म्हणे जना सकळांसहित । घेऊं' अखंडित प्रेमसुख ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - भेणें-भिऊन, भीतीने, उद्भट-कठिण
अर्थ - थोर ऋषीमुनी गर्भवासाच्या भीतीने मुक्तीच्या मार्गास लागले, परंतु हा गर्भवास आम्हा विष्णु-
दासाना मात्र अतिशय सुलभ असा झाला आहे १ आम्ही सर्व संसारच ब्रह्मरूप मानल्यामुळे आम्हास संसाराचे
अथवा जन्ममृत्यूचे भय नाही आमचे सब विठ्ठलरूप होऊन गेले आहे २ ब्रह्मलोकाला अथवा वैकुंठाला जाण्याचा
मार्ग फार कठिण आहे असे उल्लेख नाना पुराणांतून असले तरी, आम्हा भक्ताना मात्र वैकुंठाची वाट अतिशय
सोपी अशी निर्माण झाली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सर्व लोकांच्या सहित या ईश्वराचे प्रेमसुख
मोठ्या आवडीने भोगू ४
१०५२ न करावी स्तुति माझी सतजनीं । होईल या वचनीं अभिमान ॥ १ ॥
भारे भवनदी नुतरवे पार । दुरावतील दूर तुमचे पाय ॥ २ ॥
तुका म्हणे गर्व पुरवील पाठी । होईल माझ्या तुटी विठोबाची ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - सतजनीं-सत लोकांनी नुतरवे-उतरवणार नाही
अर्थ - तुम्ही संत लोकांनी माझी आता स्तुती थोडीसुद्धा करू नये त्यामुळे माझ्या संतत्वाबद्दल मला
मोठा अभिमान निर्माण होईल १ आणि या भारामुळे मला भवनदी तरून जाण्याचे सामर्थ्य राहणार नाही, आणि
तुमच्यासारख्या साधुसंतांचे पायही दुरावतील २ तुकाराम महाराज म्हणतात आणि गर्व तर माझी पाठ पुरवील,
व त्यायोगे या विठोबाची आणि माझी ताटातूट होईल ३
१०५३ तुमचिये दासींचा दास करुनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥ १ ॥
नवविधा काय बोलिली जे भक्ती । घ्यावी२ माझ्या हात सतजनीं ॥ २ ॥
तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारें । उतरेन खरें भवनदी ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - नवविधा-शास्त्रात सांगितलेली श्रवण कीर्तन, स्मरण पादसेवन इत्यादी नऊ प्रकारची
भक्ती
अर्थ - सत सज्जनहो, मला तुमच्या दासाचा दास जरी करून ठेविले तरी चालेल हाच आशीर्वाद मला
तुम्ही द्यावा १ शास्त्रामध्ये जो नवविधा भक्ती सांगितली आहे, ती तुम्ही सत लोकांनी मजकडून करवून घ्यावी २
तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या पायाच्या आधाराने मी ही भवनदी खरोखरीच उतरून जाईन ३
१०५४ चोर टेंकाचे निघाले चोरी । आपले तैसे पारखे घरीं३ ॥ १ ॥
नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ २ ॥
बुद्धिहीन नये कांहींचि कारणा । तयासवे जाणा तेंचि सुख ॥ ३ ॥
तुका म्हणे नाहीं ठाउके वर्म । तयासी कर्म वोढवले ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - टेंकाचे-समूहान पारखे-दुसऱ्याच्या
अर्थ -काही कमकुवत चोर समूहान चोरी करायला निघाले आणि आपल्या घरात जसे आपण वावरतो तसेच
ते दुसऱ्याच्या घरीही वावरू लागले १ त्यामुळे काय झाले ? त्यांना तेथे काहीच फायदा न होता, उलट ते स्वतःच
नागवले गेले घरातील मालकाकडून त्याचे कान व हातपाय कापले गेले मात्र २ याप्रमाण बुद्धिहीन माणसाचा
१ बैसोनि निवान्त सुख भागू, २ द्यावी, ३ घरी