सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 514, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 514

४७० सार्थ तुकारामगाथा
अर्थ :- हातांत टाळ वीणा घेऊन निघालेल्या या विष्णुभक्तांची सोबत ज्यांना आहे १ त्यांनी लगबग
करून या मार्गाने चालावे. पुण्याची शिदोरी तयार ठेवावी २ असे हे भक्त सर्वांना सावध करीत जात असल्याने
सर्वांनी त्यांच्यावर आपले चित्त द्यावे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे वैष्णववीर, विठ्ठल, विठ्ठल बोल बोलोत
निघाले आहेत. ४
१०४५ वांयां जातो देवा । नेणे भवती करूं सेवा ॥ १ ॥
आतां जोडोनियां हात । उभा राहिलो निवांत ॥ २ ॥
करावें ते काय । न कळे अवलोकितों पाय ॥ ३ ॥
तुका म्हणे दान । दिले पदरीं घेईन ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- निवात-स्तब्ध, अवलोकितों-पाहतो
अर्थ :- देवा, आतां माझा जन्म व्यर्थच चाललेला दिसतो मला तुझी सेवा करता येत नाही भक्ती करता
येत नाही. १ आतां तुझ्यापुढे हात जोडून मी निवांतपणे उभा आहे २ काय करावे, ते मला समजत नाही
तुमच्या पायाकडे पाहात देवा, इथे उभा मात्र आहे मी ३ तुकाराम महाराज म्हणतात, जे दान देवा, द्याल ते
मी पदरात घेईन. ४
१०४६ जीव खादला दैवतें । माझा येणें महाभूतें । झोबले निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥ १ ॥
आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुम्हा आम्हा सये । विघडाविघड केली ॥ २ ॥
बोलतां दुश्चिती । मी वो पडियेले भ्रांती । आठव हा चित्तीं । न ये म्हणतां मी माझें ॥ ३ ॥
भलतेंचि चापळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळें । आपपर सारिखें ॥ ४ ॥
नका बोलो सये । मज वचन न साहे । बैसाल त्या राहे । उग्या वाचा खुंटोनी ॥ ५ ॥
तुम्हां आम्हा भेटी । नाही जाली जीवेसाठीं । तुका म्हणे दृष्टी । पाहा जवळी आहे तो ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- खादला-खाल्ला, सये-सखे, विघडाविघड-वियोग, खुटोनी-बंद करून,
अर्थ :- हा महाभूत असणारा जो देव त्याने तर माझा जीवच खाल्ला आहे. हे दैवत माझ्या जीवाला इतके
झोंबून राहिले आहे की, काही केल्याने सुटत नाही १ आता मी काय करू? काहीही उपाय केले तरी, काही उपयोग
नाही तसे, याने तुमच्याआमच्यात वियोग निर्माण केला आहे २ असे बोलत असतानाच मी दुश्चित्त होऊन
भ्रांतीमध्ये पडले आहे माझ्या मनात मी व माझे असा आठवसुद्धा राहिला नाही ३ मी काहीतरी भलतेच बोला
यला लागले आहे मला माझीं मलेबाळेही काही आठवत नाहीत आपले व परके हा भावही माझ्यामधील निघून
गेला आहे ४ सख्यानो, माझ्याशी बोलूही नका, कारण मला आता एक वायगा शब्द सहन होत नाही. वाणी बद
करून जशा आहात तशाच उगाच बसून राहा ५ तुमचीआमची भेट होणार नाही, अशी स्थिती आता निर्माण
झाली आहे आता हा श्रीहरी माझ्याजवळ एकसारखा आहे हे तुम्ही नीट पाहा ६
१०४७ जीवीचा जिव्हाळा । पाहो आपुलिया डोळा ॥ १ ॥
आम्हां विठ्ठल एक देव । येर अवघेचि वाव ॥ २ ॥
पुंडलिकाचे पाठीं । उभा हात ठेवुनि कटी ॥ ३ ॥
तुका म्हणे चित्तीं । वाहू रखुमाईचा पती ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- येर-इतर, वाव-व्यर्थ
अर्थ :- आमच्या जीवाचा जिव्हाळा असणारा हा श्रीहरी आम्ही आपल्या डोळ्यानी पाहू. १ विठ्ठल
हाच एक देव असून इतर सर्व व्यर्थ आहेत आमच्या दृष्टीने. २ हा विठ्ठल पुंडलिकासाठी कमरेवर हात ठेवून उभा
आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा रखुमाईचा पती श्रीविठ्ठल आम्ही आमच्या चित्तात धारण करू. ४