सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 353, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 353

सार्थ तुकारामगाथा ३१९
सागर व परमानंदाचे प्रत्यक्ष रूपच आहे. गोपी, गोपाळ, गाई यांना याचाच एक नाद असून पशू आणि पक्षी यांनाही
याचा छंद नेहमी असतो. हाही यांच्याच छंदाने पावा वाजवीत असतो. ४ याने मुकुट सुशोभित असून हा चतुर्भुज
आहे. हा भक्तांचे मन हरण करणारा असून याच्या ध्वजावर गरुडाचे स्थान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा
माझा स्वामी लगबगीने भक्तांच्या कामासाठी धावत येत असतो. ५
६४३ हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें ।
आपुलें ऐसें म्हणायें । करितों जीवें निबलोण ॥ १ ॥
बैसतां संतांचे पंगती १ । कळों आलें कमळापती ।
आपुलीं कोणीच नव्हती । निश्चय चित्तीं दृढ जाला ॥ २ ॥
येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड ।
कनिष्ठों रुचि ठेऊनि गोड । देखत नाड फळतसे ॥ ३ ॥
मरती मेलों नेणों किती । तोचि लाभ तयाचे संगतीं ।
म्हणोनि येतों काकुलती । धीर तो चित्तीं दृढ द्यावा ॥ ४ ॥
सुखें निंदोत हे जन । न करीं तयांशीं वचन ।
आदिपिता तूं नारायण । जोडी चरण तुमचे तें ॥ ५ ॥
आपलें आपण न करूं हित । करूं हें प्रमाण संचित ।
तरी मी नष्टचि पतित । तुका म्हणे मज संत हांसती ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- कोड-हौस, नाड-फजिती.
अर्थ :- देवा, मला आता हाताशी धरले आहे ते सोडू नये. मी तुम्हांस जीवेभावे शरण आलेलो आहे. मला
तुम्ही आपला आहे असे म्हणावे. मी माझे जीव तुमच्यावरून ओवाळून टाकीन. १ हे कमळापती, मला या संतांच्या
पंगतीस बसल्यावर समजून आले की, माझे हे सर्व आप्त लोक मला कधीही उपयोगी पडणारे नाहीत. ते आपले
नव्हेतच. हाच माझ्या मनात निश्चयाचा दृढ भाव झाला. २ ही सर्व नातेवाईक माणसे तुझ्या भजनाच्या आड
येतात. देवा, मला प्रपंचाची हौस वाटावी असे करतात, प्रपंचादी मुखासारख्या कमी प्रतीच्या गोष्टीत त्यांना रुची
वाटते. पण त्याची पुढे होणारी फजिती मला समजते. ३ ह्यातील कित्येकजण मरून गेले. मलाही त्यांच्या संगतीत
एवढा एकच लाभ झाला असता; म्हणून तर देवा, मी फार काकुळतीस येऊन विनवणी करीत आहे की, माझे
चित्त त्यांच्यात जडू नये, एवढा धीर मला तुम्ही द्यावा. ४ मग माझी निंदा हे माझे आप्त लोक सुखाने करू द्या
ना. मी त्यांच्याशी भाषणही करणार नाही. देवा, तूच आदिपिता आहेस माझा. नारायणा, मी तुमचे पाय काही मग
सोडणार नाही. ५ मी आपले हित आपणच साधून घेणार आहे. पूर्वसंचिताप्रमाणेच मी हे करीन. तुकाराम
महाराज म्हणतात, मी जर हे न करीन तर मी नष्टच होईन, पतितच राहीन. मग सारे संतजन मला हसतील ना. ६
६४४ वरयें जालें लागलों कारणों । तुमचे राहिलों चरणीं ।
फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणीं वैखरी ॥ १ ॥
न वेंचे शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं ।
जालों संतांची अंदणी दासी । केला याविशीं निर्धार ॥ २ ॥
जीवनों राखिला जिव्हाळा । जालों मी मजसीं निराळा ।
पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥ ३ ॥
१ संगती.