सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 296, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २६२
५१८ जातो वाराणसी । निरवी गाई घोडे म्हंसी ॥ १ ॥
गेलो येतो नाहीं ऐसा । सत्य मानावा १ भरवसा ॥ २ ॥
नका काढू माझीं पेवे । तुम्हीं वरळा भूस खावे ॥ ३ ॥
भिकारियाचे पाठीं । तुम्ही घेउनि लागा काठी ॥ ४ ॥
सांगाल जेवाया ब्राह्मण । तरी कापाल माझी मान ॥ ५ ॥
वोकलिया वोका । म्या खर्चिला नाहीं रुका ॥ ६ ॥
तुम्हीं खावे ताकपाणी । जतन करा तूपलोणी ॥ ७ ॥
नाहीं माझे मनीं । पोरे रांडा नागवणी ॥ ८ ॥
तुका म्हणे नीट २ । होते तैसे बोले स्पष्ट ॥ ९ ॥
शब्दार्थ व टीपा - निरवी-सोपवी, स्वाधीन करी, वरळा-फोलकटे व धान्य याचे मिश्रण
अर्थ - कुणी एक संसारात आसक्त झालेला मनुष्य काशीयात्रेला निघताना म्हणत आहे, ' मी निघालो
काशीयात्रेला गाई, घोडे, म्हशी याचा सांभाळ नीट करा तुम्ही मी ही जनावरे तुमच्यावर सोपवीत आहे १ मी
गेलो की लगेच येतो गेलो असेही वाटणार नाही तुम्हास माझ्यावर विश्वास असू द्या तुमचा २ मात्र ध्यानांत
ठेवा, मी गेल्यावर माझी धान्याची पेवे तुम्ही फोडू नका तुम्ही भुसा व फोलकटे याचेच अन्न खावे ३ दारात
भिकारी आला तर हातात काठी घेऊन त्याच्यामागे लागा व त्याला हाकलून द्या ४ मी इथे नाही असे पाहून तुम्ही
एखादा ब्राह्मण जेवायला सांगाल तर मग माझी मान कापल्याइतके दुःख मला होईल. ५ ओकारी किंवा याती होका
दुखणे आले तरी मी त्याच्यासाठी, औषधासाठी एक पैसाही खर्च केलेला नाही असा पैसा मी जतन केला आहे ६
तुम्ही सर्वांनी नुसते ताकपाणी पिऊन राहावे , आणि तूपलोणी माझ्यासाठी ठेवून द्यावे ७ तुम्ही कुणी काही खर्च
करू नका माझ्या राडापोरांची नागवण व्हावी असे माझ्या मनात नाही ८ तुकाराम महाराज म्हणतात, हा त्याच्या
मनात जसे आहे तसेच स्पष्ट बोलत आहे ९
विवरण - आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर, भगवद्भक्तीचा आनंद लुटल्यावर तुकोबा दुसऱ्याच्या सुखार्थ
समाजातील दंभावर बोट ठेवून कडक टीका करीत असत लोकांना फसविणारे भोंदू गुरू पाहून त्यांना राग येई
पण या भोंदू गुरूच्या नादी लागणाऱ्या बिचाऱ्या लोकांनाही कसे समजत नाही याचे त्यांना नवल वाटे नागवणींत,
भक्तिप्रेम याचा सीधा साधा मार्ग सोडून सगळी व्यर्थ कर्मकांडात्मक कटकटीत सापडले होते कित्येकाच्या मनात
संसाराची आसक्ती एवढी मोठी होती की, तिचे दर्शन त्यांच्या वरवरच्या पाठांत व तीर्थयात्रेतही स्पष्टपणे होत
असे आंधळेपणानें रोगी संसारात, केवळ बाह्यांगांत बस गुरफटून राहिले होते याची उपरोधिक उदाहरणे
तुकोबांनी अनेकदा आपल्या बोचक व मर्मग्राही शब्दात दिलेली आहेत या ठिकाणी एक वयोवृद्ध झालेला मनुष्य
काशीयात्रेस निघणारा असून त्याचे चित्त संसारातील क्षुद्र वस्तूत कसे गुंतून राहिलेले आहे याचे मोठे विनोदी व
उपहासगर्भ चित्र तुकारामानी दाखविलेले आहे एका संसारपाशात आसक्त झालेल्या एका पुरुषाचे हे चित्र पुढील एका
अभंगातील एका स्त्रीच्या शब्दचित्राशी ताडून पाहण्यासारखे आहे एक आवा पंढरपुरास चाललेली असते, तिचेही
चित्त संसारात कसे अनाठायी रमोत असते, याचे मोठे हृद्य व विनोदी पण विचारप्रवर्तक शब्दचित्र तुकारामांनी रंगविलेले
पुढे अभंग नं ४२१९ मध्ये आहे.
५१९ कास घालोनी बळकट । झालो कळिकाळासी नीट ।
केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥ १ ॥
या रे या रे लहान थोर । याति भलते नारीनर ।
करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥ २ ॥
१ माना श, २ नष्ट