सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 287, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंअर्थ :-लोकहो तुम्ही सर्वजण आता उठून उभे राहा. कारण नारायण उठून उभे राहिले आहेत. त्यांना पाहून
सर्व मुनिलोक आनंदून गेले आहेत. तीनही लोकात आनंद पसरला आहे. १ चला, या पंढरीनाथाचा जयजयकार करा.
वाद्यांचा गजर होऊ द्या. मृदंग, वीणा, टाळ, घोळ यांचा एकच ध्वनी होऊ द्या २ याच्यापुढे दोनही हात जोडून
याचे श्रीमुख मोठ्या आदराने, कौतुकाने पाहा ना. याच्या पायावर डोके ठेवा. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
तुम्हांस जे काय आवडते ते यास मागा. आपले जे काय सुखदुःख असेल ते या पांडुरंगास सांगा. ४
४९५ करुनी विनवणी पायीं¹ ठेवीं माथा । परिसावी विनवणी² माझी पंढरीनाथा ॥ १ ॥
अखंडित असावेंसें वाटतें पायीं । साहोनि संकोच ठाव थोडासा देईं ॥ २ ॥
असो नसो भाव आलों तुझिया ठाया । पाहीं कृपादृष्टी मज पंढरीराया ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्हीं तुझीं वेडीं वांकडीं । नामें भवपाश हातें आपुल्या तोडीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- परिसावी-ऐकावी, ठाव-स्थान
अर्थ :- देवा, माझ्या उद्धाराची विनवणी करून मी तुझ्या पायीं माझा माथा ठेविला आहे. माझी विनंती
आता पंढरीनाथा, तुम्ही ऐकावी. १ तुझ्या पायांशी अखंडपणे असावे अशी माझी इच्छा आहे देवा. थोडा संकोच
सहन करून मला तुझ्या पायांशी स्थान दे ना. २ माझ्या मनात विठ्ठला, भाव बसो, नसो, मी तुला शरण आलो
आहे ; पंढरीनाथा, तू कृपादृष्टीने माझ्याकडे पाहा ना. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वेडीवाकुडी असलो
तरी तुझीच आहोत. तू आमचे भवपाश तुझ्या नामाच्या सामर्थ्याने तोडून टाक. ४
४९६ घडिया घालुनि तळीं चालतो वनमाळी । उमटती³ कोमळीं कुंकुमाचीं ॥ १ ॥
वंदा चरणरज अवघे सकळ जन । तारियेले पाषाण उदकीं जेंणे ॥ २ ॥
पैस धरुनी चला ठरुत ठायो ठायीं । मौन्य धरूनी कांहीं नो बोलावें ॥ ३ ॥
तुका अवसरु जाणवितो पुढें । उघडलीं महाल मंदिरें कवाडें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:- पैस-मोठी ऐसपैस जागा, कवाडे-दारे
अर्थः- खाली वाटेवर पायघड्या घालून हा वनमाळी त्यावरून चालत आहे. त्यावेळी त्याची कुंकुमाची
पावले कशी स्पष्ट उमटतात १ सर्व लोकहो, या श्रीहरीच्या पावलांवरील धूलिकणांना वंदन करा. या पायांच्या
योगाने पाण्यावर दगडसुद्धा तरलेले आहेत २ देवास उभे राहण्यासाठी आपली ऐसपैस जागा ठेवून चला; ठिक-
ठिकाणी उभे राहा. मौन धारण करा काही उगाच बोलू नका. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी हळूहळू वेळ
साधून पुढे जात आहे. देवाच्या शेजघराची दारे उघडलेली आहेत ४
४९७ भीतरी गेले हरी राहा क्षणभरी । होईल फळ धीर करावा ॥ १ ॥
न कराँ त्वरा ऐकें मात । क्षण एक निवांत बैसावें ॥ २ ॥
करुनी मर्दन सारिलें पाणी । न्हाले देव अंग पुसी भवानी ॥ ३ ॥
नेसला सोनसळा विनवी रखुमाई । वाढिलें आतां ठायीं चलावें जी ॥ ४ ॥
करुनियां भोजन घेतलें आंचवण । आनंदें नारायण पहुडले ॥ ५ ॥
तुका मात जाणवी आतां । सकळां बहुतां होतीची⁴ ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- भीतरी-आत, भवानी-लक्ष्मी, सोनसळा-जरतारी पितांबर, मात-गोष्ट
अर्थः- श्रीहरी शेजघरात गेले आहेत, क्षणभर बाहेर उभे राहा तुम्ही जरा धीर धरून वागलात तर तुमची
इच्छा पूर्ण होईल. १ उगाच घाई करू नका. माझी गोष्ट तर नीट ऐका क्षणभर निवांतपणे स्वस्थ बसून राहा. २
या देवाच्या अंगास सुगंधी तेलाने व द्रव्यांनी, उटण्यांनी चांगले मर्दन करून अभ्यंगस्नान उष्ण पाण्याने घातले
१ चरणी, २ विनंती, ३ उठती, ४ होणी बिती