सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 260, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 260

२२६ सार्थ तुकारामगाथा
काहे भुला एक देखत आखो मार तडागो बाजार ॥ २ ॥
दमरी चमरी जो नर भुला । सोत आघो हि लत खाये ॥ ३ ॥
नहि बुलावत किसे बाबा आप हि मत जाये ।
कहे तुका उस असाके सग फिरफिर गोते खाये ॥ ४ ॥
शब्दार्थ - मलग-मुसलमान फकीर, ठकण भेल-फसविण्यास केलेला वेष, तडागो-तडाखे, लत-लाथ,
असाके-आशेच्या
अर्थ - बाबा, लक्ष ठेवून राहोल तोच जिंकेल हा प्रपंचाचा तमाशा दूर राहून तू पाहा पुढे हातात काठी
व फास घेऊन फसविण्यासाठी वेषधारी वाटमारे बसले आहेत हे नीट ओळख तू १ या बाजारात लोभाने आप-
ल्याच डोक्यावर तडाखे देत कित्येक वेषधारी बसले असताना तू त्यांना पाहात आहेस मग तू त्याना का फसवतोस ? २
दमडीचमडीसाठी जो मनुष्य भूलून जातो तो पुढे लाथा खात राहतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, बाबा, तू
कुणालाही बोलावू नकोस, तूही कुठे जाऊ नकोस कारण पुन आशेच्या संगतीने तू गोता खाशील रे बाबा ४
दरवेस - अभंग १
४४३ अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज ।
गाउ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥ १ ॥
ख्याल मेरा साहेबका । बाबा हुवा करतार ।
व्हाटे आधे चढे पीठ । आपे हुवा असवार ॥ २ ॥
जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्पा अंदर भेत ।
कहे तुका जो नर बुझे सो हि भया दरवेस ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - दरवेस-अस्वलाचे खेळ करून हिंडणारा फकीर अथवा भिक्षेकरी, सिरताज-मुकुट,
यारी-प्रेम, मैत्री, बाघो-वाघ
अर्थ - देवाने मनात आणले तर सामान्य मनुष्यही बाबा, देवाच्या डोक्यावरील मुकुट होऊन राहील, आणि
गाईवासरासहित वाघाबरोबरही ते मैत्री करतील १ बाबा, त्या एका ईश्वराची मात्र आठवण ठेव कारण तोच एक
कर्ता आहे तरच तुम्ही त्याच्या पाठावर आरूढ व्हाल २ बाबा, सर्व भूतांचा अंतरात्मा जो अल्ला, बेध त्याची
आठवण ठेवा तुकाराम महाराज म्हणतात, जो मनुष्य हे सर्व समजून श्कतो तोच खरा दरवेशी झाला ३
वैद्यगोळी-अभंग १
४४४ अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारू अल्ला खिलाये ।
अल्ला वगर नहीं कोये अल्ला करे सो हि होये ॥ १ ॥
मर्द होये वो खडा फोर नामर्दुंकु नहीं धौर ।
आपने दिलकु करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥ २ ॥
सब रसोग्न किया मार । भजनगोली एक हि सार ।
इमान¹ तो सब ही सचा । थोडी तो भी लेकर ज्या ॥ ३ ॥
जिन्हो पास नीत सोये । वो हि बसकर तिरोवे ।
सातो पाचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥ ४ ॥
१ इनाम