सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 259, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 259

सार्थ तुकारामगाथा २२३
आणीक एकी परी । सरवदा सांगतो तें करीं ।
दान देतां जो न वारी । नव्हे भला भला तो ।
तुका म्हणे आई । येयें नांव काई ।
सांगसी तें ठायीं । मरो रांडेचें ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- सरवदा-भविष्य सांगणारा, शकुन सांगणारा, खान-चोरी, वारी-निवारण करतो.
अर्थ :- बंधूंनो, ऐका हा भविष्य अथवा शकुन सांगणार काही सांगत आहे. काम व क्रोध या दोन पुत्रांची
ही बुद्धीरूप आई लोकांख्याकडून फसवली जाईल. ते तिची विटंबना करतील. हे सर्वत्र प्रसिद्धच आहे. कामाला मारल्या-
शिवाय कुणालाही शहाणपणा येणार नाही, बरे सुखही मिळणार नाही. १ लोकहो, आणखी काही शकुन या भविष्य
ऐका, हा शकुन सांगणारा काय सांगतो ते ऐका. देहादी लौकिक दृष्टी व प्रपंचविचार यांना खरे मानतो तो नरकात
जाईल. त्याची अधोगती होईल. हे मी तुम्हांला चार वेदांच्या आधाराने सांगितले आहे. तेव्हा स्त्रीपुरुषहो, देहादी
प्रपंच खोटा आहे असेच म्हणत राहा, म्हणजे तुमची सर्व दुःखे निवारण होतील. २ शकुन सांगणारा आणखी असे
सांगत आहे की, आणखी एक मनुष्य फसणार आहे तो हा की जो माझे चित्त जागे आहे, मी सावध आहे असे
म्हणणारा. त्याच्या घरी चोरी होऊन त्याचे सर्व लुटायला जाईल म्हणून माझे माझे म्हणून सावध राहण्याचा जहरी
नाहो. निजात्मस्वरूपाच्या ठिकाणी मात्र सावध राहावे. सर्वांचे चित्त चोरणाऱ्या त्या श्रीहरीच्या ठिकाणीच विश्वास
प्रयत्नपूर्वक ठेवावा ३ आणखी एक शकुन या सरवद्याचा असा आहे की, देहधर्मास व विकारांनाच सर्वस्व मानून
पतीची सेवा करणारी पतिव्रता नारीही मोठेच दुःख पावेल. ही जीवदशारूपी पतिव्रता स्त्री पंचकर्मेन्द्रिये, पंचज्ञानेंद्रिये,
पंचमहाभूते याच्या तावडीत सापडलेली असल्याने तिच्यापासून सावध असावे. निश्चिंत राहू नये परम म्हणजे श्रेष्ठ
पुरुष जो परमेश्वर त्याच्याशीच रममाण ती जर झाली तरच तिला सुख वाटेल. ४ आणखी शकुनाचा एक प्रकार
असा की, कुणी दान देत असताना जो निवारण करतो तोही काही चांगला मनुष्य नव्हे. तुकाराम महाराज
म्हणतात, मातांनो, त्या सर्वांची नावेच कशाला सांगायला हवीत ? मरेनात रांडेचे. ५
मुंडा-अभंग ३
४३८ संवाल यारा उपर तलें दोन्हो मारकी चोट ।
नजर करे सो ही राखे पछ्वा जावे लुट ॥ १ ॥
प्यार खुदाई रे बाबा जिकिर खुदाई ॥ २ ॥
उडे फुडे हुंग मचाये आगल भुलन प्यार ।
लड्यड खडबड काहेकां खचलावत भार ॥ ३ ॥
कहे तुका चलो' एका हम जिन्होके सात ।
मिलावे तो उसे देना तो ही चढावे हात ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - मुंडा-मुसलमानी गुरूचा एक प्रकार, यारा-मित्रा, संवाल-सांभाळ, चोट-तडास,
खुदाई-देवावर, कुडे-उडी मारणे
अर्थ :- मित्रा, स्वर्गासारख्या वरच्या गतीचे व पशुपक्ष्यादी खालच्या गतीचे सुखदुःखाच्या भोगाचे तडाखे
जो सांभाळील त्याचेच रक्षण होईल व दुसरा मात्र नागविला जाईल १ बाबा, देवावर प्रीती असू दे. देवावरच
प्रीती ठेव. देवावरच प्रेम असू दे २ प्रपंचविषयींचे प्रेम, भूलून, उड्या मारून, ढुंगण हालवून तू नाचत राहून
देवापुढे लीन व्हावेस. काखेत झोळी, खडावा, कृष्णाजिन यांचे लडबडते, खडबडते ओझे विनाकारण का वाहवितोस ? ३
तुकाराम महाराज म्हणतात, लोकहो, नीट ऐका, आम्ही ज्याच्याशी तुमची सोबत करून देऊ त्यालाच हात देऊन
जवळ करा. ४