सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 170, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१४२ सार्थ तुकारामगाथा
प्रतिमा अथवा मूर्ती मनाने स्थापन केली व तिची मनोमय पूजा मनानेच केली, मनानेच सर्व इच्छा पुरविल्या,
आणि सर्व वासनांची, संकल्पाची माउली मनच होय २ गुरु आणि शिष्य हे मनाचेच प्रकार कल्पिले मनच
स्वतःचे दास्य करू लागते. मनच स्वतःवर स्वतःच प्रसन्न असते चांगली किंवा वाईट गती या मनामुळेच प्राप्त होत
असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, साधकांनो, पंडितांनो, वाचकांनो, श्रोत्यांनो, वक्त्यांनो, एक गोष्ट ऐका ती
ही की या मनाखेरीज दुसरे दैवत नाही ४
विवरण :- भागवत धर्मोय संतांनी चित्तशुद्धीवर फार भर दिलेला आहे. मन हे सर्व सिद्धीचे साधन,
असल्याने ते शुद्ध राखणे, त्यास वळण देणे, ते ताब्यात ठेवणे, त्यावर अस्वार करणे, ने ईश्वराच्या ठिकाणी स्थिर
करणे याची फार आवश्यकता संतांनी सांगितली आहे मन हे अति चंचल, अति खवळळ, हट्टी, दुराग्रही असल्याने
व सर्व सुखांचेही साधन तेच असल्याने त्याची मशागत ही फार महत्त्वाची मानली जाते मन स्थिर झाल्याशिवाय,
शांत झाल्याशिवाय कसलेही सुख नाही वरवर कसलाही डौल मिरविला तरी मन स्वस्थ नसेल तर सारे व्यर्थ आहे
म्हणून मनोजयास, मनाच्या स्थिरतेस फारच महत्त्व आह
पण ही स्थिरता यावी कशी ? मन स्वभावत च चंचल आहे, प्रमाद करणारे आह, त्याचा निग्रह करुन
त्यास ताब्यात ठेवणे फार कठिण आह पण अभ्यासाने व वैराग्याने त्यावर स्वामित्व मिळविता येते असा गीतेचा
आदेश आहे 'चञ्चलं हि मन कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् । तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्' असा मनाचा
स्वभाव आहे वाऱ्याची मोट बांधणे जितके अवघड तितकेच मन वळविणे अवघड या अस्थिर मनाचे मोठे समर्पक
वर्णन ज्ञानदेवानी करून म्हटले आहे, ' हे मन कैसे केवडें । ऐसे पाहों म्हणो तरी न सापडें । एन्हवीं राहाटावया
थोडें । त्रैलोक्य याया ॥ म्हणोनि ऐसें कैसे घडेल । जें मर्कट समाधी येईल । दा राहा म्हणतलिया राहेल । महा-
वायु ॥ जें बुद्धीतें सळी । निश्चयातें टाळी । धैर्येसीं हातरुळी । मिळऊनी जाय ॥ जें विवेकेंतें भुलवी । संतोषासी
चाड लावी । बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ॥ परि वैराग्याचेनि आधारें । जरि लाविले अभ्यासाचिरे
मोहरे । तरि केतुलेनि एके अवसरे । स्थिरावेल'
या मनाची अस्थिरता बहुतेप सर्वांनी वर्णन केली आहे 'चंचळळ मन माझे नावरे आवरीता' म्हणून
रामदासानी मनासच केलेला उपदेश प्रसिद्ध आहे हे चंचल मन कसे फसवे आहे व कसे झुकाड्या देत असते याचे
मोठे सुंदर वर्णन एकनाथानी आपल्या भागवतात केले आहे 'निग्रहाच्या निज मन । साधक साधितो प्राणापान ।
त्यासीहो छेळोनिया मन । जाय निघोन तत्काळ ॥ मनोनिग्रह करिता देख । मन खवळे अधिकाधिक ।
मनोनेमी सज्ञान लोक । शिणले साधक साधनीं ॥ वारा बाधवेल मोठें । अग्नि प्राशवेल अवघटें । समुद्र घोटवेल घोटें ।
मन आत्मनिष्ठे तरी न ये ॥ आकाश फाडवेल चौघडी । महामेरु बाधवेल पुढीं । शून्याची मुरडवेल नरडी । परि या
मनाच्या जोडी अनिवार ॥'
अशा या दुराग्रही, हट्टी आणि चंचल मनास वश करता येते ते वैराग्य, सत्सग, प्राणायाम, हरिभक्ती, नामस्मरण,
भजन इत्यादी उपायानी नाथांनी भागवतात मन स्थिर करण्याचे उपाय भिक्षुगीतात सांगितले आहेत मनाशीं वैर
करावे, मनाशी मैत्री करावी, मनाविषयी उदासीन राहावे असे तीन मार्ग मनोजयाचे त्यानी सुचविले आहेत 'वैर
करोनि मनचि मारावे । मित्रत्वें मनें मन साधावे । इयें दोन्ही जें न संभवें । तं उपेक्षावे मनातें ॥' मनोनिग्रहावरचे
नाथाचे हे निरूपण अतिशय महत्त्वाचे व समर्पक असे आहे सर्व साधुसंतानी या मनास ताब्यात ठेवण्यासाठी उपाय
सुचविले आहेत 'आधीं मन घेई हातीं । तोचि गणराज गणपती ॥ मन इंद्रियाचा राजा । त्याची सर्वभावें पूजा'
असे तुकोबांनीच एका अभंगात पुढे म्हटले आहे 'मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ स्थिर नाहीं'
या शब्दात त्यांनी मनाची चंचलता वर्णन करुन 'तुका म्हणे मन चंचळ । हातों येईल गुरूच्या बळें' असा एक
उपायही सुचविला आहे
मनानेच मनाला जिकावयाचे असल्याने हे फार कठिण काम वाटते नाथांनी 'जैवि हिरेनि हिरा चिरिजे ।
तेवी मनेंचि मन धरिजे' म्हणून सांगितले आहे. हिऱ्यानेच हिरा चिरावा लागतो, त्याप्रमाणे मनानेच मनास जिकावे