सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 161, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १३१
ब्राह्मणांनी आपला धर्म सोडला आणि ते चहाडखोर व चोर बनले आहेत ३ आपले टिळे व पंचांग लपवून, सोडून
देऊन ते कातड्याची विजार घालू लागले आहेत ४ न्यायाच्या किंवा राजाच्या सिंहासनावर बसतात व अन्नाशिवाय
प्रजेस पीडा देतात ५ स्वयंपाकगृहात राहून साद्या जमाखर्च लिहितात व तेलतुपाचा हिशेब करून कसे तरी जिणे
जगतात ६ नीच माणसांचे चाकर होऊन चुकले की वरिष्ठाकडून वारंवार मार खातात ७ राने लोक प्रजेस
पीडा फारच देतात जमीनदार गरिबाला फार तोडून बोलतात ८ ब्राह्मण क्षत्रियाची ही दशा, मग वैश्यशूद्राची
काय वर्णन करावी ? ते सहजच आणखी नीच अवस्थेस गेले ९ आत-बाहेर सर्वत्र बाह्य रंगाचा देखावा आहे,
आतमात्र हिरवेकच्चेच आहेत सर्वजण १० तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही झोपला आहात काय ?
समाजाची काय ही अवस्था ! लौकर उद्धारासाठी धावून या ना ११
२६८ साळंकृत कन्यादान । करिता पृथ्वीसमान¹ ॥ १ ॥
परि ते न कळे या मूढा । येईल कळो भोग पुढा ॥ २ ॥
आचरता कर्म । भरे पोट राहे धर्म ॥ ३ ॥
सत्या देव साहे । ऐसे करूनिया पाहे ॥ ४ ॥
अन्न मान धन । हे तो प्रारब्धा आधीन ॥ ५ ॥
तुका म्हणे सोस । दुःख² आता पुढें नास ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - साळंकृत-अलंकारासहित, सोस-हव्यास, नास-नाश
अर्थ - अलंकार वगैरे घालून मुलगीचे दान केले की ते कन्यादान पृथ्वीच्या दानाप्रमाणे होणार आहे १
पण ते या मूर्खास समजत नाही पुढे भोगावयास लागले म्हणजे कळेल मग सर्व २ ज्याचे त्याने आपले विहित
कर्म केले की पोट भरून आनंद होईल एवढा धर्म होतो ३ सत्याला देवाचे नेहमी साहाय्य असते सत्याने वागून तर
पाहा ४ अन्न, मान, धन या गोष्टी आपल्या प्रारब्धाच्या आधीन आहेत ५ तुकाराम महाराज म्हणतात,
पुढल्याहि गोष्टींचा हव्यास धरलास की पुढे खचित नाश आहे असे समजावे किंवा आता सुख वाटले तरी पुढे
नाशच असतो ६
२६९ दिवट्या वाद्ये लावूनि खाणे । करूनि मढण दिलो हातीं ॥ १ ॥
नवरा नेई नवरी घरा । पूजन करा पायांचे ॥ २ ॥
गौरविली विहीण व्याही । घडिले कांहीं ठेवू नका ॥ ३ ॥
करू द्यावे व्हावे वरें । ठायींचे का रे न कळोचि ॥ ४ ॥
वहाडियाचे लागे पाठीं । जैसी उटिका तेलीं ॥ ५ ॥
तुका म्हणे जोडिला थुका । पुढें नरका सामग्री ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - मढण-सुशोभा
अर्थ - लग्नाच्या वेळी घरात दिवे लावून, वाद्ये वाजवून, पक्वान्नाचे भोजन करून अलंकारांनी नटलेली
नवरी मुलगी नवऱ्या मुलाच्या हातात देतात १ मग नवरा तिला थाटामाटाने घरी नेतो, नवऱ्याच्या पायांचे
या वेळी पूजन वगैरे होते २ व्याह्याला व विहिणीला पोशाख वगैरे देऊन त्यांचा गौरव केला जातो व जर काही
कमी जास्त समारंभात घडले असेल तर मनात ठेवू नका असे सांगितले जाते ३ नवऱ्याचे म्हणणे वगैरे जे काही
असेल ते सर्व यथासांग कर द्यावे, पण या सर्वांच्या मुळाशी असणारी समजुतीची गोष्ट लोकांना फणी फळत
नाही ? ४ जशी तेलामध्ये उटिका जिरून जाते त्याप्रमाणे ही विहिण भांडखोरपणे या वऱ्हाड्यांच्या पाठीमागे
१ पृथ्वी दानाच्या समान, २ सुख